चंद्रगड किल्ला |
प्रतापगड, रायगड, तोरणा या किल्ल्याच्य बरोबर खालच्या दरीत दबा धरुन बसलेला चंद्रगड किल्ला आहे. हा किल्लाही आपले लक्षवेधून घेतो. चंद्रगडाचे दर्शन जरी महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट कडून होत असले तरी चंद्रगड हा रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यामधे आहे.
इतिहास :
या
किल्ल्याला ढवळगड या नावाने पण वोलाखले जाते. कारण ढवळीनदीच्या खोर्यात
हा चंद्रगड पुर्वी जावळीच्या मोर्यांच्या अखत्यारीत होता. जावळीच्या
मोर्यांना चंद्रराव हा किताब होता. हा चंद्रराव वारल्यावर या गादीसाठी
मोर्यांमधे तंटा उभा राहीला. शिवाजीराजांनी मध्यस्ती करुन तो मिटवला आणि
येथील यशवंतराव मोरे हा चंद्रराव झाला. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या
चंद्ररावाने त्यांच्याच विरुद्ध जावून आदिलशाहीशी सलोखा वाढवला.
महाराजांच्या लोकांनाच त्रास देवू लागला. शिवाजीराजांनी चंद्ररावाला
सामोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले.
महाराजांच्या राज्यात गुन्हे करुन शिक्षेच्या भितीने काही गुन्हेगार पळून
या मोर्यांच्या आश्रयाला गेले त्यांना उघडपणे मोर्यांनी पाठीशी घातले. हे
गुन्हेगार महाराजांच्या ताब्यात न देता उलटच निरोप महाराजांना पाठविला.
उद्या येणार असाल तर आजच या. जावळीस येणार असाल तर दारु गोळा मौजूद आहे.
जावळी प्रांत वाईच्या सुभ्यात मोडत होता. वाईची सुभेदारी अफझलखानाकडे होती. त्यामुळे जावळीवर हल्ला केला तर अफझलखान नक्की येणार हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे महाराज संधीची वाट पहात होते. इ.स.१६५५ -५६ मधे अफझलखान दक्षिण भारतात युद्धात गुंतलेला होता ती वेळ साधून महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. मोर्यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले.

गडावर जाण्याच्या वाटा :
ऑर्थर सीट जवळून एक पायवाट खाली चंद्रगडाकडे जाते. ही वाट ढवळ्याघाट या नावाने ओळखली जाते. जंगल घसारा, ओढेनाले यामधून जाणारी ही धाटवाट अनेकांना गुंगारा देते. त्यामुळे गरजेची साधन सामुग्री म्हणजे अन्न, पाणी आणि सोबत माहीतगार वाटाडय़ा घेवूनच या मार्गावर चालू लागावे. चंद्रगडापर्यंत पोहचण्यात साडेतीन ते चार तास लागतात.

सूचना : वाटेत बिबटय़ा तसेच
वन्यप्राण्यांचेही दर्शन होवू शकते हे लक्षात ठेवावे. नवख्यानी मात्र हा
मार्ग चोखाळू नये.
मुंबई-पणजी महामार्गावर पोलादपूर गाव आहे. येथून चंद्रगडाच्या पायथ्याच्या ढवळे गावात जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. ठरावीक वेळेवर एस.टी.बसेसचीही सोय आहे. या गाडीमार्गावर ढवळे गावाच्या अलिकडे सहा कि.मी. वर उमरठ या गावी नरवीर तानाजी मालूसरे आणि शेलार मामा यांची स्मारके आहेत. ती पाहून पुढे जाता येईल.
उमरठ अथवा ढवळे येथे मुक्कामी राहून सकाळी चंद्रगडाला गेल्यास सोयीचे ठरते. ढवळे गावातून सोबतीला वाटाडय़ा अवश्य घ्यावा. पाणी व खाद्यपदार्थ घेवून सकाळी लवकर निघावे. ढवळेगावापुढे पाच मिनिटांच्या चालीवर लहानशी वस्ती आहे. येथून वाट जंगलात घुसते. तासाभराच्या वाटचालीत आपण खिंडीत पोहोचतो या खिंडीला म्हसोबाची खिंड म्हणतात. येथून पुढे चंद्रगडाची वाट काहीशी अवघड होते. लहान कातळ कडे तसेच खेबणीच्या आधाराने माथा गाठता येतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडाचा माथा लहानसा आहे. घराचे चौथरे आणि पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. येथे आकाशाखाली उघडय़ावर शंकराची पिंड आहे. त्याला ढवळेश्वर महादेव महादेव म्हणतात. उंचवटय़ावर वाडय़ाचे भग्नावशेष दिसतात. उत्तर अंगाला पाण्याची टाकी आहेत.
चंद्रगडावरुन रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे समोर दिसतात. याचे उत्तुंग कातळ कडे पहाण्याची मैज काही न्यारीच आहे. चंद्रगडावरुन ढवळ्याघाटाची वाट दिसते. घाटाच्या माथ्यावरची खिंड आणि त्याच्या वर महाबळेश्वरचे ऑर्थर सीट नुसते पाहूनच थरार वाटतो. निसर्गाची लयलूट आणि सह्यद्री रौद्रभिषण दर्शनाने चंद्रगडाची सफर सार्थर झाल्याचे समाधान मिळते.
सूचना : पाण्याची व जेवणाची आपण आपली सोय करावी
मराठ्यांचा अंश मी ...क्षत्रियकुलवंत मी.... || जय जीजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे || |
नोट : वरील सर्व माहिती मला अल्याल्या एका email चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
No comments:
Post a Comment