Thursday, 5 April 2012

इतिहास ३ एप्रिल १६८० ...........


छत्रपती शिवराय यांची किल्ले रायगडावरील समाधी

"" ३ एप्रिल १६८०  हा जगाच्या इतिहासतील एक काळाकुट्ट भयाण दिवस , ह्या दिवशी दगडाचा सह्याद्री अश्रूंनी भिजला होता, त्या दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने टाहो फोडला होता........याच दिवशी शौर्य,धैर्य, पराक्रम,नितीमत्ता,प्रजाप्रेम,स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर ह्या सकल त्रिलोकाचे पालन...कर्ते,तारणहार राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मी अलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापी महाराज...ाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले.. या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला. पण शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर राहतील..""


ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक,अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम.. अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय पण गद्दरानो ख़बरदार,हा झंझावत पुन्हा जागृत होईल, लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल, ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल .व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल.. ll करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही ll ll विझून माझी चिता युगे लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून काही....

अखंड विश्वातील मराठ्यांकडून महाराजांना विनम्र अभिवादन !! 
आमची आन बाण अन शान फक्त छत्रपती शिवराय .. 
राजे तुम्ही आहात या मराठ्यांच्या नसा-नसात आणि या धमन्यात वाहणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा-थेंबात..... !!!
!!..जय मराठा, जयोस्तु मराठा..!!
(साभार : गडवाट-प्रवास सह्याद्रीचा)





राजे तुम्हाला
या छोट्याश्या शिवभक्ताकडून ञिँवार मानाचा मुजरा .…!!!


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

No comments:

Post a Comment