Friday 30 November 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले अजिंक्यतारा ।।


अजिंक्यतारा किल्ला

किल्ल्याची ऊंची : 950
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली, सातारा 
जिल्हा : सातारा 
श्रेणी : मध्यम

अजिंक्यतारा हा किल्ला सत्पर्षी, सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी सातारा शहर वसलेले आहे. गडावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते. प्रतापगडापासून फुटणार्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. गडावरुन पूर्वेला नांदगिरी, चंदन-वंदन हे किल्ले आणि पश्चिमेला सज्जनगड दिसतो.

इतिहास : 
 सातारचा किल्ला (अजिंक्यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड,
जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. सातार्याचा किल्ला हा शिलाहार वंशीय भोज(दुसरा) याने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ.स. १५८० मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांदबिबी येथे कैदेत होती. बजाजी निंबाळकर सुद्धा या ठिकाणी तुरुंगात होते. शिवराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८२ मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इ.स. १६९९ मध्ये औरंगजेबाने सातार्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार प्रयागजी प्रभू होते. १३ एप्रिल १७०० च्या पहाटे मोगलांनी सुरंग लावण्यासाठी दोन भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरूज आकाशात भिरकावला गेला. तटावरील काही मराठे दगावले. प्रयागजी प्रभू देखील या स्फोटात सापडले, मात्र काहीही इजा न होता ते वाचले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मोठा तट पुढे घुसणार्या मोगलांवर ढासळला व दीड हजार मोगल सैन्य मारले गेले. किल्ल्यावरील सर्व दाणागोटा व दारूगोळा संपला आणि २१ एप्रिल रोजी किल्ला सुभानजीने जिंकून घेतला. किल्ल्यावर मोगली निशाण फडकण्यास तब्बल साडेचार महिने लागले. किल्ल्याचे नामकरण झाले आझमतारा. ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर केले अजिंक्यतारा ! पण ताराराणीला काही हा किल्ला लाभला नाही. पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला मात्र १७०८ मध्ये शाहुने फितवून किल्ला घेतला आणि स्वत:स राज्याभिषेक करून घेतला. इ.स. १७१९ मध्ये महाराजांच्या मातोश्री येसूबाई यांना किल्ल्यावर आणण्यात आले. पुढे पेशव्याकडे हा किल्ला गेला. दुसर्या शाहुच्या निधनानंतरm फितुरीमुळे किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.

गडावर पहाण्याची ठिकाणे : सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आ.हे दरवाजाचे दोन्ही बुरूज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे.  दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडील सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे दोन प्रसार भारती केंद्राचे टॉवर्स आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व " मंगळादेवी मंदिराकडे "असे तिथे
लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाईंचा ढासाळलेला राजवाडा आहे . येथे एक कोठारही आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्याआवारात अनेक शिल्प आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजेगडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या दक्षिणेला देखील दोन दरवाजे आहेत. तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना ते नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात मात्र तलावांत पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्या मार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो. संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणत दीड तासलागतो. 

गडावर पोहोचण्याच्या वाटा : सातार्यापासून साधारणत: १ तास लागतो. अजिंक्यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता. येते सातारा एस टी स्थानकावरून अदालत वाड्या मार्गे जाणारी कोणतीही गाडी पकडावी आणि अदालत वाड्यापाशी उतरावे. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १० ते १५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने जाणार्या थेट वाटेने आपण गडावर जाणार्या गाडी रस्त्याला लागतो. येथून गाडी रस्त्याने १ किमी चालत गेल्यावर आपण थेट गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्ता सुद्धा आहे. या रस्त्याने आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचतो. कोणत्याही मार्गे गड गाठण्यास साधारण १ तास लागतो.

राहाण्याची सोय : गडावरील हनुमानाच्या मंदिरात १० ते १५ जणं राहू शकतात. 

जेवणाची सोय व  पाण्याची सोय : आपण स्वत: करावी.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 
 नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्रातील किल्ले || या facebook मधील  ( -by Sumit Bhaskar Jagtap )एका पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले कुलाबा ।।

कुलाबा किल्ला
किल्ल्याची ऊंची : ----
किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग 
डोंगररांग : डोंगररांग नाही
जिल्हा : रायगड
श्रेणी : सोपी

अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गद्वयी उभी आहे. हे दोनही किल्ले मिश्रदुर्ग ह्या प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हा किल्ला चारही बाजूने पाण्याने वेढला जातो व जलदुर्ग बनतो; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते व किल्ला भूइकोट बनतो. हा दुर्ग ज्या खडकावर उभा आहे, त्याची दक्षिणोत्तर लांबी २६७ मीटर असून पूर्व पश्चिम रुंदी १०९ मीटर आहे.

इतिहास :
 अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती.
‘‘ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र‘‘ हे शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हाल चालींचाडावपेचांचा हा किल्ला केंद्र होता. ४जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्य्राचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात सपशेल पराभव झाला.

पहाण्याची ठिकाणे : किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्याच्या बाजूस पण, इशान्येकडे वळवलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केलेले आहेत. त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे. पुढे गेल्यावर डाव्या हाताला वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हजरत हाजी कमाल उद्दीनशहा दरबार ह्यांच्या दर्ग्याकडे जाते. परतीच्या वाटेवर डावीकडेआंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर अजुनही लोकांचा राबता असलेले सिध्दीविनायकाचे मंदीर आहे. गणेशमूर्ती संगमरवरी असून तिची उंची दीडफूट आहे.१७५९ साली राघोजी आंग्रे ह्यांनी सिध्दीविनायकाचे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. मंदिराच्या प्राकारातच उंचवट्यावर उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची पुष्कर्णी आहे. पुष्कर्णीच्या पुढे तटा पलिकडच्या दरवाजातून बाहेरगेल्यावर स्वच्छ पाण्याची विहीर आहे. या विहिरीला आत उतरायला पायर्या आहेत.
दुर्गाच्या दक्षिण टोकाला असणार्या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा / दर्या दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे. दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावरजाण्यासाठी पायर्या आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत. तोफांच्या चाकांजवळ तोफा बनवणार्या कंपनीच नाव कोरलेल आहे ‘‘ डाऊसन हार्डी फिल्ड, डाऊ मूट आर्यन वर्क्स, यॉर्कशायर, इंग्लंड ", व वर्ष आहे १८४९. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून सर्जेकोटला जाता येते.

पोहोचण्याच्या वाटा : मुंबईहून - पनवेल - वडखळ मार्गे अलिबागला जावे, अलिबागच्या समुद्र किनार्यावरुन ओहोटीच्या वेळेस किल्ल्यात चालत जाता येते.

 राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोयनाही ,राहण्याची सोय अलिबाग मध्ये आहे. 

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही ,जेवणाची सोय अलिबाग मध्ये आहे. 

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही , आपण स्वत: करावी.

सूचना : किल्ल्यात जाण्यासाठी सोयीस्कर ओहोटीच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.
तिथी वेळ तिथी वेळ प्रतिपदा ४:०० ते ६:०० अष्टमी ९:०० ते १२:०० द्वितीया ५:०० ते ७:०० नवमी १०:०० ते १२:३० तृतीया ५:३० ते ८:०० दशमी ११:०० ते १३:०० चतुर्थी ६:०० ते ९:०० एकादशी११:३० ते १४:०० पंचमी ७:०० ते ९:३० द्वादशी १२:०० ते १५:०० षष्टी ८: ०० ते १०:०० त्रयोदशी१३:०० ते १६:०० सप्तमी ८:३० ते ११:०० चर्तुदशी १३:०० ते १६:०० पौर्णिमा / अमावस्या १४:३० ते १७:०० .

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 नोट : वरील सर्व माहिती || महाराष्ट्रातील किल्ले !! या facebook वरील ग्रौप मधील  एका पोस्टचा  (-by Dilip Ringane) संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Saturday 24 November 2012

|| छत्रपती शंभुराजे स्मारक ||


याच ठिकाणी ''छत्रपती संभाजी महाराज''
यांना पकडण्यात आले होते-(कसबा, संगमेश्वर. जिल्हा-रत्नागिरी)

राजे मुजरा, मुजरा त्या झुंजार पोलादी देहाला,
तुमच्या स्वराज्याच्या अपार भक्तीला....
तुमच्या जखमांतुन वाहनारया रक्ताला,
रांगड्या तुमच्या सहनशक्तीला.....

पुन्यवान समजतो तुम्हाला जखडलेला साखळदंड स्वताहला.......

तुम्ही शुरवीर, तुम्हीच रनवीर, तुम्हीच धर्मवीर.....

तुम्ही होता धैर्यवीर, तुम्हीच खरे क्रान्तीवीर,
तुम्हीच या भुमिचा स्वराज्यवीर.... ...

अजिंक्य झुंजी दिल्या, गानिमांची वाट लावीली,
फितुरांची मान छाटली...........

कित्येकाची पाठ पाहीली, कित्येकाना आस्माने दाविली,
माय बहिनींची आब्रु राखली........

कितीदा तुम्ही आमच्यासाठी पेटला,
घाबरुन तुम्हा आसमंत फाटला..........

हवेगत चालवीली तलवारीची पाती,
कितीदा तरी भिजली असेल तुमच्या रक्ताने स्वराज्याची माती......

मराठ्यांच्या ह्या शाक्तवीर, नरवीर, धर्मवीर, दूरदर्शी,
अविस्मरणीय पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!


जय जिजाऊ!! जय शिवराय!! जय शंभूराजे!!

नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शभुंच्या चरणी...

Thursday 22 November 2012

मराठ्यांचे आराध्ये दैवत || छत्रपती शिवाजी महाराज ||

जन्म स्थान :  किल्ले शिवनेरी  जि. पुणे  
समाधीस्थान : किल्ले रायगड जि. रायगड
 
कर्तबगार शहाजीराजांचे पुत्र शिवरायांचा जन्म जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी झाला. शहाजी राजांचा निजामशाही वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ते आदिलशहाच्या पदरी राहून कर्नाटकात आदिलशाहीचा विस्तार करू लागले. दहाव्या वर्षी शिवरायांचा निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी विवाह झाला. आपल्या वडिलोपार्जित जहागीरीची म्हणजे पुणे, सुपे भागाची देखभाल करण्यास शहाजी राजांनी जिजाउंसह शिवरायांना पुणे येथे ठेवले.कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या मृत्यूनंतर शिवराय स्वतंत्रपणे जहागिरीचा कारभार पाहू लागले.
परकीय आणि अत्याचारी सुलतानशाह्या यांच्या विरुद्ध लढून स्वत: चे राज्य स्थापण्याचा उद्योग शिवरायांनी पुणे भागातील किल्ले ताब्यात घेऊन सुरु केला. रोहिदा, तोरणा,सिंहगड आणि पुरंदर या बळकट किल्ल्यांच्या आधाराने आणि मावळातील देशमुखांबरोबर सर्व सामान्य मावळ्यांच्या मदतीने सैन्य उभे करून शिवरायांनी आपली शक्ती वाढवायला सुरवात केली.

विजापूरच्या आदिलशहाने या उद्योगाने चिडून जाऊन शहाजी राजांना कैद केले आणि शिवराय यांच्याविरुद्ध फौज पाठविली. या सैन्याला पराभूत करून आणि मोगलांकडून दबाव आणून शहाजी राजांची सुटका करण्यास आदिलशहाला भाग पाडले आणि हि सलामीची लढाई शिवाजी महाराजांनी जिंकली.

जावळीच्या मोऱ्यांचा नायनाट करून श्री शिवरायांनी स्वराज्याच्या सीमा समुद्र पर्यंत भिडवल्या. आदिलशहाने प्रचंड फौजेसह पाठविलेल्या अफझल खानास ठार मारून विजापुरी सैन्य शिवरायांनी प्रतापगडाखाली बुडविले. या प्रचंड विजयाने शिवरायांचे नाव भारतभर प्रसिद्ध झाले.अफझल वधानंतर झपाट्याने आदिलशाही मुलखावर आक्रमण करून शिवरायांनी अनेक किल्ले व बराच मुलूख ताब्यात घेतला. आदिलशहाने पुन्हा तयारी करून सिद्दी जौहर याला शिवराय यांच्या विरुद्ध पाठविले. पन्हाळा किल्ल्यावर शिवराय असताना सिद्दी जौहरने पन्हाळ्यास वेध घातला. या वेढ्यातून आपल्या जीवास जीव देणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने शिवराय अलगद पाने सुटले. विजापुरी फौजांविरुद्ध लढताना शिवा काशीद, बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडले.

यानंतर कोकण काबीज करून शिवरायांनी समुद्र किनाऱ्यावर आपले पाय रोवले. औरंगजेबाने शिवराय यांच्या विरुद्ध शायिस्तेखानला महाराष्ट्रात पाठविले. पुण्यात तळ ठोकून बसलेल्या शायिस्तेखानावर दोन लाख फौजेच्या गराड्यात शिरून शिवरायांनी हल्ला केला. शायिस्तेखानास परत बोलावून औरंगजेबाने पाठविलेल्या मिर्झा राजा जयसिंग याने महाराष्ट्रात जाळपोळ, लुटालूट करून प्रचंड सैन्यशक्तीच्या जोरावर शिवरायांना तह करण्यास भाग पाडले.तहाप्रमाणे आपले अनेक किल्ले मोगलांना देऊन आग्रा येथे भेटीस आलेल्या शिवरायांना औरंगजेबाने कैद केले. या कैदेतून आपल्या विलक्षण चतुराईच्या जोरावर शिवराय निसटून सुखरूप महाराष्ट्रात परत आले. तहात दिलेले किल्ले श्री शिवरायांनी तत्काळ परत घेण्यास सुरवात केली.आणि हि कामगिरी पार पाडताना तानाजी मालुसरे कामी आले.

शायीस्तेखानावरील हल्ल्यानंतर लुटलेले औरंगजेबाचे धनसंपन्न शहर सुरत शिवरायांनी पुन्हा लुटले. नाशिक जवळचा साल्हेर किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याची सीमा उत्तरेत बागलाण पर्यंत वाढविली.

महाराष्ट्रातील शत्रूंना नेस्तनाबूत करून श्री शिवरायांनी ६ जून १६७४ रोजी रायगडावर विधीपूर्वक राज्याभिषेक करून घेऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राजसत्तेची स्वतंत्र सिंहासनाची स्थापना केली. शिवराय छत्रपती झाले. या समारंभानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाऊ यांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील राज्य स्थिरस्थावर करून शिवरायांनी आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. गोवलकोंडा येथील कुतुबशहा याच्याशी मैत्रीचा तह करून साठ हजारांच्या सैन्यासह शिवरायांनी दक्षिणेत मुसंडी मारली. कोप्पळ, बहादूरबंडा, जिंजी, वेलोर हे महत्वाचे किल्ले जिंकून घेतले.स्थानिक राजवाटी यांच्याकडून खंडण्या घेत, विरोधकांना भुई सपाट करीत शिवराय तंजावर पर्यंत पोहोचले. तंजावरचे छत्रपती एकोजीराजे हे शिवरायांचे सावत्र बंधू होते. त्यांची भेट घेऊन शिवराय महाराष्ट्रात आले.

आग्रा भेटीपूर्वीच शिवरायांनी कोकणात व समुद्रात किल्ले बांधून सागरी सत्ता आपल्या हाती ठेवण्यास सुरवात केली होती. विरोधक सिद्दी आणि इंग्रज यांना न जुमानता मुंबईपासून वेंगुर्ल्यापर्यंत किल्ल्यांची साखळी निर्माण केली.

खांदेरी उंदेरी या सागरी दुर्गांच्या लढाईत इंग्रजांचा पराभव करून शिवराय रायगडावर आले. नेसरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्येशी राजाराम महाराज यांचा शिवराय यांनी करून दिला. त्यानंतर तीन आठवड्यांनी रायगडावरच त्यांचे निधन झाले. 
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
 
 नोट : वरील सर्व माहिती  मला अल्याल्या एका email चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Thursday 8 November 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले अंजनेरी ।।

अंजनेरी  किल्ला

किल्ल्याची उंची : ४२०० फूट
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग : त्र्यंबकेश्वर
जिल्हा : नाशिक
श्रेणी : सोपी

 अंजनेरी किल्ला इतिहासात परिचित आहे तो हनुमान जन्मस्थानामुळे.वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाला म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी म्हणजेच अंजनी पुत्राचे नाव देण्यात आले आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा देखील एक महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताना वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी गुहेत लेणी आढळतात. ही लेणी जैनधर्मीय असल्याचे दिसून येते. पठारावर पोहोचल्यावर १० मिनिटांतच अंजनी मातेचे मंदिर लागते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे. मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक डावीकडे वळते तर दुसरी समोरच्या बालेकिल्ल्यावर चढते. डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. गुहा दोन खोल्यांची आहे. यात १० ते १२ जणांना राहता येते. गुहेच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहे. समोर असणाऱ्या वाटेने बालेकिल्ल्यावर गेल्यावर २० मिनिटांत आपण दुसऱ्या अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. हे मंदिर सुद्धा प्रशस्त आहे. किल्ल्याचा घेरा फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावर बाकी काही पाहण्यासारखे नाही.

गडावर जाण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठीची मुख्य वाट अंजनेरी गावातून वर जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिक पासून २० कि.मी. अंतरावरील फाट्यावर उतरावे. या फाट्यापासून १० मिनिटे अंतरावरील अंजनेरी गावात पोहोचावे. गावातून नवरा-नवरीचे दोन सुळके नजरेस भरतात. गावातूनच एक प्रशस्त वाट किल्ल्यावर जाते. पुढे पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर पोहोचता येते. अंजनेरी गावापासून येथपर्यंत येण्यासाठी दीड तास पुरतो.

राहण्याची सोय :
१. पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरात १० ते १२ जणांची सोय होते. 
२. सीता गुंफेत सुद्धा १० ते १२ जणांची सोय होते.

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय : मंदिराजवळच बारामाही पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ : अंजनेरी गावातून २ तास.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 नोट : वरील सर्व माहिती || अवतरली शिवशाही सात समुद्र ओलांडून !! घडविण्या अखंड महाराष्ट्र || एका पोस्टचा  संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी आम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलं! राष्ट्रीय चारित्र्य। नॅशनल करेक्टर। हे असेल तर यशकीतीर्चे गग नच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल. शून्यातून स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींनी औरंगजेबासारख्या कर्दनकाळ वैऱ्यालाही दाखवून दिलं की , हा शिवाजीराजा मरण पावला तरीही इथं हजारो शिवाजीराजेच उभे असतील ते न वाकता , लाचारीने न झुकता , भगीरथ कष्टांनीही न थकता महाराष्ट्र स्वराज्यासाठी अखंड पंचवीस- पंचवीस वर्ष झुंजत राहतील. ते सारे शिवाजी वाकणारही नाहीत , अन् मोडणारही नाहीत. त्यांच्या त्यागानं दिल्लीचं तख्त दुभंगेल. हेच शिवराष्ट्रीय अन् महाराष्ट्रधमीर्य आमचं कर्तृत्त्व आणि आमची आकांक्षा , पुढच्या इतिहासात साक्षात , प्रत्ययास आली नाही का ? आलीच! हे लेणं आम्ही कधीही गंजू देता कामा नये. हे लेणं आम्ही कधीही हरवून बसता कामा नये. माझ्या कुमार नातवंडांनो , मी हे महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘ आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे ‘ हे सदर मांडतोय , ते केवळ केवळ या एकमेव हेतूनेच. छत्रपती शिवाजीमहाराजांचे असंख्य , उदात्त , उत्कट आणि उत्तुंग सद्गुण जर आम्ही सतत हृदयात जागे ठेवले तरच या चरित्राचा उपयोग. नुसतेच पुतळे अन् नुसत्याच पूजा व्यर्थ आहेत. निजीर्व आहेत.
अफझलखानच्यास्वारीमुळे महाराजांचे शतपैलू नेतृत्त्व आणि त्यांच्या शिलेदारांचे शतपैलू कर्तृत्त्व आपल्याला या एकाच मोहिमेत प्रत्ययास येतेय. या मोहिमेत महाराजांनी राजधानी राजगड युद्धासाठी न निवडता त्यांनी प्रतापगडसारखा गड निवडला. प्रतापगड म्हणजे जणू विधात्यानेच रचून ठेवलेला सह्यादीतील अत्यंत बिकट चक्रव्यूहच. महाराजांचा सह्यादीच्या नैसगिर्क रचनेचा , म्हणजेच भूगोलाचा अभ्यास किती सूक्ष्म आणि अचूक होता हे लक्षात येते. अर्थात केवळ जावळी प्रतापगडच काय , पण अवघ्या कोकण , सह्यादी , समुद , मावळपट्टा किंबहुना अवघा महाराष्ट्रच त्यांनी सूक्ष्मतेने हेरला होता. येथील नद्या , निबिड अरण्ये , दऱ्याखोरी , पश्चिम समुद , पठारे आणि अशा अवघ्या मराठी मुलुखातील माणसंही त्यांनी अचूक हेरली होती. त्यांच्या सैन्यात कोकणातील जवान होते अन् त्या दूरवरच्या चंदपुरी गोंडवनातील गोडंही होते. सारेच होते उघड्या शरीराचे , निधड्या छातीचे , अन् कडव्या इमानाचे। अफझलखान प्रयत्न करीत होता अशा या निबिड चक्रव्यूहातून महाराजांना मोकळ्या मैदानावर हुसकून आणण्याचा. त्याचे याबाबतीतील सर्व डाव वाया गेले.
महाराजांच्या मनात या मोहिमेचा तपशीलवार आरखडा आखला जात होता. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणानं महाराज टाकीत होते. विजापुराहून निघाल्यापासून वाईत येऊन पोहोचेपर्यंत खानाने अनेक पेचदार डाव टाकले. भावनेला डिवचले. चार ठाणी काबीज केली पण महाराजांनी या काळात कुठेही प्रतिहल्ले केले नाहीत. ठाणी जाईपर्यंत ती राखण्याची शिकस्त केली. पण गेल्यानंतर ती परत घेण्यासाठी अजिबात प्रतिहल्ले केले नाहीत. उलट ठाणी गेल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांना त्यांनी सांगितले , ‘ ही गेलेली ठाणी परत घेण्याचा आत्ता अजिबात प्रयत्न करू नका.
‘ या काळात महाराजांच्या सैन्यानं खानाच्याविरुद्ध कुठेही लहानसाही हल्ला केला नाही. खानाला या काळात महाराजांनी कधीही पत्र वा राजकारणी बोलणी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दूत पाठविला नाही. अगदी गप्प राहिले. झडप घालण्यापूवीर् चित्ता जसा दबून बसतो , डरकाळ्या फोडत नाही , तसे यामुळे खान बुचकळ्यातच पडला होता. या शिवाजीच्या मनांत आहे तरी काय याचा त्याला थांगपत्ताही लागत नव्हता. पावसाळ्याचे चार महिने उलटल्यावर प्रथम खानानेच आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकणीर् यांस वाईहून महाबळेश्वराच्या पर्वताच्या पलिकडे दरीत असलेल्या प्रतापगडावर पाठविले. महाराजांना डोंगरातून बाहेर काढण्याचा खानाचा हा शेवटचा प्रयत्न. त्याने वकीलाबरोबर पत्रही दिले होते. खानाची अशी दरडावणी होती अन् वकीलाची गोडगोड बोलणी होती की , ‘ प्रतापगडाहून आम्हांस वाईत भेटण्यासाठी हुजुरदाखल व्हा ,’ म्हणजे आमच्या पंजात या! आमच्या घशात येऊन पडा. हेही खानाची गोडगोड अर्जवणी अन् कठोर दरडावणी महाराजांनी अतिशय कुशलतेने अन् खानालाच प्रतागडाच्या खाली येणे भाग पाडले अगदी नम्रतेने. शरणागतीच्या भाषेत.

या काळात स्वराज्याच्या हेरांनी आपली कामगिरी अतिशय उत्कृष्ट कौशल्यानी आणि तत्परतेने केली. याचवेळी राजापूरच्या बंदरात , कोकणात आदिलशाहीची तीन लष्करी गलबते येऊन थांबली होती. जर युद्ध भडकले आणि कोकणात पसरले तर अफझलखानाला या गलबतातील युद्धसाहित्याचा उपयोग व्हावा हा आदिलशाही हेतू होता. गलबते सुसज्ज होती. पण त्यांवरील शाही माणसे पूर्ण गाफील होती. इतकेच नव्हे तर खानाची छावणी , पुणे , सातारा , कोल्हापूर आणि सांगली या भागातील आदिलशाही ठाणी आणि प्रत्यक्ष खानही वाढत्या प्रमाणात गाफीलच बनत होता. ही किमया महाराजांच्या वकीलाची , हेरांची आणि प्रत्यक्ष महाराजांच्या बोलण्याची.

या साऱ्याचा परिणाम ? पराभव कुणाचा ?

 ॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Wednesday 7 November 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले चंद्रगड।।

चंद्रगड किल्ला

 प्रतापगड, रायगड, तोरणा या किल्ल्याच्य बरोबर खालच्या दरीत दबा धरुन बसलेला चंद्रगड किल्ला आहे. हा  किल्लाही आपले लक्षवेधून घेतो. चंद्रगडाचे दर्शन जरी महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट कडून होत असले तरी चंद्रगड हा रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यामधे आहे.

इतिहास :
या किल्ल्याला ढवळगड या नावाने पण वोलाखले जाते. कारण ढवळीनदीच्या खोर्‍यात हा चंद्रगड पुर्वी जावळीच्या मोर्‍यांच्या अखत्यारीत होता. जावळीच्या मोर्‍यांना चंद्रराव हा किताब होता. हा चंद्रराव वारल्यावर या गादीसाठी मोर्‍यांमधे तंटा उभा राहीला. शिवाजीराजांनी मध्यस्ती करुन तो मिटवला आणि येथील यशवंतराव मोरे हा चंद्रराव झाला. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या चंद्ररावाने त्यांच्याच विरुद्ध जावून आदिलशाहीशी सलोखा वाढवला. महाराजांच्या लोकांनाच त्रास देवू लागला. शिवाजीराजांनी चंद्ररावाला सामोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले. महाराजांच्या राज्यात गुन्हे करुन शिक्षेच्या भितीने काही गुन्हेगार पळून या मोर्‍यांच्या आश्रयाला गेले त्यांना उघडपणे मोर्‍यांनी पाठीशी घातले. हे गुन्हेगार महाराजांच्या ताब्यात न देता उलटच निरोप महाराजांना पाठविला. उद्या येणार असाल तर आजच या. जावळीस येणार असाल तर दारु गोळा मौजूद आहे.
जावळी प्रांत वाईच्या सुभ्यात मोडत होता. वाईची सुभेदारी अफझलखानाकडे होती. त्यामुळे जावळीवर हल्ला केला तर अफझलखान नक्की येणार हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे महाराज संधीची वाट पहात होते. इ.स.१६५५ -५६ मधे अफझलखान दक्षिण भारतात युद्धात गुंतलेला होता ती वेळ साधून महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. मोर्‍यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले.

गडावर जाण्याच्या वाटा :
ऑर्थर सीट जवळून एक पायवाट खाली चंद्रगडाकडे जाते. ही वाट ढवळ्याघाट या नावाने ओळखली जाते. जंगल घसारा, ओढेनाले यामधून जाणारी ही धाटवाट अनेकांना गुंगारा देते. त्यामुळे गरजेची साधन सामुग्री म्हणजे अन्न, पाणी आणि सोबत माहीतगार वाटाडय़ा घेवूनच या मार्गावर चालू लागावे. चंद्रगडापर्यंत पोहचण्यात साडेतीन ते चार तास लागतात. 
सूचना : वाटेत बिबटय़ा तसेच वन्यप्राण्यांचेही दर्शन होवू शकते हे लक्षात ठेवावे. नवख्यानी मात्र हा मार्ग चोखाळू नये.

मुंबई-पणजी महामार्गावर पोलादपूर गाव आहे. येथून चंद्रगडाच्या पायथ्याच्या ढवळे गावात जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. ठरावीक वेळेवर एस.टी.बसेसचीही सोय आहे. या गाडीमार्गावर ढवळे गावाच्या अलिकडे सहा कि.मी. वर उमरठ या गावी नरवीर तानाजी मालूसरे आणि शेलार मामा यांची स्मारके आहेत. ती पाहून पुढे जाता येईल.
उमरठ अथवा ढवळे येथे मुक्कामी राहून सकाळी चंद्रगडाला गेल्यास सोयीचे ठरते. ढवळे गावातून सोबतीला वाटाडय़ा अवश्य घ्यावा. पाणी व खाद्यपदार्थ घेवून सकाळी लवकर निघावे. ढवळेगावापुढे पाच मिनिटांच्या चालीवर लहानशी वस्ती आहे. येथून वाट जंगलात घुसते. तासाभराच्या वाटचालीत आपण खिंडीत पोहोचतो या खिंडीला म्हसोबाची खिंड म्हणतात. येथून पुढे चंद्रगडाची वाट काहीशी अवघड होते. लहान कातळ कडे तसेच खेबणीच्या आधाराने माथा गाठता येतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
गडाचा माथा लहानसा आहे. घराचे चौथरे आणि पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. येथे आकाशाखाली उघडय़ावर शंकराची पिंड आहे. त्याला ढवळेश्वर महादेव महादेव म्हणतात. उंचवटय़ावर वाडय़ाचे भग्नावशेष दिसतात. उत्तर अंगाला पाण्याची टाकी आहेत.
चंद्रगडावरुन रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे समोर दिसतात. याचे उत्तुंग कातळ कडे पहाण्याची मैज काही न्यारीच आहे. चंद्रगडावरुन ढवळ्याघाटाची वाट दिसते. घाटाच्या माथ्यावरची खिंड आणि त्याच्या वर महाबळेश्वरचे ऑर्थर सीट नुसते पाहूनच थरार वाटतो. निसर्गाची लयलूट आणि सह्यद्री रौद्रभिषण दर्शनाने चंद्रगडाची सफर सार्थर झाल्याचे समाधान मिळते.

 सूचना :  पाण्याची  व जेवणाची आपण आपली सोय करावी 

मराठ्यांचा अंश मी ...क्षत्रियकुलवंत मी....
|| जय जीजाऊ  ||  जय शिवराय  ||  जय शंभूराजे ||
 

नोट : वरील सर्व माहिती  मला अल्याल्या एका email चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Monday 5 November 2012

!! रायगडची हिरकणी !!


कोजागीरी पौर्णिमेला "हिरकणी" शिवरायांच्या आदेशानुसार किल्ल्याचे दार बंद झाल्यावर आपल्या तान्हुल्याच्या आर्त हाकेने,चिंतेने ३००० फुट उंचीच्या शिवस्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरुन उतरण्याचा महापराक्रम हिरकणीने केला.

रायगडची सांगतो थोरी--ऐका तुम्ही सारी गोष्ट एक घडली त्य
ा रायगडला----

ऐकताना नवल वाटे मजला--सुरवात करतो पोवाडयाला -जी-जी---(१)

छत्रपती होते गडवरी--पुनव कोजागिरी--समारंभ घनदाट भरला

आनंदाने गड सारा फुलला---किती वर्णावे प्रसंगाला --जी---जी (२)

एक खेडे होते शेजारी--गड पायतारी---गौळी लोक रहात होती गावाला---

नित जाती दूध विकण्याला--नेहमीचा परीपाठ त्यान्‌ला-जी-जी---(३)

गौळी लोक गेले गडावरी--दूध डोईवरी --हाळी ते देती गिरायकाला --

झटदिशी दूध विकण्याला---विकून ते येती परत घरला जी--जी (४)

चाल दुसरी

त्याच गावी होती गौळण -- नाव तिचे हिरा हे जी जी

बेगीबेगी निघाली गडावरी -- काढुनीया धारा हे जी-जी

दुसरी गौळण बोलती तीला--झाल का ग हिरा हे जी-जी

हिरा म्हणते तुम्ही जा पुढे-येती मी उशीरा हे जी-जी

पाळण्यात बाळ घालूनी --लावीते निजरा हे जी-जी-

चाल तिसरी-हिरा बाळाला झोपविते

हिरा बोले निजनिज बाळा-तुला लागू दे आज डोळा

गडावरी गौळ्याचा मेळा--दूध विकाय झाले गोळा

कोजागिरी पुनवेचा सोहळा-मला जावू दे लडीवाळा

चाल पहिली

हिरा गौळण निघाली गडावरी--चरवी डोईवरी

जाता जाता सांगे म्हातारीला --झोक्यामधे बाळ झोपवीला

उठला तर घेवून बसा त्याला-दिस मावळायला येते घरला जी (५)

चाल तिसरी

हिराबाई गेली गडावरी--दूध घेणारी पांगली लोक सारी

दूध घ्या हो म्हणती कुणी तरी-आशी हाळी देती गडावरी

दिस मावळून गेला बगा तरी-हिरा दूध विकण्याची गडबड करी

निघाया घरला जी-जी (६)

चौकीदार दरवाज्यावरी-दिस मावळाय दार बंद करी

हीरा आली दरवाजावरी-पहाती हालवून दारे सारी

चौकीदार होते शेजारी-हिरा बोले त्याना सत्वरी

मला जायाच हाय बगा घरी-बाळ माझा तान्हा हाय घरी

कुनी न्हाय घियाला जी-जी (७)

चौकीदार तिची समजूत करी-महाराजांचा हुकूम आमच्यावरी

आम्ही हूकमाचे ताबेदारी-आशी गोष्ट गेली त्यांच्या कानावरी

न्हेत्याल टकमक टोका वरी-मुकू प्रानाला जीर हे जी-जी (८)

हिराबाई विनंत्या करी--पण ऐकेना पहारेकरी

हिरा मनात कष्टी भारी--बाळ दिसे तीच्या समोरी

हिरा गडावर घिरटया मारी--फिरुनी वाटेचा शोध ती करी

आवरी मनाला जी-जी (९)

चारी बाजूला मारुन फेरी-भरली उबळ मायेची उरी

गाय वासराला चुकली पाखरी--पक्षा सारखी मारावी भरारी

पडती डोळ्यातून आसवाच्या सरी-दुध न्हाय तिजला-जी-जी (१०)

ठाम विचार केला अंतरी--हिराबाई गेली बगा कडयावरी

म्हणे देवा तू धाव लौकरी - आले संकट माझ्यावरी

माझे रक्षण तूच आता करी-विनवी देवाला जीर हे जी-जी (११)

कडयावरुन खाली ती उतरी-उतरताना पाय तिचा घसरी

तरी धिरान तोल सावरी-झाडाझुडुपांचा ती आसरा करी

गेली तळाला जीर हे जी-जी (१२)

चाल १ ली

हिराबाई गेली तेव्हा घरी--बाळ मांडीवरी

शेजारीण घेवून बसली बाळाला-हिराने उचलुन घेतला त्याला

पोटाशी धरुन कुरवाळीला --आईला पाहून बाळ हासला जी-जी (१३)

हीच गोष्ट कळाली गडावरी--लोक नवल करी---

छत्रपती शिवाजी महाराजांन्‌ला-हकीगत सांगी लोक त्यान्‌ला

हिराने गड सर केला जीर हे जी-जी (१४)

छत्रपती हिरा सामोरी--उभी दरबारी

महाराजानी बक्षीस दिले तिजला-त्याच कडयावरी बुरुज बांधला

हिराचे नाव दिले बुरजाला-हिरकणीचा बुरुज म्हणती त्याला

हिराचा पोवाडा संपवीला जीर हे जी-जी (१५)



या महान वीरांगिणीला "हिरकणीला" मानाचा त्रिवार मुजरा.