वाघनखे |
पूर्वीच्या काळी वाघनखांचा वापर गुप्त हत्यार म्हणून केला जाई,अत्यंत छोटे परंतू घातक असे हे हत्यार आहे.
स्वराज्यावर चालून आलेला अफजलखाना सारखा मातब्बर व बलाढ्य शत्रू ,छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारल्यामुळे “वाघनखं” हे हत्यार इतिहासात अमर झाले.
वाघनखं हे प्रामुख्याने भारतात विकसित झालेले, सहज वाहून नेण्याजोगे व स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारे शस्त्र आहे.
वाघनखासारखी वेगळी व शत्रूला चकीत करणारी हत्यारे बनविताना त्या-त्या प्राण्यांच्या पंजाचा, वार करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जात असे. वाघनखांप्रमाणेच अस्वली कट्यार, सिंहाचा पंजा अशी हत्यारे मध्ययुगात अस्तित्वात होती, पण त्यांना वाघनखांप्रमाणे प्रसिध्दीचे वलय लाभले नाही.
वाघनखं हे लोखंडापासून बनविलेले शस्त्र असून धातूच्या पट्टीवर चार धारदार, टोकदार, अर्धवर्तुळाकार (आतल्या बाजूस वळलेली) धातूची नखे असतात. ही नखं ज्या धातूच्या पट्टीवर बसवलेली असतात, त्या पट्टीच्या दोन टोकांना अंगठीसारख्या कड्या असतात. या कड्या पहिल्या बोटात व करंगळीत अडकवून मूठ बंद केल्यास वाघनखं हातात बेमालूमपणे लपून जात.

ही वाघनखे देखिल अनेकांनी हाताळली असतील अगदी ज्याने बनविली त्या पासून आत्ता पर्यंत .. पण त्यात वाघाचे जिगर ओतले ते शिवरायांनी ... ही वाघनाखे साक्ष आहे ज्वलंत इतिहासाची .. धर्माचा अधर्मावर झालेल्या विजयाची ... सत्याला प्रिय असणार्या आणि जनतेची जाण असणार्या राजाची ... आसमानी संकटासमोर उभ्या राहिलेल्या साम्राज्याची ... अश्या गोष्टीच आठवण करून देता आपल्या मातीची खरी अमुल्यता ...!!!!
होय हीच ती वाघनखे जेव्हा अफजलखानाबरोबर छत्रपति शिवरायांची प्रतापगडाच्या पायथ्याला भेट
झाली, त्यावेळी जेव्हा खानाने छत्रपति शिवरायांना मारण्याचा प्रयत्न
केला, तेव्हा छत्रपति शिवरायांनी ह्या वाघनखांचा वापरकरून खानांस ठार मारले.
नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा| |
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment