Wednesday 29 February 2012

||| छत्रपती संभाजीराजे यांच्या संपूर्ण कार्किदीचा अल्प परिचय |||


 
    !! हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे !!


छत्रपती  शंभूराजांचा जन्म १४ मे १६५७
सईबाईंचा मृत्यू ५ सप्टेंबर १६५९
अफजलखानाचा वध ११ नोव्हेंबर १६५९
पुरंदरचा तह १३ जून १६६५
शंभू राजे जयसिंगच्या छावणीत १८ जून १६६५
शंभू राजांना मनसबदारी फर्मान २२ सप्टेंबर १६६५
आग्र्या कडे प्रस्थान ५ मार्च १६६६
आग्र्याच्या सीमेवर ११ मे १६६६
आग्र्याचा दरबार १२ मे १६६६
महाराज नजरकैदेत २५ मे १६६६
सुटका १७ ऑगस्ट १६६६
शंभू राजे राजगडावर २० नोव्हेंबर १६६६
शंभूराजे औरंगाबादेस मौअज्जम कडे निघाले ९ ऑक्टोबर १६६७
राजारामाचा जन्म २४ फेब्रुवारी १६७०
शंभू राजांना कारभार सोपवला २६ जानेवारी१६७१
रामनगर जव्हार मोहिमेत १६७२
महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४
जिजाबाईंचे निधन १७ जून १६७४
शंभूराजांचे उपनयन ४ फेब्रुवारी १६७५
महाराजांच्या मृत्यूची अफवा डिसेंबर १६७५
गोवा, उत्तर कर्नाटक, भागानगर मोहिमा १६७५-१६७६
महाराजांचे दक्षिणेकडे प्रयाण ऑक्टोबर १६७६
शंभूराजांचा कलशाभिषेक २३ मार्च १६७८
रायगडास महाराजांचे पुनरागमन ११ मे १६७८
महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यास १० सप्टेंबर १६७८
शंभूराजे सज्जनगडी २०ऑक्टोबर१६७८
दिलेरखानाकडे प्रयाण १३ डिसेंबर १६७८
भूपाळगडाची लढाई २ एप्रिल १६७९
दिलेरखानाकडून सुटका २२ नोव्हेंबर १६७९
विजापुराहून पन्हाळ्याकडे १ डिसेंबर १६७९
पितापुत्रांची भेट १३ जानेवारी १६८०
राजारामाचा विवाह १५ मार्च १६८०
शिवरायांचे निधन ३ एप्रिल १६८०
राजारामाचे मंचकरोहण २१ एप्रिल १६८०
शंभूराजे रायगडावर १८ जून १६८०
पुतळाबाई सती गेल्या २७ जून १६८०
शंभूराजांचे मंचकरोहण २० जुलै १६८०
मोरोपंतांचा मृत्यू ऑक्टोबर १६८०
शंभूराजांचा राज्याभिषेक १६ जानेवारी १६८१
औरंगाबाद, जालना, मेहेकरवरील हल्ले मे १६८१
अकबराचे आगमन १ जून १६८१
रायगडावरील कठोर शासन ऑगस्ट १६८१
सोयराबाईचे निधन २७ ऑक्टोबर१६८१
अकबराची भेट १३ नोव्हेंबर १६८१
मराठ्यांची फौज अहमदनगरावर नोव्हेंबर १६८१
दंडाराजपुरीस वेढा एप्रिल १६८२
रामसेजचा वेढा एप्रिल १६८२
कल्याण – भिवंडीची लढाई मे १६८२
येसूबाईना पुत्र झाला १८ मे १६८२
म्हैसूरकरांशी युद्ध जून १६८२
बादशहाची प्रतिज्ञा ३० जुलै १६८२
रामसिंगला संस्कृत पत्र १६८३
टीटवाळ्याची लढाई मार्च १६८३
तारापूरावर हल्ला १५ एप्रिल १६८३
चौलला वेढा ऑगस्ट १६८३
रुहुल्लाखान परतला एप्रिल १६८३
मोअज्जमची दक्षिणकोकणात रवानगी १३ सप्टेंबर १६८३
दिलेरखानाची आत्महत्या २० सप्टेंबर १६८३
पोर्तुगीजांचा कोकणातील प्रभाव ऑक्ट-नोव्हें १६८३
फोंड्याची लढाई सुरु १ नोव्हेंबर १६८३
शंभूराजे फोंड्यात घुसले १० नोव्हेंबर १६८३
विजरेई आल्व्हारो पळाला ११ नोव्हेंबर १६८३
जुवे बेत जिंकले २४ नोव्हेंबर १६८३
साष्टबारदेशावर चढाई ११ डिसेंबर १६८३
मोअज्जमची फटफजिती फेब्रुवारी १६८४
रायगडावरील फितुरांना अटक ३० ऑक्टोंबर१६८४
शहाबुद्दीनचा पराभव १४ जानेवारी १६८५
धरणगाव लुटले फेब्रुवारी १६८५
विजापूर मदतीसाठी मराठी फौजा रवाना मार्च १६८५
मोगलांचा विजापूरला वेढा एप्रिल १६८५
मराठ्यांची भडोचकडे मोहीम डिसेंबर १६८५
शहाजाद्याकडून माद्दंना आकान्नाचा खून १६ मार्च १६८६
मोअज्जमला बादशहाने कैद केले २१ फेब्रुवारी १६८७
अकबर इराणकडे गेला फेब्रुवारी १६८७
कुतुबाशाहीचा पाडाव २२ सप्टेंबर १६८७
वाईच्या लढाईत हंबीरराव ठार ऑक्टोंबर १६८७
कवी कलशवर गणोजीचा हल्ला ऑक्टोंबर १६८८
शंभूराजांना संगमेश्वरी अटक  १ फेब्रुवारी १६७९
कैद शंभूराजे बहादुरगडाजवळ १५ फेब्रुवारी १६७९
शंभूराजांची धिंड १५ फेब्रुवारी १६७९
बादशहापुढे हजर १५ फेब्रुवारी १६७९
कवी कलश व शंभूराजे यांच्या जीभ व डोळे काढले १७ फेब्रुवारी १६७९
मोघली छावणी भीमातीरी आली ३ मार्च १६८९
कवी कलश व छत्रपती शंभूराजे यांचा अत्यंत निर्दयी निधन ११ मार्च १६८९.

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील माहितीत काही चूक असेल तर मला माफ करावी हि विनंती व मला ती चूक कळवावी मी ताबडतोब माझी चूक दुरुस्त करीन. धन्यवाद ..!!

Tuesday 28 February 2012



   राजे तुम्ही होता..म्हणून तर मराठा आजही वाघ आहे..!!


!! मी मराठा आहे !!

होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
... ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात".


बेधडक मराठी बाणा, उडवितो शत्रूची दैना.....
नादात मराठी भिडला, शमशेर होवुनी लढला.....
कणखर पणा सह्याद्रीचा रांगडा मराठी राणा....
जयघोष हा चाले सदा फुलतच मराठी बाणा.....
मी मराठी, तू मराठी, आम्ही मराठी, जग उंच नभाला भिडवू....
ह्या सह्यपर्वता सारखा ताठ पाठीचा हा कणा.....
चुकवील ना कधी मान सोडील ना मराठीपणा....

मराठ्यांचा अभिमान 

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
मराठ्यांचा नाद खुळा….!!

Monday 27 February 2012


## लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ##

    आपल्या मराठीदिनी अर्थात २७ फेब्रुवारीला मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. सुरेश भटांनी लिहिलेल्या या गीताला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे.
 सर्वप्रथम ’स्टार माझा’ वर हे गीत जेव्हा सादर झाले तेव्हा खूप छान वाटले. एक गीत ११२ गायक व ३५६ समूह-गायकांनी गायले आहे, व ते गीत मराठी आहे याचा विशेष आनंद वाटला. मराठीतील सर्वच गायक यात गायले आहेत. मराठीत गाणारे अमराठी गायक हरिहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, हंसिका अय्यर यांना पाहून खरोखर ’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ याची प्रचिती आली.
हे गीत शब्दबद्ध करावेसे वाटले...


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी 
आमच्या लहानग्यात रांगते मराठी 
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी 
आमच्या घराघरात वाढते मराठी 
आमच्या फुलाफुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात भासते मराठी 
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी॥

येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी...!!!



मराठा तीतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा…!!!!
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान…!!!!


॥ जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय ॥
॥ जय शंभूराजे ॥
॥ जयोस्तू मराठा ॥
!! जय महाराष्ट्र !!



Wednesday 22 February 2012

!! फक्त एकच राजे छत्रपती शिवराय !!




मी मराठा आहे!

होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!

असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
... ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".

दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.

घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.

इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.

आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात".

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||



॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥









Monday 20 February 2012

|| शिवबाची शिवशाही ||

!! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !!

राजेशाहीचे नाव जरी

स्वराज्याची ग्वाही होती

लोकशाहीस प्रेरणा देणारी

शिवबाची शिवशाही होती

स्वराज्य संकल्पक बाप,

दृढनिश्चयी आई होती

आत्मभान जागविणारी

शिवबाची शिवशाही होती

समता अन मानवतेची

रात्रंदिवस द्वाही होती

सह्याद्रीचा माथा उंचविणारी

शिवबाची शिवशाही होती

ना जातीभेद, ना धर्मभेद

प्रजानिष्ठा ठायी ठायी होती

स्वामीनिष्ठेने भारलेली

शिवबाची शिवशाही होती

आत्मभानाची पेटती मशाल

जिथे स्वराज्याची घाई होती

शत्रूस चळाचळा कापविणारी

शिवबाची शिवशाही होती

मातीस फाटाफुटीचा शाप,

जरी आपसात दुही होती

त्या सर्वाना मिटविणारी

शिवबाची शिवशाही होती

हे पडती शब्द अपूरे

याहूनही बरेच काही होती!

स्वातंर्त्याची गाथा रचणारी

शिवबाची शिवशाही होती!!
                                  
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Wednesday 15 February 2012

!! छत्रपती शिवाजी महाराजांचा अल्प परिचय !!

!! महाराष्ट्राचे आराध्य दैवत -छत्रपती शिवाजी महाराज!!

नाव : छत्रपतीँ शिवाजीराजे शाहजीराजे भोसले.
जन्म : १९.०२.१६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यु : ०३.०४.१६८० रायगड.
वडिल : शाहजीराजे भोसले.
आई : राजमाता जिजाबाई शाहजीराजे भोसले.
पत्नी: सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, गुणवंताबाई,लक्ष्मीबाई आणि सगुणाबाई.
मुले  : राजाराम आणि संभाजीराजे.
उत्तराधिकारी : छत्रपतीँ संभाजीराजे शिवाजीराजे भोसले.
अधिकाराकाळ : ०६.०६.१६७४ -०३.०४.१६८०.
राज्याभिषेक :०६.०६.१६७४.
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत .
राजधानी : रायगड.
राजब्रीदवाक्य : 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'

चलन: होन, शिवराई.

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Tuesday 14 February 2012

ll मेघडंबरी ll




शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ??

शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ??
... नाही मावळे तिथे ...नाही आऊ साहेब तिथे ...
पुन्हा उभारण्यासाठी "हिंदवी स्वराज्याच लढा "
नाही रक्त तेथील सळसळते ...
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???

नाही समय कोणाकडे ...
नाही काळजी कोणाला कोणाची ....
वेळ पडली तर विकतील जमीर स्वताच ..
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???

नाही काळीज सिंनेत ....नाही मनगटात दम ...
पुरुषार्थ ही विसरलेले भूतलावरील माणूस ....
काळिमा ही फासला स्वतःच्या मुख्यावर ....
शिवबा म्हणे कशाला येवू पुन्हा आम्ही भूतलावर ???

विसरलं धर्मच आदर ...विसरलं स्त्रीरांच मातृत्व ...
विसरलं कर्तव्य माता पित्याच...विसरलं स्वाभिमान जगण्याच ...
लाजीरवाण्या आयुष्य जगण्यासाठी...
कशाला येवू आम्ही भूतलावर- शिवबा म्हणे !!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान...

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
!! जयोस्तू मराठा !!