छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर,
स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत
कलहाशी व शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला। शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।
वरील दोन ओळींतच खर्या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो.
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या.
सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली. याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली.
शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले.
विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील
कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत
तर होतच होते. त्याबरोबरच त्यांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही प्रभुत्व
होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या बुधभूषण या संस्कृत
ग्रंथात दोन अध्याय असून पहिल्या अध्यायात ‘स्वकुल’ व ‘स्वकाव्य वर्णन’ या
विषयीचे लेखन आढळते तर दुसर्या अध्यायात ‘राजनिती’ व ‘दुर्ग निरूपण’ या
विषयीची सविस्तर माहिती संभाजी महाराजांनी लिहिलेली आढळते.
छत्रपती
शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर १६८० च्या सुमारास संभाजीराजे गादीवर
बसले. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत १६८९ चा हा केवळ नऊ वर्षांचा काळ
महत्त्वाचा आहे.
“अवघे तेवीस वर्षांचे वय.औरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज,सिद्धी अशी गनिमांची संकट चहूबाजूंनी स्वराज्याला गिळंकृत करण्यास आली होती. याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्या धर्मांध
लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या
स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा
घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात
घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्यांमुळे
त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला
होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार
कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली.
शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार पाच हजार किलोमीटरपर्यंत वाढवला. नऊ वर्षांच्या काळात त्यांनी केवळ स्वराज्याचे संरक्षण केले नाही तर संवर्धनही केले. स्वराज्याचा स्वतंत्र दारूगोळा कारखाना काढला. तरलता तोफखाना काढला. जंजिऱ्याजवळ पूल बांधला. नवी गावे बसवली. व्यापारीपेठा बसवल्या. धरणे बांधली. लढाईमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसनही केले. आरमार वाढवून दर्यावर हुकमत निर्माण केली. चार नवे किल्ले बांधले. पराक्रमी सैनिकांना बक्षिसे दिली.लढाईत मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबांची सोय केली. हे सारेकरण्यास त्यांना केवळ नऊ वर्षे मिळाली. वाटते तेवढे सोपे नाही. अद्भुत, अचाट, अतुलनीयच ठरेल.”
संभाजीराजांनी शत्रूंवरएवढी जरब बसवली, की मुअज्जम आणि शहाबुद्दीन यांनी दोन बाजूंनी घेरण्याची व्यूहरचना केली असताना गोवेकरांनी त्यांना मदत करण्याचे धाडसदेखील केलेनाही. उलट संभाजीराजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी राजधानीच बदलली. मोगलाईला धोका होता म्हणून…मराठ्यांचे स्वराज्य रयतेचं, तर सर्व शाह्या या बादशहांच्या होत्या.
छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।
आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. म्हणून अनुभवी औरंगजेब सर्व ताकदीनिशी स्वराज्य उद्ध्वस्त करण्यास दक्षिणेत आला. औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले.
"" इस्लाम स्वीकारण्यास नकार देऊन औरंगजेब बादशहाचा अपमान करणाऱ्या शंभूछत्रपतींनी ज्वलंत इतिहास निर्माण केला. बलाढ्य शत्रूसमोर न झुकणार्या राजांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जगाला दाखवला. आपल्या प्राणांचे मोल देऊन त्यांनी पवित्र हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यांच्या तेजस्वी बलिदानामुळे महाराष्ट्र पेटून उठला. स्वधर्माच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या मराठ्यांनी इस्लामी आक्रमकांची थडगी बांधून हिंदुस्थानची शान राखली ! म्हणून औरंगजेबाचं स्वप्न अपुरं राहिलं. त्याला पुन्हा उत्तरेलाही जाता आलं नाही. त्याचा महाराष्ट्रातच अंत झाला....!! अशक्य ते शक्य झाले केवळ शंभू छत्रपतींच्या बलिदानामुळे ! त्यांनी मंदिराचे कळस आणी घरापुढची तुळस यांचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण ( मृत्युंजय अमावस्या ) ठेवणे हे प्रत्येक हिंदूचे पवित्र्य कर्तव्य आहे. ""
धर्मवीर, मृत्युंजय छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधी स्थळ : श्रीक्षेत्र वढू बु. ता. शिरूर, जी. पुणे. |
त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले
आहेत,
" कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा, पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा ".
:: छत्रपती संभाजीराजे यांचा कालपट ::
१६५७ मे , १४ = संभाजीराजे हे छत्रपति महाराज आणि राणी सईबाई यांच्या पोटी पुत्र किल्ले पुरंदरावर.
५ सप्टेंबर , १६५९ रोजी मातोश्री सईबाई यांचे निधन.
११ जुन , १६६५ पुरंदरचा तह , संभाजीराजांना पंच हजारी मनसबदारी , राजकारणात संभाजीराजांचा प्रवेश.
१८ जून , १६६५ पुरंदरच्या तहानुसार उग्रसेन कछवाह यांचेबरोबर जयसिंग च्या छावणीत दाखल.
५ मार्च ,१६६५ = संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज्याबरोबर आग्र्याकडे प्रयाण ( वय वर्षे ९ ) ,
१७ ऑगस्ट , १६६६ = छत्रपति शवाजी राज्यांबरोबर आग्रा इथून ऐतिहासिक सुटका .
२० नोव्हेंबर ६६ = संभाजीराजे राजगडावर सुखरूप आले याचवेळी शिवाजी महाराजाचा मिघालांची शांतता करार त्यानुसार संभाजीराज्याना ४००० मनसब पुन्हा एकदा.
४ नोव्हेंबर .६७ ला शहजादा आलामची भेट ,
१६७२ रोजी संभाजी राजे यांना १० , ००० फौजेचे नेतुर्व्त बहाल .
१६७५ ला शिवाजी महाराज्याची आदिलशाही मुलखावर स्वारी , संभाजी राज्यांच्या नेतृव्ताखाली गोवलकोंडा व भागा नगरी (हैद्राबाद ) पर्यंत मराठी लष्कराची मुसंडी.
२ जानेवारी , १६७१ ते १६७४ युवराजांनी जिजाऊ आउ साहेबांच्या वृद्धापकाळात मुलकी कारभार सांभाळला
१६७७ ला बुद्धभूषण ग्रंथ लिहिला .
१ नोव्हे, १६७६ इतर तीन ग्रंथांचे लिखाण नाईकाभेद , नखशिख , सात सतक सगळे हिंदी भाषेत ग्रंथ.
गागा भट्ट यांनी समनयन ग्रंथ लिहून संभाजी राजे यांना अर्पण यात त्यांनी असा उल्लेख केला आहे संभाजी राजे यांच्या तळपणार्या पराक्रमाने दिशा उजळून गेल्या आहेत.
१६७८ दिलेर खानच्या छावणीत सामील ११ महिने , या कालावधीत मोघलांनी स्वराज्यावर कोठे हि आक्रमण नाही , फक्त अपवाद भूपाल गड तोही मराठ्यांनी १५ दिवसात परत घेतला.
२१ डिसेंबर , १६८० ला दिलेरखानाच्या छावणीतून पसार , विजापूरला आश्रय तेथून पन्हाळगडावर.
१३ जानेवारी , १६८० , ला पन्हाळ्यावर शिवाजी राज्यांबरोबर सुखरूप भेट.
३ एप्रिल , १६८० शिवाजी महाराज्याचे रायगडावर निधन वय वर्षे ५०.
१८ जून , १६८० संभाजी राजे पन्हाळ्यावर राज्य कारभाराची पुर्नबांधणी.
२७ जून , १६८० मातोश्री पुतळाबाई यांचे संशयास्पद निधन.
२० जुलै , १६८० संभाजी राजे यांचे मंचकारोहण.
८ सप्टेंबर , १६८१ औरंगजेबाचे अजमेर्वरून ५ लाख फौजेसह दक्षिणेकडे कूच.
१३ नोव्हेंबर , १६८१ औरंगजेब बुर्हन्पुरला.
३० ऑक्टोबर , १६८४ राहुजी सोमनाथ , गंगाधर पंत , मानाजी मोरे , यांना संभाजी राजे यांचे विश्वासू सहकारी कवी कलश यांच्या खूनाचा प्रयन्त केल्या प्रकरणी अटक.
१६८१ संभाजी राजे यांना अनेक वेळा ठार मारण्याचा कट करणाऱ्या अण्णाजी दत्तो आणि कटात सहभागी असणार्यांना देहान्त्ताची शिक्षा.
नोव्हेंबर १६८८ रायगडावर कर्मात ब्राह्मण मंत्र्यांनी मोघल सरदाराच्या तावडीत संभाजी राज्यांना अडकविण्याचे कात कारस्थान केले.
संभाजी राजे यांना पन्हाळ्यावर खबर . फितुरांना शासन प्रल्हाद पंत व इतर सर कारकुनांना महाराणी येसूबाई यांनी कैद केले.
१ फेब्रुवारी , १६८९ फितूर अष्ट प्रधानांनी आखलेल्या कात कारस्थानांना यश.
२ फेब्रुवारी , १६८९ संभाजी राज्यांना मोघलांनी सगमेश्वेर येथे कैद केले आणि कठोर असे खूप छल केले सुमारे सव्वा महिने.
११ मार्च , १६८९ संभाजी राजे यांची डोळे काढून अत्यंत क्रूरपणे हत्या करून देहाचे तुकडे करण्यात आले.
"" संभाजीराजे संकटांवर केवळ स्वार झाले नाहीत; तर त्यांनी सर्व आक्रमकांच्या उरात धडकी भरवली. स्वराज्याचा निम्म्या भारतात विस्तार केला. राजपुतांची साथ मिळाली असती तर ते दिल्लीचे तख्तही ते काबीज करू शकलेअसते. ही कामगिरी “केवळ अद्भुत’ म्हणता येईल अशीच आहे. जगातत्याची तुलना होऊ शकत नाही. केवळ ९ वर्षांच्या काळात एकही पराभव, तह वा माघार नसलेल्या १२८ लढाया त्यांनी जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. ""
अश्या महान महान पुत्रास आणि महान राज्यास मनाचा त्रिवार मुजरा...!!! |
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment