Wednesday, 18 July 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले माहुली ||

माहुली किल्ला
किल्ल्याची उंची : ----- 
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
जिल्हा :  ठाणे  
श्रेणी : मध्यम


किल्ले माहुली हा ठाणे जिल्ह्यातील किल्ला असून चढाई साठी मध्यम श्रेणीचा आहे. 
ठाणे जिल्ह्यात शहापूर-आसनगावाज वळ एक दुर्गत्रिकुट आहे. माहुली-भंडारगड आणि पळसगड मिळून हे बळकट ठाणे तयार झाले आहे. मुद्दाम जाऊन पहावे असे हे ठिकाण कोणाही निसर्गप्रेमी माणसाला आपल्या निसर्गसौंदर्यान वेड लावते. अनेक सुळके असलेला लांबलचक असा हा डोंगर माहुली नावाने ओळखला जातो. माहुलीचे दोन खोगिरामुळे तीन भाग पडले आहेत. उत्तरेचा पळसगड, मधला माहुलीगड आणि दक्षिणेचा भंडारगड.


इतिहास : 


हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काहीच माहिती नाही पण निजामशाहीत हा किल्ला शहजीराजेंकडे होता पण परकीय आक्रमणासमोर सैन्यबळ कमी असल्याकारणे त्यांना तो मुघलांच्या स्वाधीन करावा लागला नंतर शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात शामिल केला. जवळ जवळ ३ वेळा हा किल्ला परकीयांनी हल्ले करून स्वराज्याकडून जिंकून घेतला आहे पण नंतर तिन्ही वेळा शिवरायांनी माहुली किल्ला पुन्हा जिंकला यावरूनच या किल्ल्याचे महत्व काय असावे याचा अंदाज बांधलेलाच बरा.

गडावर जाण्याच्या वाटा:-

मुंबईहून ठाणे मार्गे आसनगाव ला जाणारी आगगाडी असते. आसनगाव ला उतरून ठेतून ५ किमी अंतरावर माहुली हे पायथ्याचे गाव आहे(बहुदा रिक्षा असतात नसेल तर पायीच जावे लागते). 
मुंबई(छत्रपती शिवाजी टर्मिनस) हून सकाळी ६:१० ला आसनगाव गाडी आहे ती ७:०५ ला ठाणे आणि ८:१४ ला आसनगाव ला पोहचते. 

पुणे ते माहुली (किल्ल्याचे पायथ्याचे गाव) अंतर साधारण १८५ किमी आहे. पुण्याहून राष्ट्रीय महामार्ग ४ ने लोणावळा-खोपोली- खालापूर-पनवेल ला यावे पनवेल हून ४ किमी पुढे आले कि कळंबोली सर्कल लागेल तिथून उजवीकडे वळण घेऊन शिळफाटा मार्गाने सरळ यावे पुढे मुब्रा कडे जाणारे दोन रस्ते फुटतात पुढे ते एकाचे ठिकाणी मिळतात पण सरळ मार्गाने आलो तर गाड्यांची जास्त वरदळ असल्याने वेळ लागेल तर डावीकडील रस्त्याने लवकर जाता येते इथून सरळ पुढे यावे काही अंतरावा आल्यावर राष्ट्रीय महामार्ग ३ लागेल तिथे पुन्हा उजवीकडे वळण घेऊन सरळ मार्गे यावे. या मार्गाने येत असताना जवळच्या परिसरात असणारी गावे - माणकोली - सरावली- तळोली - पडघा-वाशिंद(या गावातून मार्ग नाही आपण येणाऱ्या मार्गाने आजू बाजूला असणारी गावे आहेत). वाशिंद गावात जाण्यासाठी उजवीकडे रस्ता आहे तर डावीकडे माहुली किल्ला आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ:- आसनगावातून गडावर पोहचायला २ ते २:३० तास लागतात. १ ते १:३० तास पुष्कळ आहे गड पाहणी करण्याकरिता.

जेवण्याची सोय:- आपण स्वतः जेवणाची सोय करावी तेव्हा प्रत्येकाने पोटभर जेवणाचा डब्बा सोबत  ठेवावा .

पाण्याची सोय:- गडावर पाण्याची सोय नाही तेंव्हा आपण स्वतः पाण्याची सोय करावी लागते.

राहण्याची सोय:गडावर राहण्याची सोय सोय नाही.


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .  

No comments:

Post a Comment