Monday, 27 February 2012


## लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ##

    आपल्या मराठीदिनी अर्थात २७ फेब्रुवारीला मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. सुरेश भटांनी लिहिलेल्या या गीताला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे.
 सर्वप्रथम ’स्टार माझा’ वर हे गीत जेव्हा सादर झाले तेव्हा खूप छान वाटले. एक गीत ११२ गायक व ३५६ समूह-गायकांनी गायले आहे, व ते गीत मराठी आहे याचा विशेष आनंद वाटला. मराठीतील सर्वच गायक यात गायले आहेत. मराठीत गाणारे अमराठी गायक हरिहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, हंसिका अय्यर यांना पाहून खरोखर ’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ याची प्रचिती आली.
हे गीत शब्दबद्ध करावेसे वाटले...


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी 
आमच्या लहानग्यात रांगते मराठी 
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी 
आमच्या घराघरात वाढते मराठी 
आमच्या फुलाफुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात भासते मराठी 
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी॥

येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी...!!!



मराठा तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा…!!!!
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान…!!!!


॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभूराजे ॥
॥ जयोस्तू मराठा ॥
!! जय महाराष्ट्र !!



No comments:

Post a Comment