मराठ्यांचा अंश मी... क्षत्रियकुलवंत मी...

ब्लॉगच्या निमित्ताने माझे मनोगत आणि  थोडं माझ्या विषयी....

सर्व मर्द मराठा मावळ्यांना माझा शिवनमस्कार……

राजमाता जिजाऊ, आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांना माझ्या मनाचा त्रिवार मुजरा .......!!!!



या ब्लॉगवर आपले स्वागत आहे…हा ब्लॉग वाचा, आपल्या प्रतिक्रिया द्या. नक्कीच हा ब्लॉग आपल्याला आवडेल व आपल्याला त्याची मदत होईल. वाचकांनी त्याचा आनंद घ्यावा आणि अवघा शिवकाळ आठवावा. धन्यवाद ..!!!



""""" छत्रपती शिवराय एक युगपुरुष...युग पुरुष म्हणजे लाखो वर्षांनी जन्माला येणारे नरश्रेष्ठ...एक जाणताराजा .
परंतु आजकाल ह्या महान युगपुरुषाला एका विशिष्ट चौकटीत बांधून त्यांचा वापर एक "brand ambassador " म्हणून सध्याच्या घाणेरड्या राजकारणा साठी केला जातो... त्यामुळे छत्रपती शिवरायांचे अनेक दुर्लक्षित पैलू जगासमोर येतच नाहीत....किंवा ते पैलू जाणूनबुजून जगासमोर आणले जात नाहीत.... अहो देवगिरी साम्राज्याचा अस्तानंतर ह्या हिंदुस्तानाने खरे खुरे हिंदुस्तानी राज्य अनुभवले असे तर ते छत्रपती शिवरायांच्या रूपानेच ...८०० वर्षांचे जुलमी यवनी साम्राज्य मुळासकट उलथवून टाकणारे एक अद्वित्य व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवराय.
कोण म्हणते शिवराय कट्टर हिंदू होते त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले, कोण म्हणते ते कट्टर मराठा होते त्यांनी मराठ्यांचे राज्य स्थपन केले तर कोण म्हणते शिवराय निधर्मी होते त्यांनी बहुजानानाचे राज्य स्थापन केले.एवढीच ओळख आहे का ह्या युग-पुरुषाची ???
अहो आज आपण जे छत्रपती बघतो किंवा आपल्या ते दाखवले जातात ते एका हिमनगाचे छोटेसे टोक आहे ह्या टोकाखाली दडलेला महाकाय हिमनग आपण पाहत नाही किंवा पहायचे धाडस आपण करत नाही ...शिवरायांच्या नावाने घोषणा देताना सर्वप्रथम नाव कुणाचे घ्याचे ह्यावर आपण वाद घालतो, शिव जयंती तिथीप्रमाणे कि तारखे प्रमाणे साजरी करण्याहून वाद घालतो... हे फारच दुर्दैवी आहे आपले. आज शिवरायांच्या विचारांपेक्षा त्यांच्या विचारांबाबत आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे दर्शवन्यातच आपण धन्यता मानतो...शिवरायांचे विचार वाटून खाण्यात ती काही आपल्या पूर्वजांची मालमत्ता नाही...शिवरायांच्या जीवनावर आधरित दोन पुस्तके अथवा कादंबऱ्या वाचून आपल्याला शिवरायांचा ५० वर्षांचा संपूर्ण इतिहास समजला असे जर कोण समजत असेल किंवा तसा आव आणत असेल तर ते हास्यास्पद आहे.
संपूर्ण शिवराय समजने हे काही एका जन्माचे काम नव्हे, त्याला कितीतरी जन्म घ्यावे लागतील. वयाच्या १८व्या आपल्या अलौकिक बुद्धीचे व प्रगल्भ युद्धनीतीचा वापर करत आदिलशाह विरुद्ध लढलेल्या पहिल्या घोषित युद्धात म्हणजे पुरांधारच्या पहिल्या युद्धात महाराजसाहेबांनी कशी सरशी केली होती ह्यावर पण चर्चा करत नाही.. महाराजानी जवळ जवळ ३५० गड-किल्ले बांधले अथवा त्यांचा जीर्नोधार केला पण त्या-प्रत्येक गड-किल्ल्याचा वापर महाराजानी का व कसा केला ह्यावर कोण वाद घालत नाही.....हल्ली चर्चा होती ती फक्त त्यांच्या धर्मकारणाची .... चर्चा करायचीच असेल तर शिवरायांच्या पराक्रमची करा...समाजकारणाची करा...राजकारणाची करा..त्यांच्या युध्नितीची करा ...आणि ह्यातूनच खरे शिवराय आपल्याला व संपूर्ण कळतील. """""
 
""" शिवरायांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा शिवरायांचे विचार जर आपण आपल्या डोक्यात खोलवर रुजवले तर हा भारत देश जगातील सर्वशक्तिमान महासत्ता होण्यास जास्त वेळ लागणार नाही  """ सच्च्या शिव-भक्ताचे हेच उद्धिष्ट असावे.

आपला,
-  बद्रीनाथ मदनराव कदम.
 

       माझ्याविषयी काहीच सांगणार नाही तशी गरज ही नाही….महाराजांच्या आणि त्यांच्या पराक्रमांचा इतिहास ऐकत आणि शिकत मी लहानाचा मोठा झालो.
मी हा ब्लॉग सुरु करण्याचे कारण म्हणजे गेले अनेक वर्षे माझी ईच्या होती कि || राजमाता जिजाऊऑसाहेब || , आपले आराध्य दैवत… हिंदवी स्वराज्याजे पहिले :: || छत्रपती शिवराय || आणि || छत्रपतीं संभाजीराजे || यांच्या पराकर्माचा इतिहास, हिंदवी स्वराज्य खरे साक्षीदार असणारे शिवकालीन गड-किल्ले यांची खरी माहिती व इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करणार आहे.
हा सर्व  साठा " ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|| " (http://badrinathraje.blogspot.in) इथे जमा
केला आहे .हा सगळा प्रयत्न आपले या ब्लॉगचा हेतू फक्त छत्रपती महाराज, छत्रपतीं संभाजीराजे आणि गड-किल्ले यांची महती, इतिहास हे सर्व माहिती जगासमोर यावी आणि लोकांपर्यंत पोहचावा एवढाच आहे, दुसरा कोणताही नाही. तरी या शिव-कार्यांत आपल्या सर्वांची साथ मिळावी हीच शिव-इच्छा. माझी नोकरी करत मी हा ब्लॉग तयार करत आहे. तो पूर्णत्वास नेणे हे तो श्रींची इच्छा. या सर्वांसाठी कोणत्याही प्रकारची मदत तुमच्याकडून होणार असेल तर तुम्ही ती मला  इमेल (badrinath.kadam@gmail.com ) करू शकता.

या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेले काही माहिती मी स्वत जमाकेली आहे. त्यातील काही माहिती इंटरनेट वरील, काही माहिती बुक मधील आणि काही महिती हि facebook वरील महाराजावरील ग्रौप मधील पोस्टचा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे, त्या पोस्ट वर पोस्ट करण्यार्याचे नाव लिहिले आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल, वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी मी ती पोस्ट मध्य अड्ड करेल .

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल… धन्यवाद…!!!



ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
शूरता हा माझा आत्मा आहे,
वीरता आणि विवेक हि माझी ओळख आहे.
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहेत.

"क्षत्रियकुलावतंस" हा माझा धर्म आहे.
होय मी मराठ्यांचा अंश आहे ..!!
 मी "मराठा" आहे.
!!..जयोस्तु मराठा..!!
- बद्रीनाथ मदनराव कदम.
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
                                                    एक आवाज... एकच पर्याय...बोला...
                                  जय जीजाऊ _ जय शिवराय _  जय शंभूराजे
                                   

[ सूचना : काही प्रतिक्रिया द्यायची असेल , माझ्याशी संपर्क साधायचा असेल, काही माहिती पाठवायची  असेल  किंवा या ब्लॉग संदर्भात काही तांत्रिक समस्या असेल, तर तुम्ही माझ्या ईमेल आय.डी badrinath.kadam@gmail.com  वरून संपर्क करू शकता. ]

No comments:

Post a Comment