Friday, 2 March 2012


हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती...!! राजे छत्रपती शिवराय !!...  यांचे पुत्र  संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले .


पण  हे संभाजीराजे  कसे होते अस जर आम्हाला कोणी विचराल तर आम्ही दोनच वाक्यात उत्तर देतो, "संभाजी रखेल आणि रंगेल होते"


अरे म्हणून तर सांगतो हे माहित आणि लक्ष्यात  असुद्या.... जर स्वताला मराठा समजत असताल तर .


"अरे ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलुन धरले,
जो माणूस  वादळासारखा ह्या सहयाद्रीच्या दरया - खोरयत घोंगावत राहिला .....
अरे ज्या माणसाने  १२० लढाया केल्या ........
 एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही तह करून मागे न फिरनारा राजा म्हणून इतिहासाने ज्याची नोंद घेतली..........
आणि अखेर  औरंगजेबाची कबर इथाच याच परिसरात उभारली गेली त्या संभाजीराज्याला आम्ही बदनाम ठरवून टाकले..........

१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला माहित आहे.
पण संभाजीराज्यांनी  वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे आम्हाला  लक्ष्यात असुद्या " .
झोपलो होतो आम्ही!!!!!!
अरे आपण चकचकीत पॉलिशकड़े बघत गेलो, खरया इतिहासाच्या मुळपर्यंत आम्ही गेलोच नाही.
खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही.
कधी तरी  खरया इतिहास पान  चाळून बघा............
कधीतरी समजाऊन घ्या संभाजीराज्यांना .......


अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे  संभाजीराज्यांनीच  आम्हाला  दाखवलं.......
म्हणून  तर  मनतात " जगावे तर छत्रपती शिवराय यांच्या सारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजीराज्यासारखे". 


हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती !! छत्रपती संभाजीराजे !!



||  छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥




No comments:

Post a Comment