Tuesday, 14 February 2012

ll मेघडंबरी ll




शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ??

शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ??
... नाही मावळे तिथे ...नाही आऊ साहेब तिथे ...
पुन्हा उभारण्यासाठी "हिंदवी स्वराज्याच लढा "
नाही रक्त तेथील सळसळते ...
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???

नाही समय कोणाकडे ...
नाही काळजी कोणाला कोणाची ....
वेळ पडली तर विकतील जमीर स्वताच ..
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???

नाही काळीज सिंनेत ....नाही मनगटात दम ...
पुरुषार्थ ही विसरलेले भूतलावरील माणूस ....
काळिमा ही फासला स्वतःच्या मुख्यावर ....
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???

विसरलं धर्मच आदर ...विसरलं स्त्रीरांच मातृत्व ...
विसरलं कर्तव्य माता पित्याच...विसरलं स्वाभिमान जगण्याच ...
लाजीरवाण्या आयुष्य जगण्यासाठी...
कशाला येवू आम्ही भूतलावर- शिवबा म्हणे !!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान...

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
!! जयोस्तू मराठा !!




No comments:

Post a Comment