Monday, 11 March 2013

११ मार्च १६८९ इतिहासातील काळाकुट्ट दिवस......

आजचा दुःखाचा दिवस आहे , मन बैचेन करणारा आणि उदास वाटणारा दिवस आहे.......
- एकदाही पराभव न पत्करणारे, एकदाही माघार नाही, एकदाही तह नाही, सर्वच्या सर्व लढाया जिंकणारेहिंदवी मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभूराजे यांचा बलिदान (स्मृतिदिन) दिन...!!!  
आजही विसलो नाही तुमची ती क्रुर धिंड,
 कस काय राजे तुम्ही एवढ सहण केलय,
 कैद झाला छावा पण स्वाभीमान कैद नव्हता,
ऊभा होता समोर औरंग्याच्या पण नजरेला नजर देत होतात ...
कातड आंगावरच त्यांनी सोलुनही आबासाहेबांचा शब्द तुम्ही जिवापाड जपलाय,
 "" आबासाहेब जोपर्यंत ह्या संभाजीच्या प्राणामद्धे प्राण आहे ना - तोपर्यंत तुम्ही कमावलेला एकही किल्ला तुमच्यापश्चात हा संभाजी मोगलांच्या हातात जाऊ देणार नाही...!! ""
्वतः खूप वेदना सहन केल्या पण आबासाहेबांना दिलेलं वचन शेवटपर्यंत सत्य करून दाखवला...!!
 आज तुम्ही राजे त्या मृत्युलाही हरवलय.....
मृत्यूला घाबरणारे अनेक पाहिले ,
मृत्यूला न घाबरणारे हि अनेक पाहिले ,
पण मृत्यूला घाबरविणारा मी ऐकच पाहिला........
फक्त ....
!! मृत्युंजय छत्रपती शंभूराजा !!
!! सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात हि जात मराठ्यांची !!

" जगावे तर छत्रपती शिवराय यांच्या सारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजीराज्यासारखे". 
 
 महापराक्रमी, रणवीर, मृत्युंजय, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या चरणी शतवार मुजरा !!!
 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 

No comments:

Post a Comment