मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!! | ||
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!! | ||
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!! | ||
... वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!! | ||
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!! | ||
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर | ||
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!! | ||
अन ह्यापैकी काही जमत नसेल तर.. | ||
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..! | ||
महाराजांच्या ह्या
महाराष्ट्रात जन्म घेऊन !
|
शिवकल्याण राजा।। निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती।गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत,सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा।। आचरशील, विचारशील,दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धर्माचा अभिमानी राजा | देशाचा संरक्षक राजा || कितीक झाले आणि होतील | राजे असंख्य जगती|| परी न शिवबा समान होईल॥या अवनीवरती, राजे छत्रपती॥शिवकल्याण राजा।। ॥जय जिजाऊ॥॥जय शिवराय॥॥जय शंभूराजे॥॥जयोस्तू मराठा॥
Tuesday, 17 January 2012
देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment