Tuesday, 13 March 2012

|| मृत्युंजय अमावस्या ||

धर्मवीर,  मृत्युंजय छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधी
स्थळ : श्रीक्षेत्र वढू बु. ता. शिरूर, जी. पुणे.

" इस्लाम स्वीकारण्यास नकार देऊन औरंगजेब बादशहाचा अपमान करणाऱ्या शंभूछत्रपतींनी ज्वलंत इतिहास निर्माण केला. बलाढ्य शत्रूसमोर न झुकणार्या राजांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जगाला दाखवला. आपल्या प्राणांचे मोल देऊन त्यांनी पवित्र हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यांच्या तेजस्वी बलिदानामुळे महाराष्ट्र पेटून उठला ! स्वधर्माच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या मराठ्यांनी इस्लामी आक्रमकांची थडगी बांधून हिंदुस्थानची शान राखली ! अशक्य ते शक्य झाले केवळ शंभू छत्रपतींच्या बलिदानामुळे ! त्यांनी मंदिराचे कळस आणी घरापुढची तुळस यांचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण ( मृत्युंजय अमावस्या ) ठेवणे हे प्रत्येक हिंदूचे पवित्र्य कर्तव्य आहे."

सर्व शिव - शंभू भक्तांनो ....
 
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, याची जाण ठेऊन दर वर्षी मृत्युंजय अमावस्याला महाराजांचे समाधी स्थळ : श्रीक्षेत्र वढू बु. ता. शिरूर, जी. पुणे. यथे लाखोंच्या संखेने महाराजां
च्या बलिदानाचे स्मरण आणि समाधीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी उपस्थित राहत जावे. 

स्वराज्याला लाभला छत्रपति  दुसरा ....
धन्य धन्य जाहला स्वराज्य आमुचा ....
नमला आदिल , निजाम ,सिद्धि अन फिरंगी...
पण माजला औरन्ग्या जेंव्हा दिवंगले अमुचे थोरले महाराज ....
लाखाच सैन्य अन करोड़ोंचा माज म्हणे तुडवून टाकू स्वराज्य आज ....
तेंव्हा गरजला सह्याद्रीचा तरणा छावा...
जोवर असेल हा छावा तोवर स्वराज्यावर काय करेल औरन्ग्या दावा ...
लाखो लढले पण हजारो पुरले.....
जंजिरा हादरला , चिक्क्देव रडला , गोवादुभंगला ,
अन औरन्ग्या ताज विरहित जाहला जेंव्हा छावा गुरगुरला....
गिधाड गर्दी जमली ,अन निसर्गही कोपला...
४ वर्ष दुष्काळ पडला ,स्वराज्य घोड्यावाचून ओस पडला ...
स्वराज्य धान्या वाचून कुपोषित पडला....
तरी निधड्या छाती ताणून उठल्या ...
शम्भू राजा तुझ्या करता लढता लढता मरूअन स्वराज्य जपु म्हटल्या ....
राजा लढ़ म्हणतो पण नायक खांद्याला खांदा लावून लढतो......
असा माझा शम्भू राजा, राजा नव्हे तर नायक जाहला .....
मृत्यु नंतर ही मृत्युंजय म्हणून जगला. .!!


॥छत्रपतीँ शंभूराजे॥


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

No comments:

Post a Comment