रणझुंझार मुरारबाजी |
मुरारबाजी हे मराठा सैन्यातील वीर होते इ.स. १६६५ साली मुघलांनी घातलेल्या
पुरंदराच्या वेढ्यात मराठा सैन्याचे नेतृत्व करत कणखर झुंज दिली. मात्र
मुघलांनी केलेल्या सुलतान वेढ्याला प्रतिकार करताना ते मारले गेले
.जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांशी झडलेल्या संघर्षात शिवाजीराजे भोसले यांना
मोऱ्यांच्या सैन्यातून लढणाऱ्या मुरारबाजीच्या युध्द् कौशल्याचे विलक्षण
कौतुक वाटले. स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात अशा शूर मोहऱ्याचा उपयोग होईल
हे जाणून जावळीच्या विजयानंतर शिवाजीराजांनी मुरारबाजीला मराठा
साम्राज्याच्या सैन्यात दाखल करून घेतले. पुढे मुघल सरदार दिलेरखानाने इ.स.
१६६५ साली घातलेल्या पुरंदराच्या वेढ्यात मुरारबाजीने गडावरील सैन्यास
घेऊन किल्ला झुंजवायची शर्थ केली आणि त्यात ते अमर झाले.
ऐसा कायस्थ ब्राम्हण पुन्हा होणे नाही त्यांना मानाचा मुजरा...!!!
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment