Monday 25 February 2013

|| पानिपत चा पराक्रम ||

 हा पराक्रम मराठ्याने केला आहे. 

जय हिँदुत्व ...
जय मराठा ...
|| जयोस्तो मराठा ||

अहमदशाह अब्दालीने ३,४ वेळा भारतावर आक्रमण करून प्रचंड लुटमार केली होती.नेमका पंजाबसारख्या पराक्रमी राज्यातून तो यायचा आणि लुटून जायचा.उत्तर भारतातच त्याने जास्तीत जास्त लुटमार केली होती.त्याचे लष्कर इतके मोठे होते की अब्दाली येतो आहे हे समजताच दिल्लीचा बादशाह दिल्ली सोडून पळून गेला होता.उत्तर भारतातील जे लोक आपल्या शौर्याचाअभिमान बाळगायचे आणि इतरांना तुच्छ लेखायचे तेसुद्धा शेपुट घालुन आपल्याच प्रांतात जसेच्या तसे शंढ बनल्यासारखे गप्प होते. संपूर्णभारतात कुणीही जेव्हा अब्दालीशी टक्कर घ्यायला हिम्मत करण्यास तयार नव्हते तेव्हा फक्त मराठी माणसाच्या रक्ताने उसंडी मारली.पुण्यापा सू न ८०० कोस दूर अब्दालीसोबत टक्कर घ्यायला,आपल्या मातृभूमीचे रक्षण करायला,माणुसकीचे रक्षण करायला मराठी माणूस निघाला पुन्हा एकदा अटकेपार झेंडा गाडायला.
दिल्लीच्या लाल किल्यावर कब्जा मिळवला.आणि बघतात काय की बादशाह पळून गेला आहे.अब्दालीची फौज येत आहे हे समजताच भरतपुरला पाळला ही बातमी मिळाली.असा बादशाह काय कामाचा जो परकीय आक्रमण झाल्यावर आपली जनता उघड्यावर सोडून पळून जातो.त्याचवेळी मराठी फौजेला अन्नाची कमतरता भासू लागली होती.ही कमतरता सहज भरून काढता आली असती दिल्लीला लुटून.पण मराठी फौजेवर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होते की कोणत्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही,स्त्रियांना त्रास द्यायचा नाही,सामान्य जनतेचा छळ करायचा नाही.म्हणून ही अन्नाची अडचण मराठी माणसाला सताऊ लागली. आणि एक माहिती मिळाली की अब्दालीने त्याचा एक खजिना कुंजपुरा येथे लपऊन ठेवलेला आहे.मराठी फौज तिकडे निघाली,कुंजपुरा जिंकला आणि त्या खजिन्यासोबतच अन्न धान्यही मिळाले आणि दोन वेळच्या अन्नाची समस्या काही दिवसांपुरती सुटली.
पुढे मराठी माणसाला कुरुक्षेत्राचे दर्शन घ्यायचा मोह आवरला नाही.कारण या फौजेत फक्त लढाऊ सेनाच नव्हती तर त्यांच्या बायका,मुले,नातेवाईक हे सुद्धा होते.आणि मराठे लढल्यावर जिंकणारच हा आत्मविश्वास या सर्वांमध्ये असल्याने भलेही युध्द फार मोठे होणार होते पण लढाऊ सेने बरोबर इतर लोकही आले.नागपूर ते कोल्हापूर पर्यंतच्या सर्व जिल्ह्यातील शूरवीर यात होते.पण पुढे परिस्थिती फारच गंभीर झाली.सर्व बाजूंनी अब्दालीचे लष्कर आले.इतर कुणाही कडून काडीचीही मदत मिळणे कठीन होते मग कुणी तलवारीनिशी मदत करनेतर अशक्यच.आणि खरे म्हणजे कुणाची गरजच नव्हती.मराठी माणूस या परिस्थितीला तोड द्यायला आणि जिंकायला पुरता समर्थ होता.पण उपाशी पोटी कोण लढू शकत?
कुणी लढो अगर न लढो मराठी माणसालाहे शक्य होते.महिनाभर्या पासून अन्नान्नदशा सहन करीत मराठी सेना,मुले बाळे,बायका,२ ते ३ अंश सेल्सिअसच्या थंडीत केवळ सुती कापडाच्या कपड्या निशी निसर्गाशीझुंज देत होते.युद्धाच्या १५ दिवस आधी पूर्ण अन्न संपले. बाजूचे लुटता आले असते आणि पोट भारता आले असतेपण तसे करणे महाराष्ट्र धर्माला अनुसरून नव्हते.मराठी माणूस गवत,झाडांचा पाला,शाडूची माती खात खंबीरपणे रणांगणात छाती ताणून उभाच होता.त्या भागातील झाडांवरचा पाला संपला.थोडेफार गवत शिल्लक राहिले असेल केवळ.पण तरीही खचला नाही इतका चिवट आणि जिद्दी मराठी माणूस होता.
आणि अखेर १४ जानेवारी १७६१ हा ऐतिहासिक दिवस उजाडला.त्या दिवशी संक्रांत होती.मराठी फौजेने कसे बसे आपल्या जनावरांना थोडासा चारदेऊन थोडेसे काहीतरी खाउन तलवार उपसली.सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान युद्ध सुरु झाले.मराठी सेनेचा तोफ खाण्याचा प्रमुख इब्राहीम गार्दीच्या तोफांनी हैराण होऊन अब्दालीचे सैन्य पळू लागले.पळता शत्रू पाहून काही मराठी सैनिक तोफांची रंग ओलांडूनपुढे निघाले आणि शत्रूवर तुटून पडले.अचानक तोफा बंद पडल्या कारण मराठी फौज समोर आली होती.अब्दालीची फौज परत वळली लढू लागली .पण उपाशी मराठी माणसाचा मारा इतका जबर होता की पुन्हा शत्रू पळू लागला.शत्रूचासर दार त्यांना रडून रडून समजाऊ लागला की पळू नका.अब्दालीने त्याची राखीव फौज पाठविली.तरीही मराठी ऐकायला तयारच नव्हते. अवाढव्य अशा आफ्गानांसमोर सामान्य शरीरयष्टीच्या मराठी माणसाच्या प्राणघातक अशा पराक्रमाला अब्दाली ७ किमी दुरूनबघत होता आणि आता आपली हर निश्चितहे समजून त्याने आपले इराणी घोडे बाहेर काढून आपल्या बेगामांना त्यावर स्वार होऊन परतीचा प्रवाससुरु करण्याचे आदेश दिले.असेच युद्ध जवळपास १.३० वाजेपर्यंत चालले.पण तेव्हापर्यंत सूर्य मराठी माणसाच्या, त्याच्या घोड्यांच्या डोळ्यावर येऊ लागला,हळू हळू माणसे,घोडे भुरळ येऊन पडू लागले.३.३० पर्यंत असेचचालले.आणि याचीच परिणीती आपल्या पराभवात झाली.अब्दालीला विश्वास बसेना की आपण विजयी झालो कसे?पण या युद्धातून तो आतला घाबरला की तिथून दिल्लीला राज्य करण्यासाठी आलाच नाही परत अफगाणिस्तान ला गेला.कारण त्याला माहित होते की हे महाराष्ट्रापासुन दूरवर उपाशी लढणारे मराठी जर इतके भयंकर आहेत तर महाराष्ट्रात आपण कसे टिकू शकू ? आपलाही औरंगजेब झाल्या शिवाय राहणार नाही.आणि यामुळेच परकीय आक्रमण नेहमीसाठी आपण या देशातून पळून लावले.म्हणूनच याला पानिपतचा विजय म्हणतात. 
आज हा पराक्रम आपल्या मराठी माणसाने केला होता याची जान ठेवायला विसरता कामा नये.

 ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

शिवरायांचे शिलेदार - सरसेनापती प्रतापराव गुजर


कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर. यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.



२५ फेब्रुवारी १६७४ चा इतिहास :

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की, "बहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हाला रायगडी
तोंड दाखवू नका ". त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.
महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.
अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.
बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.
अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.

दगडात दिसतील अजुन्बी तेथल्या टाचा ,
ओढ्यात तरंगे अजुनी रंग रक्ताचा ।।
क्षितिजावर उठतो अजुन्बी मेघ मातीचा,
अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात ।।
वेडात मराठे वीर दौडले सात !!!

प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार यांना वीरमरण आले
. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. 

सर सेनापती प्रतापराव गुर्जर व त्यांच्या सहा साथीदारांना मानाचा मुजरा !!!
 

|| गनिमीकावा ||


गनिमी कावा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक युद्धतंत्र होते. " कमीत कमी फोजेने जास्तीत जास्त फोजेचा खातमा करणे आणि विजय संपादन करणे ". या तंत्राचा वापर करून महाराजांनी भल्या भल्या शत्रूला सळो कि पळो करून सोडले, धुळीस मिळवले आणि विजय संपादन केले. म्हणून महाराजांना " गनिमी कावा " या युद्धतंत्रचे जनक मानले जातात.
महाराजांचा एक भीषण गनिमी कावा…
 शाहिस्तेखानाने मराठ्यांच्या भूगोलाचा आणि गनिमी काव्याचा कधी विचारच केलेला दिसत नाही। पुण्यात आल्यापासून त्याला नाव घेण्यासारखा फक्त एकच विजय मिळाला. तो चाकणवरचा. त्याने या विजयानंतर पूर्ण पाच महिने आराम केला. आपल्या छावणीतील सर्व बातम्या मराठी हेरांच्या मार्फत शिवाजीराजाला बिनचूक पोहोचत आहेत , याची त्याला कल्पनाही नसावी. त्याने जानेवारी १६६१ मध्ये एक मोठी मोहीम कोकणातील मराठी प्रदेशावर करण्याचा आराखडा आखला. या मोहिमेचे सेनापतिपद त्याने कारतलबखान उझबेक या सरदाराकडे सोपविले। हा खान घमेंडखोर होता. याच्याबरोबर अनेक सरदार नेमण्यात आले. त्यात सावित्रीबाई देशमुख उर्फ पंडिता रायबाघन ही हुशार , वऱ्हाडी सरदारीणही होती. खानाच्या फौजेचा नक्की आकडा उपलब्ध नाही. पण तो पंधरा हजारापेक्षा कमी नक्कीच नव्हता. शाहिस्तेखानाने या कारतलबला पेण , पनवेल , नागोठणे हा भाग जिंकावयाचा हुकूम केला. पण हा कारतलब असा अतिउत्साही म्हणजेच घमेंडखोरहोता की , त्याने म्हटले की , ‘ हुजूर , नागोठणे , पेण , पनवेल तर मी काबीज करतोच , पणकोकणातील शिवाजींचे कल्याण भिवंडीपासून ते दक्षिणेकडे (महाडकडे) असलेली सारी ठाणी आणि मुलूख कब्जा करतो.
कारतलबखानाच्या या साऱ्या आत्मविश्वासाचा आणि युद्धतयारीचाही तपशील महाराजांना राजगडावर अचूक पोहोचला।
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो पुण्याहून निघाला. आपण कुठे जाणार आहोत , आपला मार्ग कोणचा , शिवजीराजांचा तो मुलूख कसा आहे. इत्यादी कोणतीही माहिती त्याने आपल्या हाताखालच्या सरदारांना सांगितली नाही. ही गोष्ट रायबाघन या हुशार आणि शूर असलेल्या सरदारणीला आश्चर्याची वाटली. शिवाजी , सह्यादी , मावळे ,गनिमी कावा आणि कोकणी प्रदेश याची तिला चांगली जाण होती. पण तिने कारतलबशी एका शब्दानेही चर्चा वा विचारणा केली नाही. पण हा खान अंधारात उडी मारतोय , नक्की आपलं डोकं फुटणार याचा अंदाज तिला लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आला. खानाने लोणावळ्यापासून खाली कोकणात उतरणारी आंबेनळीची वाट धरली। खानाचे सैन्य सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत अगदी अनभिज्ञ , म्हणजेच अडाणी होते. आंबेनळीच्या पायथ्याशी चावणी नावाचे बारीकसे गाव होते. त्याच्या परिसरात खान पोहोचला. चावणीपासून ऐन कोकणात जाणारी अरुंद वाट होती. गर्द जंगलातून आणि दोन्ही बाजूला असलेल्या डोंगरातून ही वाट जात होती. ही वाट साडेचार कोस म्हणजेच १५ किलोमीटर अंतराची होती. खानानं या मार्गाने आपल्या सैन्याला चालण्याचा आदेश दिला. या वाटेचे नाव ऊंबरखिंड असे होते. हा दिवस होता दि. २ फेब्रुवारी १६६१ . मोगली फौज त्या भयंकर वाटेने चालू लागली. त्यांना कल्पना नव्हती की , पुढे काय वाढून ठेवले आहे. पुढे या वाटेच्या पश्चिम टोकावर एका टेकाडावर झाडीझुडपांत प्रत्यक्ष शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन उभे होते। आणि या १५ किलोमीटरच्या गर्द झाडीत कमीतकमी पाच हजार मावळे जागोजागी खाचीकपारीत आणि झाडांच्या दाट फांद्यावरही सशस्त्र लपून बसले होते. ही फौज वाघांच्या जाळीत मेंढरांनी शिरावं , तशी चालली होती.शिवाजीराजांना या शत्रूचालीची खबर सतत समजत होती. त्यांच्या मनात कोवळी दया उपजली. ही सारी मोगली फौज आता टिप्पून मरणार हे नक्की होतं. महाराजांना दया आली असावी ती त्या सावित्रीबाईरायबाघनची. महाराजांनी आपला एक वकील वेगळ्या माहितीच्या वाटेनं कारतलबखानाकडे पाठविला. खान चावणी गावाजवळ म्हणजेच पूर्ण पिछाडीस होता. रायबाघनही तेथेच होती. मराठी वकील खानाजवळ जाऊन पोहोचला. त्याने अदबीने खानाला महाराजांचा निरोप सांगितला , ‘ आपण चुकून आमच्या मुलखात आलेले दिसता. आपण अजूनही त्वरित माघारी निघून जावे , नाहीतर वेळ कठीण आहे. आमची विनंती ऐकावी.
‘ यावर खानाला जरा रागच आला। त्याने जबाब दिला की , ‘ मी काय निघून जायला आलोय काय ? कल्याण भिंवडीपासून सारं दख्खन कोकण काबीज करणार आहे मी. हे सारं वकील आणि तिथंच घोड्यावर असलेली रायबाघन ऐकत होती. ती काहीही बोलत नव्हती. तिच्या डोळ्यापुढे आत्ताच आकाश फाटले होते. खानाने वकिलाला असे फेटाळून लावले. वकील आल्यावाटेने महाराजांकडे गेला. त्याने त्या टेकडीवर घोड्यावर असलेल्या महाराजांना खानाचा बेपर्वाई जबाब सांगितला. दया करणारे महाराज संतापले. आणि त्यांना त्या समारेच्या गर्द ऊंबरखिंडीत ठायीठायी दबा धरून बसलेल्या मावळ्यांना आपल्या पद्धतीने इशारा पोहोचविला. अन् एकदम त्या हजारो मावळ्यांनी खालून चाललेल्या मोगली सैन्यावर बाणांचा आणि गोळ्यांचा मारा सुरू केला. मोगलांची क्षणात तिरपिट सुरू झाली. कोण कुठून हल्ला करतोय , कुठून बाण येताहेत हेच समजेना , गनिमी काव्याच्या हल्ल्याचा हा खास नमुना होता. अक्षरश: ऊंबरखिंडीत तुडवातुडव , चेंदामेंदी , आरोळ्या , किंकाळ्या यांनी
हलकल्लोळ उडाला, मोगलांना धड पुढेही जाता येईना अन् मागेही येता येईना.
याला मनतात गनिमी कावा ......... याचा वापर करून महाराजांनी भल्याभल्याना पाणी पाजले.
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 
नोट :- वरील सर्व माहिती  ||विरराजे युवा प्रतिष्ठान|| " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( posted by - Rushabh Borse ) यांच्या छान पोस्टचा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

 


Thursday 21 February 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले भास्करगड ।।


भास्करगड (बसगड) किल्ला
किल्ल्याची उंची : समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर
किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग
श्रेणी : मध्यम
जिल्हा :
नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास "त्र्यंबक रांग" असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसर्या टप्प्यात ब्रम्हगिरी, अजनेरी हे किल्ले येतात.प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘भास्करगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

इतिहास :
त्र्यंबक डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर असलेल्या या किल्ल्याचा इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही. पण काताळात खोदलेल्या किल्ल्यावर जाण्याचा सर्पिलाकार मार्ग व पाण्याची सातवहान कालीन टाकी किल्ल्याच प्राचिनत्व सिध्द करतात.
इ.स १२७१ ते १३०८ पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या अधिपत्याखाली होता. नंतर बहामनी पुढे निजामशाही यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीच्या अंतकाळात इ.स १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड केले, तेव्हा भास्करगड त्यांच्या ताब्यात गेला. १६३३ मध्ये शहाजी राजांकडून हा किल्ला मोगलांकडे गेला १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला.१६८८ मध्ये मोगलांनी भास्करगड जिंकून घेतला. इ.स १७३० मध्ये कोळ्यांनी बंड करुन तो घेतला पूढे १८१८ पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

गडावरीलपहाण्याची ठिकाणे :
भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

गडावर जाण्याच्या वाटा:
खोडाळ्यातून त्र्यंबकेश्वरला जाताना "निरगुडपाडा" या गावाच्या अलिकडे एक कच्चा रस्ता फणीच्या डोंगराला उजव्या बाजूला ठेवत बसगडच्या पायथ्याशी पोहचतो. बसगडच्या पायथ्याशी पोहचण्यापूर्वी एक नाला ओलांडावा लागतो. नाला ओलांडल्यावर भास्करगडच्या चढाइला सुरुवात होते. दिड तास मळलेल्या पायवाटेवरुन केलेल्या चढाइ नंतर आपण कातळकड्याच्या पायथ्याशी येतो. येथून उजव्याबाजूने जाणारी पायवाट कातळकड्याला वळसा घालून कातळात खोदलेल्या पायर्यांपाशी येते. पायर्या चढून गेल्यावर प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करतो.

"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१) मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

३) कसारा किंवा नाशिक मार्गे :- कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे भास्करगडाच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. भास्करगडाच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्या आहेत.
तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहर गड व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.

रहाण्याची सोय : गडावर रहाण्याची सोय नाही, निरगुडपाड्यात होऊ शकते.

जेवणाची सोय व पाण्याची सोय :  गडावर किंवा गावात जेवणाची व पाण्याची सोय नाही. आपण स्वतःच करावी.


नोट :- वरील सर्व माहिती "गडवाट" व " ||विरराजे युवा प्रतिष्ठान|| " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट ( posted by - गणेश रामचंद्र कारंडे ) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

|| शिवजन्म घटका ||


पुत्र कोणाला झाला ?
पुत्र जिजाबाईसाहेबाना झाला !
पुत्र शहाजीराजांना झाला !!
पुत्र सह्याद्रीला झाला !!
पुत्र महाराष्ट्राला झाला !!!
पुत्र अवघ्या हिंदुस्तानाला झाला !


शास्त्रीबुवांनी बोटे मोजली घटकापाळांचे गणित मोजले.कुंडलीची घरे ग्रह धरू लागली. कुंडली मांडून होताच शास्त्रीबुवांनी जिजाबाईंकडे पाहिले.


जिजाऊ म्हणाल्या -" शास्त्रीबुवा संकोच न करता स्पष्टपणे सांगा या पोराच्या वेळी दिवस गेले आणी घरादाराचा थारा उडाला कुणाचा कुणाला मेळ लागेना. रक्ताच्या नात्याने वैर पत्करलं, जहागिरीवर सोन्याचे नांगर फिरले, आजोबांचे छत्र हरले (लखुजी जाधव ज्यांचा विजापुरी दरबारात खून करण्यात आला), या मितीला या पोराचे वडील शत्रूमागे धावत आहेत. याचा थोरला भाऊ लहान त्याची ही या वणवणीतून सुटका नाही. सा-या मुलखाची अन्नान दशा झाली आहे. परमुलखात परठिकाणी ना माहेरी ना सासरी मी या मुलाला जन्म देत आहे. पोटात असता ही त-हा आता त्याच्या पायगुणाने आणखी काय धिंडवडे निघणार आहेत, तेवढे सांगून टाका ".

हे ऐकून सा-यांचे
चेहेरे व्यथित झाले. शास्त्रीबुवा मात्र शांतच होते व त्यांच्या चेह-यावरील लवलेश बदलला नाही व त्यांनी भविष्य सांगण्यास सुरवात केली, राणीसाहेब असे अभद्र मनात आणू नये, अशुभाचा मनाला स्पर्शही होऊ देऊ नका. दुर्भाग्य संपल भाग्य उजाडलं प्रत्यक्ष सूर्य पोटी आला आहे. 
जिजाऊ खिन्न पणे हसल्या, "मुलाची कुंडली सांगताना प्रत्येक शास्त्री हेच म्हणतो "

शास्त्री गंभीर झाले ते निश्चल आणि खणखणीत आवाजात बोलू लागले.
" राणीसाहेब असा अविश्वास धरू नका. या शास्त्र्याचं भाकीत कधीही खोटे ठरले नाही. द्रव्य लोभाने नव्हे तर ज्ञानाच्या अनुभवानं, आत्मविश्वासाने मी हे भाकीत केले आहे ते कालत्रयी चुकणार नाही हे मूल जन्मजन्मांतरीचे पांग फेडेल. राणीसाहेब पापाचा घडा भरला आहे.धरित्री त्रस्त झाली आहे देवकी वसुदेव बंदीशाळेत असतानाच श्रीकृष्ण जन्माला आला. हे कृपा करून विसरू नका ".

जीजाबाई समाधानाने म्हणाल्या.. "
आपल्या तोंडात साखर पडो ".
 त्यांची नजर कुशीतल्या बाळाकडे गेली. मुठी चोखीत ते शांतपणे झोपी गेले होते. सर्वांच्या चेह-यावर एक प्रकारचे समाधान झळकत होते. जणू शास्त्रीबुवांनी भविष्य सांगत असतानाच या तेजस्वी पुत्राने शिवनेरी जिंकला होता...



संदर्भ : "श्रीमानयोगी"
 

Tuesday 19 February 2013

१९ फेब्रुवारी जगाच्या इतिहासतील एक सुवर्ण दिवस....



१९ फेब्रुवारी याच दिवशी हिंदुस्तानात स्वांतंत्र्याची अखंड मशाल पेटवणारे, स्वातंत्राची नवी उर्मी जागृत करणारे, पराक्रम व देशप्रेमाची जाज्वल्य परंपरा निर्माण करणारे, रयतेवर जीवापाड माया करणारे, ३५० वर्षानंतरहि १२५ कोटी देशवासीयांच्या हृदयात आढळ स्थान प्राप्त झालेले शौर्य, धैर्य, पराक्रम यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, राजमान्य, राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी , क्षत्रीयकुलावतंस, सिँहासनाधीश्वर, महाराजाधिराज जाणता राजा श्रीमंत योगी श्री ।। छत्रपती शिवाजी महाराज ।। .....  हे महाराष्ट्राच्या पावन मातीत किल्ले शिवनेरी वर जन्मले.........

पुत्र कोणाला झाला ?
पुत्र जिजाबाईसाहेबाना झाला !
पुत्र शहाजीराजांना झाला !!
पुत्र सह्याद्रीला झाला !!
पुत्र महाराष्ट्राला झाला !!!
पुत्र अवघ्या
हिंदुस्तानाला झाला !!


संपूर्ण हिंदुस्तानाला आपल्या घोड्यांच्या टापांखाली रगडणार्‍या मोघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांना ज्यांनी सळो-की-पळो करून सोडले... सडेतोड जवाब देऊन आपली जागा दाखवून दिली, इथल्या मातीत आणि या मातीतल्या मावळ्यांच्या मनात व आचरणात ज्यांनी स्वाभिमान, स्वातंत्र्य पेरलं व ह्या भूतलावर जन-सामन्यांचे अखंड हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि अश्या स्वराज्याचे पहिले 'छत्रपती' झाले..........


अश्या शिवकल्याण जाणता राजा छत्रपती शिवराय यांच्या जन्मोत्सव या सोनेरी दिवसाच्या सर्व शिवभक्तानां आणि शिवरायांच्या मर्द मावळ्यानां खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा ...!!!


महाराष्ट्राचा स्वाभिमान .... मराठ्यांचा अभिमान.... आपले पूर्वज ...... आमची... आन ...बाण....आणि ...शान ...फक्त छत्रपती शिवराय...!!!!!!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

 


Friday 15 February 2013

शिवरायांचे शिलेदार - सरसेनापती धनाजीराव जाधवराव

|| सरसेनापती धनाजीराव जाधवराव ||
जन्म - इ स १६४९
मृत्यू - इ स १७१०

धनाजी जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता.

छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी सारख्या ८००-९०० मैल दुर असलेल्या प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि ईथुनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फोज फाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते राजे बनले.
त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत असे त्यामूळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली व वतनदारीस सुरुवात् झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाउन मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल व भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.
धनाजी जाधवराव , संताजी घोरपडे हे दोघे सरदार होते ,दोघेही देशप्रेम नावाची चिज बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन अकस्मात माघार घ्यायची. "स्वराज्य" ही कल्पना टिकवुन ठेवन्यासाठी ह्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.

राजाराम महाराजांच्या काळात धनाजी जाधवराव यांनी फलटण च्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई देवून शास्तेखान व रणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी
" वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून 'जयसिंगराव' हा किताब दिला "

राजाराम महाराजांचा मुक्काम हा पन्हाळगडावर सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत होता, २६ सप्टें १६८९ या दिवशी राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरून गुप्त वेश धारण करून पलायन केले. राजाराम महाराज पन्हाळगडावर असताना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांनी मोघली सैन्यावर छापे घालण्यास सुरवात केली. त्याची एक नोंद मिळते ती अशी
“…. शत्रूस उपद्रव करण्या हेतू रामचंद्रपंत यांच्या आज्ञेनुसार संताजी घोरपडे, आणि धनाजी जाधव यास शेख निजामावर पाठवले, निजामाला जिंकण्यासाठी गेलेल्या संताजी घोरपडे आदिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून नंतर त्याचे हत्ती-घोडे पुष्कळ द्रव्य हरण केले. तेव्हा अंगावर जखमा झालेला निजाम जीव वाचवून पळून गेला”
राजाराम महाराज चंदी प्रांतात(जिंजी) जाताना धनाजी जाधवराव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना ' साहेबनौबत ' हे पद दिले ,पुढे काही कारणास्तव सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर इतराजी झाली त्यावेळी सेनापती पद धनाजी जाधवराव यांच्याकडे दिले,
इ.स १७०६ मध्ये सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले होते व त्यांनि बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद करून मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात परत आले होते.
मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातार्यास पोहचले. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाईने शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला; तथापि शाहू महाराजांनी स्वत:स सातार्यास राज्येभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८) . शाहू महाराज हेच खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.

संदर्भ :-
१) केशवपंडित विरचित ‘राजारामचरितम’
२)मल्हार रामराव चिटणीस बखर

सौजन्य- इतिहासाच्या वाटेवर

 नोट : वरील सर्व माहिती " ||विरराजे युवा प्रतिष्ठान|| " या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट (- गणेश रामचंद्र कारंडे) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे.

माझ्या स्वराज्यातील गवताची काडी सुद्धा गाहाण पडता कामा नये ...


स्वराज्या साठी शिवाजी महाराजांना कर्ज हवे होते...
शिवाजी महाराज सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी साठी गेले…
तेव्हा सावकार म्हणाला महाराज तुम्ही कोण म्हणून आलात...
छत्रपती म्हणून आलात कि कर्जदार म्हणून आलात...
तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले...
मि छत्रपती कर्जदार म्हणून आलो आहे..
तेव्हा सावकार म्हणतो जर असे असेल तर ...
तुम्हाला काही तरि गाहाण ठेवावे लागेल ...
शिवाजी महाराज म्हणतात अरे माझ काय आहे सर्व काही स्वराज्याच आहे मी काय गाहाण ठेवणार...
तेव्हा सावकार म्हणतो जर तुमच्या कडे ठेवण्यासाठी काही नसेल तर कर्ज मिळणार नाही....
बाजूला पडलेली गवताची काडी शिवाजी महाराज उचलतात व सावकारा कडे गाहाण ठेवतात व कर्ज घेतात.
महाराज सुरतेची मोहीम काढतात व सुरत जिकून येतात...
शिवाजी महाराज आणि कोंडाजी घेतलेले कर्ज देण्यासाठी सावकाराच्या घरी जातात..
सावकाराचे कर्ज परत फेड करतात आणि आपल्या स्वराज्यातली
गाहाण पडलेली गवताची काडी परत मागतात...
तेव्हा कोंडाजी म्हणतो…
"" महाराज त्या गावाच्या काडीची किमंत काय घेतली काय अन न घेतली काय ""... 

तेव्हा महाराज म्हणतात ....

""
नाही
कोंडाजी,  माझ्या स्वराज्यातील गवताची काडी सुद्धा गाहाण पडता कामा नये  ""...

एक आवाज... एकच पर्याय...
बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||



Tuesday 12 February 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले हरिहरगड ।।


हरिहर किल्ला

किल्ल्याची उंची : -----
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः .....
जिल्हा : नाशिक
श्रेणी : मध्यम



नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. 

इतिहास : 
अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला. शेवटी १८१८ मध्ये हा गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला. इतकी मालकी अनुभवणारा हा किल्ला इतिहासकाळात शेजारच्या त्र्यंबकगडा पाठोपाठ या भागातील महत्त्वाचा दुसरा किल्ला आहे. कारण आजही या किल्ल्याच्या पायथ्याच्या वाडयांना टाकेहर्ष, आखली हर्ष अशा नावाने ओळखले जाते.
असा हा त्रिकोणी आकाराचा हरिहरगड त्याचा सरळसोट दगडी जिन्याचा मार्ग, पुढे लागणारा बोगदा व गडावरील सर्व दुर्ग अवशेष वैशिष्टयपूर्ण असेच आहेत. त्याच्यावर पोहोचण्यासाठी दगडात खोदलेल्या खडया जिन्याच्या मार्गामुळे दुर्गयात्रींच्या परिचयाचा आहे. समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीवर उभा असलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला, त्याचा कातळ कोरीव पाय-यांचा मार्ग, त्याची बोगद्यातून करावी लागणारी अंतिम चढाई हे सारं सारं गिरिप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. १८१८ सालच्या मराठेशाही बुडविण्याच्या इंग्रजांच्या धडक कारवाईत कॅप्टन ब्रिग्ज हा इंग्रज अधिकारी हरिहरगड जिंकून घेतांना याच्या पाय-या बघून आश्चर्यचकित झाला व उद्गारला, "या किल्ल्याच्या पाय-यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात". खरेतर त्या वेळी इंग्रजांचे धोरण गिरीदुर्गाच्या वाटा व प्रवेशमार्ग तोफा लावून उद्ध्वस्त करण्याचे होते. त्या धोरणास अनुसरून त्यांनी अनेक गडांचे मार्ग उद्ध्वस्त केलेसुद्धा (उदा. अलंग-मदन- कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इ.) पण हरिहर किल्ल्याच्या अनोख्या पाय-यांनी आपल्या राकट सौंदर्याची मोहिनी अशी काय कॅप्टन ब्रिग्जवर घातली की त्याने हरिहरगड जिंकून घेतला पण त्याच्या सुंदर पाय-यांच्या मार्गाला मात्र हात लावला नाही. यावरूनच लक्षात येते की हरिहर त्याच्या पाय-यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.

किल्ल्यावर पाहण्यासारखे : 
हरिहर किल्ल्याच्या पायथ्यावरून किल्ल्याच्या पाय-यांच्या मार्गाकडे दृष्टी देताच हा अक्षरश: गगनाला भिडलेला मार्ग पुढे आपणास स्वर्गारोहणाचा अद्भुत अनुभव देईल, याबद्दल मनात तिळमात्र शंका उरत नाही. काळ्या कातळात एका पाठोपाठ एक पाय-या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. म्हणून काळजीपूर्वक वाटचाल करावी. शेवटी साधारण नव्वद पाय-यांचा सोपान चढल्यावर आपण हरिहर किल्ल्याच्या पहिल्या छोटेखानी पण देखण्या प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. आपण येथे थोडा वेळ थांबून थंडगार वा-याचा आनंद घ्यायचा व पुढील चढाईस ताजेतवाने व्हायचे.
हरिहर किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार व त्याच्या दोन्ही बाजूस असणारे दोन लहान बुरूज कातळात खोदून काढलेल्या मार्गाची शोभा वाढवितात.
या  पुढे गेल्यानंतर आपण काही वेळातच किल्ल्याच्या अजस्र अशा काळ्या पहाडासमोर येतो. गडाच्या या प्रवेशद्वारा शेजारीच गणरायाची शेंदूर फासलेली एक छोटी मूर्ती दिसेल. गडावर ठिकाणी डोंगराच्या मध्यभागी शेंदूर फासून ठेवलेले अनगड देव आपणास दिसतील. त्यांच्या मध्यभागी एक त्रिशूळही रोवून ठेवलेला असून हा अनामिक देवतांचा दरबार येथून जाणा-या-येणा-यांचे लक्ष वेधून घेतो.या मार्गाने अंग चोरत पुढे गेल्यानंतर कातळातच खोदलेले दोन दरवाजे पार केल्यावर परत साधारण १३० पाय-यांचा दगडी जिना लागतो. या मार्गाच्या दोन्ही बाजूससुद्धा हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबणी असून त्यांची मदत घेत आपण धापा टाकत शेवटी अंतिम प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो. हरिहर किल्ल्याचा हा शेवटचा छोटा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला खालच्या बाजूला एक गुहा आहे. पण तिथे उतरण्यासाठी दोराची मदत घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव लागेल. पश्चिम बाजूने दगडी भिंत बांधून पाणी अडविलेल्या या तलावाच्या काठावर हनुमंताचे छोटे देऊळ असून येथील बाजूच्या खडकावर उघडयावरच शिवलिंग व नंदी आपणास दिसेल.
पुढे पायवाटेच्या उजव्या हातास ५०-६० फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते. हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माथा असणारी ही टेकडी आपण शेवटचा कातळटप्पा चढून पार करायची. येथे माथ्यावर पोहोचताच अगदीच छोटया सपाटीवर देवांची दाटी दिसते. या टेकडीच्या माथ्यावरून सभोवारचे दृश्य मात्र फारच छान दिसते. उत्तरेला नजर फेकताच वाघेरा तर दक्षिणेला वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले कावनाई व त्रिंगलवाडी किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षक दिसतात. पूर्वेला कापडया, ब्रह्मा व त्यांच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला उर्फ त्र्यंबकगड दिसतो.
खाली उतरून समोरील घुमटाकार माथा असलेल्या दगडी ३० फूट लांब व १२ फूट रुंद अशा या दगडी कोठीत जावे. कोठीचा प्रवेशद्वार मात्र अगदी छोट्या खिडकीसारखे असून या कोठीत दिवसासुद्धा काळोख असतो. इतिहास काळातील ही दारूकोठाराची वास्तू गडावरील एकमेव छत शाबूत असलेली इमारत आहे. येथून समोर दिसणारा ब्रह्मा डोंगर फारच सुंदर दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी व्यवस्थितरीत्या पूर्ण करण्यास दोन तास लागतात. गड पाहून परत उतरताना मात्र आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते.
 
गडावर कसे जाल :
हरिहरला भेट देण्यासाठी आपण नाशिकच्या बसस्थानकावरून घोटी किंवा खोडाळ्याला जाणारी बस पकडायची. त्या बसने आपण उतरायचे मात्र निरगुडपाडा गावात. बसमधून पायउतार होताच समोरच्या उजव्या हाताला हरिहर ऊर्फ हर्षगडचा वैशिष्टयपूर्ण डोंगर दिसतो. तेथून अगदी मळलेल्या वाटेने आपण तासाभरात हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. जे दुर्गप्रेमी त्र्यंबकेश्वरहून इकडे येणार आहेत त्यांना सोईचा असा एक दुसरा मार्गसुद्धा आहे. त्र्यंबकेश्वराहून मोखाडा किंवा जव्हारला जाणा-या बसने त्यांनी साधारण १५ कि.मी. चा प्रवास केल्यावर डाव्या हातास हर्षवाडी फाटयावर उतरावे. येथून कळमुस्ते मार्गे साधारण ४ कि.मी.ची पायपीट केल्यानंतर आपण हर्षवाडीजवळ येऊन पोहोचतो. येथून एका बंधा-याच्या काठाने पुढे साधारण पाऊण तासाची खडी चढाई केल्यानंतर आपण हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो. या रम्य वाटेवर एक आश्रम, त्याच्या शेजारी प्राचीन दगडी पुष्करिणी व गणेश मंदिरही आपणास पाहता येते. निरगुडपाडयावरून काय किंवा हर्षवाडीकडून काय, दोन्ही वाटा आपणास साधारण तासाभराच्या पायपिटीनंतर हरिहर किल्ल्यासमोरील मोकळ्या पठारावर आणून सोडतात.

राहण्याची सोय : राहण्याची सोय नाही.

पाण्याची सोय : पाण्याची व जेवणाची सोय स्वतः करावी.

गड पाहण्यासाठी लागणारा वेळ : साधारणता २-३ तास लागतात.

नोट : वरील सर्व माहिती  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट -by  (संकलन - फक़्त राजे) चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 

छत्रपती शिवराय एक युगपुरुष...


सूचना : हि पोस्ट  - अजय वीरसेन जाधवराव ( Admin - गडवाट परिवार ) यांनी गडवाट या facebook वरील ग्रौप  पोस्ट केली होती.  मला ती आवडली म्हणून मी खास आपल्या साठी इथे पोस्ट कारत आहे.



""""" छत्रपती शिवराय एक युगपुरुष...युग पुरुष म्हणजे लाखो वर्षांनी जन्माला येणारे नरश्रेष्ठ...एक जाणताराजा .
परंतु आजकाल ह्या महान युगपुरुषाला एका विशिष्ट चौकटीत बांधून त्यांचा वापर एक "brand ambassador " म्हणून सध्याच्या घाणेरड्या राजकारणा साठी केला जातो... त्यामुळे छत्रपती शिवरायांचे अनेक दुर्लक्षित पैलू जगासमोर येतच नाहीत....किंवा ते पैलू जाणूनबुजून जगासमोर आणले जात नाहीत.... अहो देवगिरी साम्राज्याचा अस्तानंतर ह्या हिंदुस्तानाने खरे खुरे हिंदुस्तानी राज्य अनुभवले असे तर ते छत्रपती शिवरायांच्या रूपानेच ...८०० वर्षांचे जुलमी यवनी साम्राज्य मुळासकट उलथवून टाकणारे एक अद्वित्य व्यक्तिमत्व होते छत्रपती शिवराय.

कोण म्हणते शिवराय कट्टर हिंदू होते त्यांनी हिंदूंचे राष्ट्र स्थापन केले, कोण म्हणते ते कट्टर मराठा होते त्यांनी मराठ्यांचे राज्य स्थपन केले तर कोण म्हणते शिवराय निधर्मी होते त्यांनी बहुजानानाचे राज्य स्थापन केले.एवढीच ओळख आहे का ह्या युग-पुरुषाची ???

अहो आज आपण जे छत्रपती बघतो किंवा आपल्या ते दाखवले जातात ते एका हिमनगाचे छोटेसे टोक आहे ह्या टोकाखाली दडलेला महाकाय हिमनग आपण पाहत नाही किंवा पहायचे धाडस आपण करत नाही ...शिवरायांच्या नावाने घोषणा देताना सर्वप्रथम नाव कुणाचे घ्याचे ह्यावर आपण वाद घालतो, शिव जयंती तिथीप्रमाणे कि तारखे प्रमाणे साजरी करण्याहून वाद घालतो... हे फारच दुर्दैवी आहे आपले. आज शिवरायांच्या विचारांपेक्षा त्यांच्या विचारांबाबत आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे दर्शवन्यातच आपण धन्यता मानतो...शिवरायांचे विचार वाटून खाण्यात ती काही आपल्या पूर्वजांची मालमत्ता नाही...शिवरायांच्या जीवनावर आधरित दोन पुस्तके अथवा कादंबऱ्या वाचून आपल्याला शिवरायांचा ५० वर्षांचा संपूर्ण इतिहास समजला असे जर कोण समजत असेल किंवा तसा आव आणत असेल तर ते हास्यास्पद आहे.

संपूर्ण शिवराय समजने हे काही एका जन्माचे काम नव्हे, त्याला कितीतरी जन्म घ्यावे लागतील. वयाच्या १८व्या आपल्या अलौकिक बुद्धीचे व प्रगल्भ युद्धनीतीचा वापर करत आदिलशाह विरुद्ध लढलेल्या पहिल्या घोषित युद्धात म्हणजे पुरांधारच्या पहिल्या युद्धात महाराजसाहेबांनी कशी सरशी केली होती ह्यावर पण चर्चा करत नाही.. महाराजानी जवळ जवळ ३५० गड-किल्ले बांधले अथवा त्यांचा जीर्नोधार केला पण त्या-प्रत्येक गड-किल्ल्याचा वापर महाराजानी का व कसा केला ह्यावर कोण वाद घालत नाही.....हल्ली चर्चा होती ती फक्त त्यांच्या धर्मकारणाची .... चर्चा करायचीच असेल तर शिवरायांच्या पराक्रमची करा...समाजकारणाची करा...राजकारणाची करा..त्यांच्या युध्नितीची करा ...आणि ह्यातूनच खरे शिवराय आपल्याला व संपूर्ण कळतील. """""
 

""" शिवरायांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा शिवरायांचे विचार जर आपण आपल्या डोक्यात खोलवर रुजवले तर हा भारत देश जगातील सर्वशक्तिमान महासत्ता होण्यास जास्त वेळ लागणार नाही  """ सच्च्या शिव-भक्ताचे हेच उद्धिष्ट असावे.

आपला,
बद्रीनाथ मदनराव कदम.

एक आवाज... एकच पर्याय...
बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||


Monday 11 February 2013

|| शिवचरित्र ||

 शिवचरित्र काय शिकवते.......



१) आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे.वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

२) उठा जागे व्हा! थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही.

३) जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.

४) अहंकारापासून तितकेच सावध रहा,जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता.

५) प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ फार वेगाने पुढे जात आहे.म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबलाने कामाला लागा तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल.

६) कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी, करून घेऊ नका.स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला मोकळे राहू देऊ नका.जीवन गांभीर्याने जगा तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फार थोडाच आहे. बेसावधपणे तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल.

७) धैर्य व अशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल.तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा,आवश्यक वाटत असेल त्तर संपूर्ण जगाला आव्हान द्या,यामुळे तुमचे काही नुकसान होणार नाही.

८) थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेतआणि त्यांच्याच वाटेचे दुसर्यांनी अनुकरण केले आहे.

९) एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय.परंतु एकटेपणापासून घाबरणे,त्रागा करणे,कर्तव्यापासून विचलित होणे हे महापाप होय.
एकटेपण हे आपल्या स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे.स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्टतम शक्तींना प्रकाशात आणू शकता.


शिवचरित्र  ::  वाचा.........विचार करा.........अंतर्मुख व्हा........

 एक आवाज... एकच पर्याय...
बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||

छञपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

    ........अष्टप्रधान मंडळ.........

अष्टप्रधानमंडळ हे महाराजांसाठी खूप महत्वाचे होते. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.

१] सकल राजकार्य धुरंधर विश्वासनिधि श्रीमन - राजश्री पंडित पंतप्रधान मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे...!

२] प्रौढ़ प्रतापवंत समरधुरंधर राव राजश्री सरसेनापति - हंबीरराव मोहिते...!

३] राजश्रियाविराजित सकल राजकार्यधुरंधर राजश्री पंतसचीव - आन्नाजी दत्तो परभणीकर...!

४] अखंडित लक्ष्मीअलंकृत सकल गुणऐश्वर्यसंपन्न राजश्री रामचंद्र नीळकंठ बहुतकर पंडित पंतअमात्य...!

५] सकल राजकार्यधुरंधर श्रीमान राजश्री त्र्यंबक सोनदेव डबीर, पंडित पंतसुमंत...!

६] मोक्षश्रियाविराजित वेदशास्त्रसंपन्न दानाध्यक्ष पंडितवर्य रघुनाथपंत पंडितराव...!

७] राजश्रिया विराजित सकल राजकार्य धुरंधर राजश्री दत्ताजी त्र्यंबक वाकनिस पंडित पंतमंत्री...!

८] सकल विद्यालंकृत, न्यायशास्त्रसंपन्न पंडितवर्य राजश्री निराजी रावजी नासिककर,सरन्यायाधीश...!

९] सागरसमरधुरंधर, विश्वासनिधि, दौलतखान...!



||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥