किल्ल्याची उंची: ----
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः कर्जत
श्रेणी: मध्यम
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
डोंगररांगः कर्जत
श्रेणी: मध्यम
जिल्हा: रायगड
मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड,
ईरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक
किल्ला आहे, त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा, सांकशी, माणिकगड हे या रांगेतील
तीन भाऊ. माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व
प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे. शेती हा
येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे.
गडावर पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यात
प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते. ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे.
तटबंदीमधन आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठ्या दिसतात.
कोठ्यांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी
पायर्या आहेत. येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात. त्याच्या
समोरच जोत्याचे अवशेष दिसतात. येथून डावीकडे फुटणार्या वाटेने पुढे
गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात. यात मे महिन्य़ापर्यंत पाणी असते.
टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे, पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले
बुरुज आढळतात. येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केली त्या जागेपाशी
येऊन पोहचतो. किल्ल्यावरून प्रबळगड, इरशाळगड, कर्नाळा आणि सांकशीच किल्ला
हा परिसर दिसतो. संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.
गडावर जाण्याच्या वाटा :
पनवेल किंवा खोपोली मार्गे यायचे झाल्यास आपटे फाट्यामार्गे रसायनीकडे
वळावे - रसायनीमधून वाशिवली गावात यावे. वाशिवली गावातून वडगाव गावात यावे.
वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड
तास लागतो. वडगाव हे बर्यापैकी मोठे गाव आहे. माणिकगडाची एक सोंड गावातच
उतरलेली आहे. या सोंडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवर चढत जावे. वडगाव
पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो. या डोंगराच्या
माथ्याचर कातरवाडी वसलेली आहे. या वाडीतून गड समोरच दिसतो. गडाच्या दिशेने
चालत निघाल्यावर अर्ध्या तासातच आपण एका जंगलात शिरतो. येथून पुढे
जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जाण्यासाठी लागणारा
वेळ : वडगावमार्गे ३ तास लागतात.
No comments:
Post a Comment