Thursday 29 March 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- किल्ले तोरणागड

 
तोरणा किल्ला

किल्ल्याची उंची :- १४०० मीटर
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- पुणे
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम

शिवाजी महराजांनी सुरवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा . गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा . महाराजांनी गडाची पाहणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे "प्रचंडगड " असे नाव ठेवले . पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सहयाद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजी मध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे . याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पशिमेला कानद खिंड , पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत .

इतिहास :- हा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही .येथील लेण्याच्या अन मंदिराच्या अवशेषावरून हा शैवपंथाचा आश्रम असावा इसवी सन १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला . पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले . गडावर काही इमारती बांधल्या . राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडाचा जीर्णोद्धार केला . त्यात ५००० होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजाचा वाद झाल्यावर हा किल्ला मोगलाकडे गेला.शंकराजी नारायण सचिवानी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले . पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा हा महाराजाकडेच राहिला . विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.



गडावरील पाहण्यासारखे ठिकाण :- .

गडावर जाण्याच्या वाटा :- कठीण -राजगड - तोरणा मार्गे

राहण्याची सोय :-गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जनाची राहण्याची सोय होते .

जेवणाची सोय :- आपण स्वताच करावी .

पाण्याची सोय :- .मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारमाही पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :-अडीच तास वेल्हेमार्गे , ६ तास राजगड-तोरणा मार्गे .



नोट :
वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .








Monday 26 March 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :किल्ले शिवनेरी



किल्ले शिवनेरी

किल्ल्याची उंची :- ३५०० फुट
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- नाणेघाट
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे .जुन्नर मध्ये शिरतानाच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे हे जन्मस्थान. किल्ला तसा फार मोठा नाही. १६७३ मध्ये इस्ट इंडिया कंपनी मधील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधन ग्रंथात या किल्ल्यावर हजार कुटुंबाला सात वर्षे पुरेल एवढी सिद्ध सामुग्री आहे असा उल्लेख केला आहे ..

इतिहास :- "जीर्णनगर", "जुन्नेर" म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे . जुन्नर हि शकराजा नहपानाची राजधानी होती.सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर आणि इतर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघात हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणत वाहतूक चालत असे . यावर नजर ठेव्नायास्ठी या मार्गावरील या दुर्गाची निर्मिती करण्यात आली सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सात वाहनानंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटीच्या सत्तेखाली होता ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले . आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इसवी सन १४४३ मध्ये मलिक - उल -तुजार याने यादवाचा पराभव करून किल्ला सर केला .अशा प्रकारे किल्ला बहुमानी राजवटी खाली आला इसवी सन १४७० मध्ये मलिक उल तुजार चा प्रतिनिधी मलिक महमद याने किल्ला पुन्हा नाके बंदी करून पुन्हा सर केला 1446 मध्ये मलिक महमद च्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली . निजामशाहीची स्थापना झाली . पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगर ला हलविण्यात आली . इसवी सन १५६५ मध्ये सुलतान मुर्तीजा निजामने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजामात गरोदर असताना जाधारावानी ५०० स्वर त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले शिवनेरी गडावर श्री भवानी सिवाई तीस नवस जिजाउ ने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन त्याउपर शिवाजीराजे यांचा जन्म झाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार इसवी सन १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोघलांच्या ताब्यात गेला १६५० मध्ये मोघालाविर्रूढ येथील कोळ्यांनी बंड केले यात मोघलांचा विजय झाला इसवी सन १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फीतवून किल्ल्याला माळ लाऊन सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इसवी सन १६७८ मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला आणि अपयश पदरात पुढे ४० वर्षानंतर १७१६ मध्ये शाहू महाराजानी किल्ला मराठेशाहीत आणला आणि नंतर तो पेशव्याकडे हस्तांतरित करण्यात आला.

गडावरील पाहण्यासारखे ठिकाण :- सात दरवाज्याच्या वाटेने गडावर येताना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यानंतर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यानंतर "शिवाई देवीचे " मंदिर लागते मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत . य गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे .शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोरच अंबरखाना आहे आजमितीस य अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठ्विनायासाठी केला जात असे . अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात . एक वाट समोरच असणाऱ्या टेकडावर जाते या टेकडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते. वाटेत गंगा जमुना याशिवाय पाण्याच्या अनेक टाकी लागतात . जिजाउच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे असा आवीभार्वातील मायलेकरांचा पुतळा " शिवकुंजा " मध्ये बसविला आहे शिव्कुन्जासामोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो .येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे हि इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायाचा जन्म झाला तिथे शिवरायाचा पुतळा बसविण्यात आला आहे . इमारतीच्या समोरच 'बदामी पाण्याचे टाक ' आहे . येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो .सुमारे दीड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासठी होत असे .गड फिरण्यास दोन तास पुरतात . वर किल्ल्यावरून चावंड नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो .

गडावर जाण्याच्या वाटा :- गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात . पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते .
साखळीची वाट :- या वाटेने गडावर याचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्थानक समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे .येथे चार रस्ते एकत्र मिळतात .डाव्या बाजूने जाणार्या रस्त्याने साधारणता एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते .मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते . भिंतीला लावलेल्या साखळीच्या सहाय्याने आणि कातळ खोदलेल्या पायरया च्या साह्याने वर पोहचता येते . हि वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊन तास लागतो .
सात दरवाज्याची वाट :- शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायरायशी घेऊन जातो . या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात . पहिला महादरवाजा , दुसरा पीर दरवाजा , तिसरा परवानगीचा दरवाजा , चौथा हत्ती दरवाजा , पाचवा शिपाई दरवाजा ,सहावा फाटक दरवाजा , आणि शेवटचा सातवा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा .. या मार्गे किल्ल्यावर पोहोचन्यासाठी दीड तास लागतो .
मुंबईहून माळशेज मार्गे :- जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यानंतर ८ ते ९ किलोमीटरवर 'शिवनेरी १९ किलोमीटर ' अशी एक पती रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते . हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो .या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो .
राहण्याची सोय :-या किल्ल्यावर शिव कुन्जाच्या मागील बाजूस असणाऱ्या व्हरानड्या मध्ये १०-१२ जनाची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :- किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपणच स्वतःच करावी
पाण्याची सोय :- गंगा आणि जमुना या टाक्या मध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे .
जाण्यासाठी लागणारा वेळ :-साखळीच्या मार्गे पाऊन तास आणि सात दरवाजा मार्गे दीड तास ...
 


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .



Saturday 24 March 2012

माझा एक मुजरा....

एक मुजरा........
एक मुजरा शिवछत्रपतींच्या पुत्राला.....
एक मुजरा स्वराजाच्या शिलेदाराला....
एक मुजरा भगव्याच्या रक्षकाला......
एक मुजरा सह्याद्रीच्या छाव्याला.....
एक मुजरा माझ्या शंभूराजाला .......!!

 !! छत्रपती संभाजी महाराज !!


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


श्री क्षेत्र तुळापुर येथे प्रवेश कमानीवर बसवण्यात आलेली शंभूराजांची भव्य मूर्ती..

सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात हि जात मराठ्याची..!!


Thursday 22 March 2012

धर्मवीर छत्रपती श्री शंभू राजेंना माझा त्रिवार मानाचा मुजरा...!!!



|| धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ||


छत्रपती संभाजी राजे यांच्या विषयी थोडक्यात:

1. जगातील पहिले बुलेट पृफ जॉकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा
2. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा
3. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात ८०० मीटर सेतू बांधणारा
4. आदिलशाही ,कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याच वेळी सिद्धी ,पोर्तुगीज व इंग्रजाना त्यांच्या बिळातकोंडून ठेवणारा त्याच वेळी मोघलानचा गर्दनकाळ ठरलेला
5. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणू...न डोंगर पोखरून जल नियोजन करणारा . 6. उत्तर प्रदेशपासून दूर तामिळनाडूकर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा
7. इतर धर्मांचा मान सन्मान करणारा आणि धर्मातरावर कायदेशीर बंदी घालणारा
8. बालमजुरी व बेट बिगरि विरुद्ध कायदा करणारा
9. शिवप्रभुंची इच्छा पूर्णकरण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधरा दिवसात दूर मध्य प्रदेशातील बुर्हाणपूरवर छापा घालणारा
10. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा
11. देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा
12. दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पिक कर्ज योजना राबविणारा
13. सैनिकांच्या उत्पनाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा
14. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा
15. स्वत:चे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा


असा
आपला " शंभू राजा.."

धर्मवीर छत्रपती श्री शंभू राजेंना माझा त्रिवार मानाचा मुजरा...!!! 
आबासाहेब जोपर्यंत ह्या संभाजीच्या प्राणामद्धे प्राण आहे ना - तोपर्यंत तुम्ही कमावलेला एकही किल्ला तुमच्यापश्चात हा संभाजी मोगलांच्या हातात जाऊ देणार नाही...!! स्वतः खूप वेदना सहन केल्या पण आबासाहेबांना दिलेलं वचन शेवटपर्यंत सत्य करून दाखवला...!!


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Saturday 17 March 2012

!! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !!

!! महाराष्ट्राचे आराध्य दैवत -छत्रपती शिवाजी महाराज !!

शिवाई देवीच्या आशीर्वादाने जन्माला आला प्रख्यात शिव शंकराचा चा अवतार,

पुत्र झाला जिजाऊ ला,,पुत्र झाला शहाजीना ,

पुत्र झाला मराठ्यांना ,,पुत्र झाला सह्याद्री ला ,

पुत्र झाला महाराष्ट्राला ,,पुत्र झाला अवघ्या भारत वर्षा ला,

अखंड भारतावर ज्या सह्याद्री च्या छाव्याने आपलं स्वराज्य निर्माण केले
आणि जनतेला सुख संपन्न केले त्या माझ्या " राजा शिव छत्रपतीला " .....
                                        आमचा तुमचा सर्वांचा आदराचा मानाचा मुजरा ...!!!

!! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज !!

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


Tuesday 13 March 2012

|| मृत्युंजय अमावस्या ||

धर्मवीर,  मृत्युंजय छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधी
स्थळ : श्रीक्षेत्र वढू बु. ता. शिरूर, जी. पुणे.

" इस्लाम स्वीकारण्यास नकार देऊन औरंगजेब बादशहाचा अपमान करणाऱ्या शंभूछत्रपतींनी ज्वलंत इतिहास निर्माण केला. बलाढ्य शत्रूसमोर न झुकणार्या राजांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जगाला दाखवला. आपल्या प्राणांचे मोल देऊन त्यांनी पवित्र हिंदू धर्माचे रक्षण केले. त्यांच्या तेजस्वी बलिदानामुळे महाराष्ट्र पेटून उठला ! स्वधर्माच्या आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी जीवावर उदार होऊन लढणाऱ्या मराठ्यांनी इस्लामी आक्रमकांची थडगी बांधून हिंदुस्थानची शान राखली ! अशक्य ते शक्य झाले केवळ शंभू छत्रपतींच्या बलिदानामुळे ! त्यांनी मंदिराचे कळस आणी घरापुढची तुळस यांचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण ( मृत्युंजय अमावस्या ) ठेवणे हे प्रत्येक हिंदूचे पवित्र्य कर्तव्य आहे."

सर्व शिव - शंभू भक्तांनो ....
 
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, याची जाण ठेऊन दर वर्षी मृत्युंजय अमावस्याला महाराजांचे समाधी स्थळ : श्रीक्षेत्र वढू बु. ता. शिरूर, जी. पुणे. यथे लाखोंच्या संखेने महाराजां
च्या बलिदानाचे स्मरण आणि समाधीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी उपस्थित राहत जावे. 

स्वराज्याला लाभला छत्रपति  दुसरा ....
धन्य धन्य जाहला स्वराज्य आमुचा ....
नमला आदिल , निजाम ,सिद्धि अन फिरंगी...
पण माजला औरन्ग्या जेंव्हा दिवंगले अमुचे थोरले महाराज ....
लाखाच सैन्य अन करोड़ोंचा माज म्हणे तुडवून टाकू स्वराज्य आज ....
तेंव्हा गरजला सह्याद्रीचा तरणा छावा...
जोवर असेल हा छावा तोवर स्वराज्यावर काय करेल औरन्ग्या दावा ...
लाखो लढले पण हजारो पुरले.....
जंजिरा हादरला , चिक्क्देव रडला , गोवादुभंगला ,
अन औरन्ग्या ताज विरहित जाहला जेंव्हा छावा गुरगुरला....
गिधाड गर्दी जमली ,अन निसर्गही कोपला...
४ वर्ष दुष्काळ पडला ,स्वराज्य घोड्यावाचून ओस पडला ...
स्वराज्य धान्या वाचून कुपोषित पडला....
तरी निधड्या छाती ताणून उठल्या ...
शम्भू राजा तुझ्या करता लढता लढता मरूअन स्वराज्य जपु म्हटल्या ....
राजा लढ़ म्हणतो पण नायक खांद्याला खांदा लावून लढतो......
असा माझा शम्भू राजा, राजा नव्हे तर नायक जाहला .....
मृत्यु नंतर ही मृत्युंजय म्हणून जगला. .!!


॥छत्रपतीँ शंभूराजे॥


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

Friday 9 March 2012

मोडे पण वाकणार नाय.........

!! आमची आन ...बाण....आणि .....शान फक्त छत्रपती शिवराय !!
 
अंधाराला घाबरत नाय अभाळची साथ हाय
मोडे पण वाकणार नाय मराठ्याची जात
हाय..शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्ता मध्ये
ईमान दारी जुमानत
नाही कोणाची जहागिरदारी
मराठी मुलखातच मराठीचा घात मोडेन पण
वाकणार नाय हि मराठ्याची जात.. हाय
हक्का साठी भांण्डतो नोकरी साठी रडतो आम्ही हे
नुसते तांण्डव नाही आन्यायवर मात हाय..
मोडेन पण वाकणार हि मराठ्याची जात
हाय..स्मरण ठेवा तानाजीच स्मरण
आठवा संभाजीच पावनखिँडित रक्त सांडलं
बाजीचं साल्यानी पाठी मागुन वार केले
ह्यातच मोठा घात हाय..
मोडेन पण वाकणार नाय हि मराठ्याची जात हाय..!!!!!!!
 
आन बाण अन शान मराठा....
जय मराठा.... जयोस्तु मराठा.!!






||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Tuesday 6 March 2012

!! मराठेशाही !!


॥जयोस्तू मराठा॥



जगातली सर्वात उच्च
स्थानी असलेली जात म्हणजे
"मराठा "...

जिवाला जिव देणारी एकमेव जात
म्हणजे "मराठा "..

माणसाला माणुसकी शिकवनारी जात
म्हणजे "मराठा "..

अन्यायाविरुद्ध पेटून उठ्नरी जात
म्हणजे "मराठा "...

आजही घरातल्या मुलीना भारतीय
संस्कृतीची जान असणारी जात
म्हणजे "मराठा "..

दिल्ली पर्यंत
स्वराज्याचा झेंडा फडकवलेली जात
म्हणजे"मराठा"....

अन आम्हा मराठ्यांच राज्य म्हणजेच
मराठेशाही...... 

म्हणुनच फ़क्त गर्व नाही तर माज आहे
मला मी मराठा असल्याचा.....

 || छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥



Friday 2 March 2012


हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती...!! राजे छत्रपती शिवराय !!...  यांचे पुत्र  संभाजीराजे हे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले .


पण  हे संभाजीराजे  कसे होते अस जर आम्हाला कोणी विचराल तर आम्ही दोनच वाक्यात उत्तर देतो, "संभाजी रखेल आणि रंगेल होते"


अरे म्हणून तर सांगतो हे माहित आणि लक्ष्यात  असुद्या.... जर स्वताला मराठा समजत असताल तर .


"अरे ज्या माणसाने ९ वर्षे तलवारीवर मरण पेलुन धरले,
जो माणूस  वादळासारखा ह्या सहयाद्रीच्या दरया - खोरयत घोंगावत राहिला .....
अरे ज्या माणसाने  १२० लढाया केल्या ........
 एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही तह करून मागे न फिरनारा राजा म्हणून इतिहासाने ज्याची नोंद घेतली..........
आणि अखेर  औरंगजेबाची कबर इथाच याच परिसरात उभारली गेली त्या संभाजीराज्याला आम्ही बदनाम ठरवून टाकले..........

१६ व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला माहित आहे.
पण संभाजीराज्यांनी  वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे आम्हाला  लक्ष्यात असुद्या " .
झोपलो होतो आम्ही!!!!!!
अरे आपण चकचकीत पॉलिशकड़े बघत गेलो, खरया इतिहासाच्या मुळपर्यंत आम्ही गेलोच नाही.
खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही.
कधी तरी  खरया इतिहास पान  चाळून बघा............
कधीतरी समजाऊन घ्या संभाजीराज्यांना .......


अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे  संभाजीराज्यांनीच  आम्हाला  दाखवलं.......
म्हणून  तर  मनतात " जगावे तर छत्रपती शिवराय यांच्या सारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजीराज्यासारखे". 


हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती !! छत्रपती संभाजीराजे !!



||  छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा ||


॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥