Tuesday, 19 February 2013

१९ फेब्रुवारी जगाच्या इतिहासतील एक सुवर्ण दिवस....



१९ फेब्रुवारी याच दिवशी हिंदुस्तानात स्वांतंत्र्याची अखंड मशाल पेटवणारे, स्वातंत्राची नवी उर्मी जागृत करणारे, पराक्रम व देशप्रेमाची जाज्वल्य परंपरा निर्माण करणारे, रयतेवर जीवापाड माया करणारे, ३५० वर्षानंतरहि १२५ कोटी देशवासीयांच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त झालेले शौर्य, धैर्य, पराक्रम यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, राजमान्य, राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी , क्षत्रीयकुलावतंस, सिँहासनाधीश्वर, महाराजाधिराज जाणता राजा श्रीमंत योगी श्री ।। छत्रपती शिवाजी महाराज ।। .....  हे महाराष्ट्राच्या पावन मातीत किल्ले शिवनेरी वर जन्मले.........

पुत्र कोणाला झाला ?
पुत्र जिजाबाईसाहेबाना झाला !
पुत्र शहाजीराजांना झाला !!
पुत्र सह्याद्रीला झाला !!
पुत्र महाराष्ट्राला झाला !!!
पुत्र अवघ्या
हिंदुस्तानाला झाला !!


संपूर्ण हिंदुस्तानाला आपल्या घोड्यांच्या टापांखाली रगडणार्‍या मोघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांना ज्यांनी सळो-की-पळो करून सोडले... सडेतोड जवाब देऊन आपली जागा दाखवून दिली, इथल्या मातीत आणि या मातीतल्या मावळ्यांच्या मनात व आचरणात ज्यांनी स्वाभिमान, स्वातंत्र्य पेरलं व ह्या भूतलावर जन-सामन्यांचे अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि अश्या स्वराज्याचे पहिले 'छत्रपती' झाले..........


अश्या शिवकल्याण जाणता राजा छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सव या सोनेरी दिवसाच्या सर्व शिवभक्तानां आणि शिवरायांच्या मर्द मावळ्यानां खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा ...!!!


महाराष्ट्राचा स्वाभिमान .... मराठ्यांचा अभिमान.... आपले पूर्वज ...... आमची... आन ...बाण....आणि ...शान ...फक्त छत्रपती शिवराय...!!!!!!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 


Friday, 15 February 2013

शिवरायांचे शिलेदार - सरसेनापती धनाजीराव जाधवराव

|| सरसेनापती धनाजीराव जाधवराव ||
जन्म - इ स १६४९
मृत्यू - इ स १७१०

धनाजी जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता.

छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी सारख्या ८००-९०० मैल दुर असलेल्या प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि ईथुनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फोज फाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते राजे बनले.
त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत असे त्यामूळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली व वतनदारीस सुरुवात् झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाउन मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल व भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.
धनाजी जाधवराव , संताजी घोरपडे हे दोघे सरदार होते ,दोघेही देशप्रेम नावाची चिज बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन अकस्मात माघार घ्यायची. "स्वराज्य" ही कल्पना टिकवुन ठेवन्यासाठी ह्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.

राजाराम महाराजांच्या काळात धनाजी जाधवराव यांनी फलटण च्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई देवून शास्तेखान व रणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी
" वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून 'जयसिंगराव' हा किताब दिला "

राजाराम महाराजांचा मुक्काम हा पन्हाळगडावर सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत होता, २६ सप्टें १६८९ या दिवशी राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरून गुप्त वेश धारण करून पलायन केले. राजाराम महाराज पन्हाळगडावर असताना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांनी मोघली सैन्यावर छापे घालण्यास सुरवात केली. त्याची एक नोंद मिळते ती अशी
“…. शत्रूस उपद्रव करण्या हेतू रामचंद्रपंत यांच्या आज्ञेनुसार संताजी घोरपडे, आणि धनाजी जाधव यास शेख निजामावर पाठवले, निजामाला जिंकण्यासाठी गेलेल्या संताजी घोरपडे आदिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून नंतर त्याचे हत्ती-घोडे पुष्कळ द्रव्य हरण केले. तेव्हा अंगावर जखमा झालेला निजाम जीव वाचवून पळून गेला”
राजाराम महाराज चंदी प्रांतात(जिंजी) जाताना धनाजी जाधवराव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना ' साहेबनौबत ' हे पद दिले ,पुढे काही कारणास्तव सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर इतराजी झाली त्यावेळी सेनापती पद धनाजी जाधवराव यांच्याकडे दिले,
इ.स १७०६ मध्ये सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले होते व त्यांनि बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद करून मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात परत आले होते.
मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातार्यास पोहचले. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाईने शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला; तथापि शाहू महाराजांनी स्वत:स सातार्यास राज्येभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८) . शाहू महाराज हेच खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.

संदर्भ :-
१) केशवपंडित विरचित ‘राजारामचरितम’
२)मल्हार रामराव चिटणीस बखर

सौजन्य- इतिहासाच्या वाटेवर

 नोट : वरील सर्व माहिती " ||विरराजे युवा प्रतिष्ठान|| " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (- गणेश रामचंद्र कारंडे) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.

माझ्या स्वराज्यातील गवताची काडी सुद्धा गाहाण पडता कामा नये ...


स्वराज्या साठी शिवाजी महाराजांना कर्ज हवे होते...
शिवाजी महाराज सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी साठी गेले…
तेव्हा सावकार म्हणाला महाराज तुम्ही कोण म्हणून आलात...
छत्रपती म्हणून आलात कि कर्जदार म्हणून आलात...
तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले...
मि छत्रपती कर्जदार म्हणून आलो आहे..
तेव्हा सावकार म्हणतो जर असे असेल तर ...
तुम्हाला काही तरि गाहाण ठेवावे लागेल ...
शिवाजी महाराज म्हणतात अरे माझ काय आहे सर्व काही स्वराज्याच आहे मी काय गाहाण ठेवणार...
तेव्हा सावकार म्हणतो जर तुमच्या कडे ठेवण्यासाठी काही नसेल तर कर्ज मिळणार नाही....
बाजूला पडलेली गवताची काडी शिवाजी महाराज उचलतात व सावकारा कडे गाहाण ठेवतात व कर्ज घेतात.
महाराज सुरतेची मोहीम काढतात व सुरत जिकून येतात...
शिवाजी महाराज आणि कोंडाजी घेतलेले कर्ज देण्यासाठी सावकाराच्या घरी जातात..
सावकाराचे कर्ज परत फेड करतात आणि आपल्या स्वराज्यातली
गाहाण पडलेली गवताची काडी परत मागतात...
तेव्हा कोंडाजी म्हणतो…
"" महाराज त्या गावाच्या काडीची किमंत काय घेतली काय अन न घेतली काय ""... 

तेव्हा महाराज म्हणतात ....

""
नाही
कोंडाजी,  माझ्या स्वराज्यातील गवताची काडी सुद्धा गाहाण पडता कामा नये  ""...

एक आवाज... एकच पर्याय...
बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||



Tuesday, 12 February 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले हरिहरगड ।।


हरिहर किल्ला

किल्ल्याची उंची : -----
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः .....
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम



नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. 

इतिहास : 
अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.
असा हा त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे : 
हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पाय-यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देईल, याबद्दल मनात तिळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. शेवटी साधारण नव्वद पाय-यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वा-याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.
हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात.
या  पुढे गेल्यानंतर आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. गडावर ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा दरबार येथून जाणा-या-येणा-यांचे लक्ष वेधून घेतो.या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण १३० पाय-यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.
पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.
 
गडावर कसे जाल :
हरिहरला भेट देण्यासाठी आपण नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणार आहेत त्यांना सोईचा असा एक दुसरा मार्गसुद्धा आहे. त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणा-या बसने त्यांनी साधारण १५ कि.मी. चा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाटयावर उतरावे. येथून कळमुस्ते मार्गे साधारण ४ कि.मी.ची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडीजवळ येऊन पोहोचतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या रम्य वाटेवर एक आश्रम, त्याच्या शेजारी प्राचीन दगडी पुष्करिणी व गणेश मंदिरही आपणास पाहता येते. निरगुडपाडयावरून काय किंवा हर्षवाडीकडून काय, दोन्ही वाटा आपणास साधारण तासाभराच्या पायपिटीनंतर हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर आणून सोडतात.

राहण्याची सोय : राहण्याची सोय नाही.

पाण्याची सोय : पाण्याची व जेवणाची सोय स्वतः करावी.

गड पाहण्यासाठी लागणारा वेळ : साधारणता २-३ तास लागतात.

नोट : वरील सर्व माहिती  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट -by  (संकलन - फक़्त राजे) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

छत्रपती शिवराय एक युगपुरुष...


सूचना : हि पोस्ट  - अजय वीरसेन जाधवराव ( Admin - गडवाट परिवार ) यांनी गडवाट या facebook वरील ग्रौप  पोस्ट केली होती.  मला ती आवडली म्हणून मी खास आपल्या साठी इथे पोस्ट कारत आहे.



""""" छत्रपती शिवराय एक युगपुरुष...युग पुरुष म्हणजे लाखो वर्षांनी जन्माला येणारे नरश्रेष्ठ...एक जाणताराजा .
परंतु आजकाल ह्या महान युगपुरुषाला एका विशिष्ट चौकटीत बांधून त्यांचा वापर एक "brand ambassador " म्हणून सध्याच्या घाणेरड्या राजकारणा साठी केला जातो... त्यामुळे छत्रपती शिवरायांचे अनेक दुर्लक्षित पैलू जगासमोर येतच नाहीत....किंवा ते पैलू जाणूनबुजून जगासमोर आणले जात नाहीत.... अहो देवगिरी साम्राज्याचा अस्तानंतर ह्या हिंदुस्तानाने खरे खुरे हिंदुस्तानी राज्य अनुभवले असे तर ते छत्रपती शिवरायांच्या रूपानेच ...८०० वर्षांचे जुलमी यवनी साम्राज्य मुळासकट उलथवून टाकणारे एक अद्वित्य व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवराय.

कोण म्हणते शिवराय कट्टर हिंदू होते त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले, कोण म्हणते ते कट्टर मराठा होते त्यांनी मराठ्यांचे राज्य स्थपन केले तर कोण म्हणते शिवराय निधर्मी होते त्यांनी बहुजानानाचे राज्य स्थापन केले.एवढीच ओळख आहे का ह्या युग-पुरुषाची ???

अहो आज आपण जे छत्रपती बघतो किंवा आपल्या ते दाखवले जातात ते एका हिमनगाचे छोटेसे टोक आहे ह्या टोकाखाली दडलेला महाकाय हिमनग आपण पाहत नाही किंवा पहायचे धाडस आपण करत नाही ...शिवरायांच्या नावाने घोषणा देताना सर्वप्रथम नाव कुणाचे घ्याचे ह्यावर आपण वाद घालतो, शिव जयंती तिथीप्रमाणे कि तारखे प्रमाणे साजरी करण्याहून वाद घालतो... हे फारच दुर्दैवी आहे आपले. आज शिवरायांच्या विचारांपेक्षा त्यांच्या विचारांबाबत आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे दर्शवन्यातच आपण धन्यता मानतो...शिवरायांचे विचार वाटून खाण्यात ती काही आपल्या पूर्वजांची मालमत्ता नाही...शिवरायांच्या जीवनावर आधरित दोन पुस्तके अथवा कादंबऱ्या वाचून आपल्याला शिवरायांचा ५० वर्षांचा संपूर्ण इतिहास समजला असे जर कोण समजत असेल किंवा तसा आव आणत असेल तर ते हास्यास्पद आहे.

संपूर्ण शिवराय समजने हे काही एका जन्माचे काम नव्हे, त्याला कितीतरी जन्म घ्यावे लागतील. वयाच्या १८व्या आपल्या अलौकिक बुद्धीचे व प्रगल्भ युद्धनीतीचा वापर करत आदिलशाह विरुद्ध लढलेल्या पहिल्या घोषित युद्धात म्हणजे पुरांधारच्या पहिल्या युद्धात महाराजसाहेबांनी कशी सरशी केली होती ह्यावर पण चर्चा करत नाही.. महाराजानी जवळ जवळ ३५० गड-किल्ले बांधले अथवा त्यांचा जीर्नोधार केला पण त्या-प्रत्येक गड-किल्ल्याचा वापर महाराजानी का व कसा केला ह्यावर कोण वाद घालत नाही.....हल्ली चर्चा होती ती फक्त त्यांच्या धर्मकारणाची .... चर्चा करायचीच असेल तर शिवरायांच्या पराक्रमची करा...समाजकारणाची करा...राजकारणाची करा..त्यांच्या युध्नितीची करा ...आणि ह्यातूनच खरे शिवराय आपल्याला व संपूर्ण कळतील. """""
 

""" शिवरायांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा शिवरायांचे विचार जर आपण आपल्या डोक्यात खोलवर रुजवले तर हा भारत देश जगातील सर्वशक्तिमान महासत्ता होण्यास जास्त वेळ लागणार नाही  """ सच्च्या शिव-भक्ताचे हेच उद्धिष्ट असावे.

आपला,
बद्रीनाथ मदनराव कदम.

एक आवाज... एकच पर्याय...
बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||