१. चिलखत (आर्मर) :
चिलखत शरीरसंरक्षक कवच व एक युद्धोपयोगी साधन. चिलखताचा वापर शत्रूच्या वारापासून संरक्षण करण्याकरिता होई.चिलखत मुख्य:ता धातूपासून बनविले जाई.कित्येक वेळा प्राण्यांच्या कातडीचा चिलखत म्हणून वापर होई.चिलखत हे नेहमी वजनाने हलके परंतू मजबूत असे.
मनुष्येतर प्राण्यांना निसर्गतःच स्वसंरक्षणाची साधने, उदा., केस, जाड कातडी, नखे, रंग बदलणे वगैरे उपलब्ध असतात; परंतु मानवाला मात्र स्वसंरक्षणासाठी अशा तऱ्हेचे एकही नैसर्गिक साधन उपलब्ध नसते. म्हणून चिलखतांचा वापर करून मानवाने आघात-प्रत्याघातापासून आपल्या स्वसंरक्षणाचा प्रश्न सोडविला आहे. प्राचीन काळी तलवार, भाला, गदा, इ. शस्त्रांच्यां घातक वारांपासून अगर अर्वाचीन काळी बंदुकीची गोळी, वेगाने उडणारे तोफगोळ्यांचे तुकडे इ. अस्त्रांच्या घातक माऱ्यापासून शरीरसंरक्षणासाठी शरीरावर किंवा वाहनांवर चढविण्यात येणारे युद्धोपयोगी संरक्षक साधन म्हणून चिलखताचा वापर रूढ आहे.

ढालीचा वापर प्रामुख्याने शत्रूच्या तलवारीच्या वारापासून बचाव करण्यासाठी
होतो.ढाल प्रामुख्याने वेगवेगळ्या धातूपासून बनविली जाते. त्यामुळे ती
टिकाऊ राहते,कित्येक वेळा ढालीचा वापर शस्त्र म्हणून केल्याची इतिहासात
नोंद आहे.धातूची ढाल वजनाने जाड असल्यामुळे,प्राण्याच्या कातडीपासून हलकी
ढाल बनविली गेली आहे,यात प्रमुख्याने गेंडा, हत्ती व कासवाच्या पाठीपासून
केलेल्या ढाली आढळतात.या ढाली मजबूत असल्या तरी तलवारीच्या वारात तुटल्याची
इतिहासात उदाहरणे आहेत.नरवीर तानाजीने सिंहगडाच्या लढाईच्या प्रसंगी
जेव्हा स्वत: ची ढाल तुटली तेव्हा हाताला कमरेचा शेला गुंडाळून त्यावर
शत्रूचे वार झेलले.
३. भाला :
भाला हे भू सेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र आहे. भाल्याला दंडशस्त्र असेही म्हणतात. भल्ल (भाल्याचे पाते) या संस्कृत शब्दापासून भाला शब्द रूढ झाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते. भाल्याने झालेली जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. बाण हे भाल्याचे छोटे स्वरूप होय. हलके व आखूड भाले शत्रूवर फेकता येतात. द्वंद्वयुद्धात अंगाशी न भिडता भाल्याचा उपयोग केला जाई.
मराठ्यांना भाला व तलवार ही बंदुकीपेक्षा अधिक प्रिय वाटत. |
४ . पट्टा (दांडपट्टा) :
पट्टा ही वजनाने हलकी परंतू घातक अशी तलवार होती.एकापेक्षा जास्त शत्रूंशी झुंजण्यास याचा खुप चांगला वापर होई.पट्टा तलवार ही मुख्यत: धातूपासून बनविली जाई.तलवारीचे पाते लांब व हलके असल्यामुळे शत्रूवर हल्ला करण्यास सोयीचे जाई.
५. कुलपे :
कुलपे कुलूपांचा वापर शत्रूपासून,चोरापासून किल्याचे तसेच घरांचे संरक्षण करण्याकरिता होतो.कुलूपे मुख्य:ता धातूपासून बनविली गेली असल्यामुळे अत्यंत मजबूत असतात.कुलूपे वेगवेगळ्या आकारात आढळतात,प्राचीन काळातील कित्येक कुलूपावर नक्षीकाम आढळून येते.
तोफगोळा तोफगोळ्याचा वापर हा तोफेसाठी होई.तोफेच्या तोंडातून तोफगोळा आत सरकवून वरून बत्ती देत.छत्रपति शिवप्रभूंनी तसेच छत्रपति संभाजीराजेनी स्वराज्यात ठिकठिकाणी तोफगोळे बनविण्याचे कारखाने उभे केले होते,जेणेकरून परकियावर तोफगोळ्यासाठी अवलंबून राहता येऊ नये.
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|| ॥जय जिजाऊ॥ ॥जय शिवराय॥ ॥जय शंभूराजे॥ ॥जयोस्तू मराठा॥ |
No comments:
Post a Comment