संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे
नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून
अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल
सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या
मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत
नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे
औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे
धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य
भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या
स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या
शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका
मोहिमेचा हा किस्सा .......
शंभूराजानंतर राजाराम
महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच
राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य
होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून
राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार
स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा
आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या
गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या
औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ?
कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि
धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी
चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि
औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात
सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा
कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा
झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा
माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला
मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत
दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी
सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका
मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा
सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली,
औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे
लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा,
पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ
येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती
पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच
त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा
आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत
घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय
भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर
धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत
होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या
अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या
तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच
हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे
औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे
प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून
टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन
संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची
सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी
मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा .......!!!
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment