Monday, 20 February 2012

|| शिवबाची शिवशाही ||

!! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !!

राजेशाहीचे नाव जरी

स्वराज्याची ग्वाही होती

लोकशाहीस प्रेरणा देणारी

शिवबाची शिवशाही होती

स्वराज्य संकल्पक बाप,

दृढनिश्चयी आई होती

आत्मभान जागविणारी

शिवबाची शिवशाही होती

समता अन मानवतेची

रात्रंदिवस द्वाही होती

सह्याद्रीचा माथा उंचविणारी

शिवबाची शिवशाही होती

ना जातीभेद, ना धर्मभेद

प्रजानिष्ठा ठायी ठायी होती

स्वामीनिष्ठेने भारलेली

शिवबाची शिवशाही होती

आत्मभानाची पेटती मशाल

जिथे स्वराज्याची घाई होती

शत्रूस चळाचळा कापविणारी

शिवबाची शिवशाही होती

मातीस फाटाफुटीचा शाप,

जरी आपसात दुही होती

त्या सर्वाना मिटविणारी

शिवबाची शिवशाही होती

हे पडती शब्द अपूरे

याहूनही बरेच काही होती!

स्वातंर्त्याची गाथा रचणारी

शिवबाची शिवशाही होती!!
                                  
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

No comments:

Post a Comment