Thursday 31 May 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले आमनेर ।।


आमनेर किल्ला


 किल्ल्याचा प्रकार : ............
जिल्हा : अमरावती
श्रेणी :  मध्यम


आमनेरचा किल्ला अथवा झिल्पी आमनेर किल्ला हा एक अपरिचित असा किल्ला आहे. मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेला आमनेरचा किल्ला महाराष्ट्रातील विदर्भामध्ये मोडतो. विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वायव्येला हा किल्ला आहे. अमरावतीच्या धारणी तालुक्यामध्ये हा किल्ला आहे.आमनेरचा किल्ला तापीनदी आणि गडगा नदी यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर बांधलेला आहे. बाहेरुन सुरेख दर्शन देणारा हा किल्ला आतून मात्र मरणपंथाला लागलेला दिसतो. दुर्लक्षीत आणि दुरावस्थेत गेलेला आमनेरचा किल्ला मनाला चटका लावून जातो.

इतिहास:
आमनेरचा किल्ला नेमका कोणी व केव्हा बांधला याबाबत इतिहास कळत नाही.हा किल्ला १२व्या ते १३व्या शतकापासुन अस्तित्वात असावा. तीनही बाजुस पाणी आणि एका बाजुस खंदक अशी या किल्ल्याची रचना आहे. सन १७६९ साली या किल्ल्यावर पेशव्यांचा मुक्काम झाला होता असे इतिहासकार सांगतात.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:

गडगा नदीच्या काठावरुन आमनेर किल्ल्याचे सुरेख दर्शन घडते. गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो.गडाच्या मध्यभागी मारुतीचे लहान मंदिर आहे. त्यामागे वाड्याचे मोठे जोते शिल्लक असून त्याला मोठे तळघर आहे. चौकोनी आकाराच्या या छोट्याशा आटोपशीर किल्ल्याचे क्षेत्रफळ अगदी कमी आहे. त्यातूनही आत असलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात नष्ट झालेल्या आहेत.या किल्ल्यास ८ बुरुज असून त्यापैकी ७ शाबुत आहेत. नदीतील पाण्याच्या माराने एक बुरुज भग्न झाला आहे.काळ्या पाषाणात वितळविलेले शिसे ओतुन याचा पाया मजबुत करण्यात आलेला आहे.यात जोडांसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला आहे. या किल्ल्यावर शिवाचे मंदिर आहे. यास सोमेश्वर म्हणतात.
 गुप्तधनाच्या आशेने अनेक ठिकाणी खोदकाम केलेले दिसते. गडाचा मुख्य मार्ग उत्तराभिमुख असून त्या मार्गावरील दरवाजा नष्ट झाला आहे. तटबंदीही बरीचशी ढासळलेली आहे. चार कोपऱ्याला चार आणि मधे दोन दोन बुरुज मिळून किल्ल्याला एकंदरीत बारा बुरुज आहेत. तापी आणि गडगाच्या संगमाकडील बुरुजावरुन नदीचे उत्तम दर्शन होते. या बुरुजाच्या आतील बांधकामामध्ये राहण्याची सोय केलेली दिसते. याच तटबंदीमध्ये तापीनदीकडे जाणाऱ्या मार्गावर एक दिंडी दरवाजा आहे. ती वाट मोडल्यामुळे अवघड झालेली आहे.

गडावर जाण्याच्या वाटा: 

गडगा नदी ओलांडून गेल्यावर डावीकडे किल्ल्याचा ढासळत चाललेला बुरुज आपल्याला दिसतो. या बुरूजाकडे चढणाऱ्या वाटेने थोडेसे चढल्यावर उजवीकडे असलेल्या तटबंदीवर चढण्यास वाट आहे. या तुटक्या तटबंदीमधून गड प्रवेश होतो. 

गडावर राहण्याची सोय : गडावरती राहण्यासाठी नाही .

जेवणाची सोय : येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन 
जावे लागते .


गडावर पाण्याची सोय : गडावरती पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : संपूर्ण गडफेरी करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.



नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism)" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
 

Friday 25 May 2012

|| किल्ले रायगड परिक्रमा ||

किल्ले रायगड

रायगड किल्ल्याचा नकाशा


‘राजा खासा जाऊन पाहता ... गड बहुत चखोट ... गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गाव ऊंच ... पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही ... ऐसे देखोन संतुष्ट जाहले आणि बोलिले तक्तास जागा गड हाच करावा !’ रायगडाचे चहूअंगी प्रत्यक्ष अवलोकन करुन शिवरायांनी काढलेले हे उद्गार सभासदाने आपल्या बखरीत नोंदवले आहेत. शिवरायांना भावलेल हे रायगडाचे रांगडे रुप आणि त्यांना अभिप्रेत असलेली रायगडाची भौगोलिक दुर्गमता व लष्करी अभेद्यता आपल्याला तळातून न्याहाळता येते. दांडगा आत्मविश्वास, भरपूर जिद्द आणि शिवरायांच्या प्रती असीम निष्ठा यांच्या शिदोरीवर रायगडाची ५ - ६ तासांची थोडीशी खडतर पण अनोखी परिक्रमा करता येते.

दरवर्षी साधारण जून महिन्याच्या सुरवातीला रायगडावर राज्याभिषेक दिन सोहळा राज्यारोहण तिथीला धरुन मोठया उत्साहात साजरा होतो. या कार्यक्रमाला धरुन रायगड प्रदक्षिणेचा झक्कास बेत आखायचा. याकाळात वातावरण तसे आल्हाददायक असते आणि प्रदक्षिणा मार्गावर उन्हाचा त्रासही कमी . सकाळी उजाडता उजाडता रायगडाच्या चित्त दरवाज्यापाशी आपल्या सवंगडयांसह जमायच. शिवरायांचा जयजयकार करायचा आणि प्रदक्षिणेला सुरुवात करायची. चित्त दरवाजा पासून सुरु झालेली परिक्रमा प्रथम टकमका खालच्या अंगाने सुरु होते. उजव्या हातास टकमकाचे आभाळात घुसलेले टोक सतत खुणावत राहते. वेगवेगळया कोनांमधून टकमकाचे मोहक दर्शन घडत राहते. या वाटचाली दरम्यान पुढे सती गोदावरी आणि रायनाक महा यांच्या समाधीस्थानांचे दर्शन आपल्याला घडते. इतिहासापेक्षा लोककथांच्या माध्यमातून या व्यक्तिरेखा आजही रायगडाच्या पंचक्रोशीतील जनमानसात जीवंत होऊन राहिल्या आहेत. या ठिकाणांपाशी नतमस्तक व्हायच आणि आपला मुजरा घालून पुढे निघायचे.

वळवावा पाऊस नुकताच झालेला असतो. ग्रिष्माच्या वणव्याने तप्त झालेल्या धरित्रिने सुखाचे पहिले वहिले जलतुषार अनुभवलेले असतात. हळुवार वाऱ्यावर येणाऱ्या मृदगंधाने आसंमताला एक तजेला आलेला असतो. रेशीम पाठीचे मृगाचे किडे (वेल्व्हेट बिटल्स) आणि तुरुतुरु पळणारे खेकडे सृष्टीच्या नव्या अवताराची ग्वाही देत असतात. प्रदक्षिणेच्या परमोच्च बिंदूच्या दिशेने म्हणजेच वाघोली खिंडीच्या दिशेने आपली वाटचाल सुरु असते. रायगडाच्या पूर्व टोकाकडील भवानी कडा आणि एका शिखर यांच्या मधून या वाघोली खिंडीची चिंचोळी वाट पलिकडे उतरते.

अचानक खडा चढ सुरु होतो. वाघोली खिंडीची तीव्र चढण अक्षरश: धापा टाकतच आपण सर करुन खिंडीच्या माथ्यावर विसावतो. समोर पसरलेला सृष्टीचा नजारा पाहून सुखावतो. एका बाजूला काळ नदीचे खोरे त्यामागे रायगडाभोवती फेर धरणारे पण आता धुक्यात हरवलेले डोंगरमाथे पायतळी पसरलेली गर्द झाडी ... आणि या सर्वावर कडी करणारा भवानीटोकाचा रौद कडा ... सारं दृश्य डोळयात साठवून आणि घटकाभर विसावून मग सज्ज व्हायचं खिंड उतरण्यासाठी. आता आपली खरी परीक्षा असते. पहिल्यापावसाने धुपलेली आणि भुसभुसीत झालेली माती, तीव्र उतार आणि तोल सावरता सावरता उडणारी आपली तारांबळ ... एस्सेल वर्ल्डच्या घसरगुंडीची आठवण करुन देणारा हा उतार फार काळजीपूर्वक उतरावा लागतो ... नाहीतर ... धरतीमातेला साक्षात दंडवत केव्हा याचा भरवसा नाही. खिंड उतरल्यावर मागे माथ्याकडे वळून बघायच आणि उतरताना अनुभवलेला थरार आठवून निश्वास सोडायचा. रायगडाचे श्रीगोंदे टोक आणि वाघ दरवाजा यांच्या पायथ्याच्या गर्द झाडीतून आता आपली मार्गक्रमणा सुरु होते. आपल्या परिकमेचा हा दुसरा टप्पा असतो. रायगडाचे एक वेगळ रुपच आपल्यापुढे उभ असत. साक्षात मृत्यूच्या अक्राळविक्राळ जवडयाप्रमाणे भासणारी रायगडाची ती कातळभींत, त्यावरुन कोसळणारे फेनधवल शुभ्र धबधबे आणि बरोबर बेचक्यात जागा धरुन बांधलेला वाघ दरवाजा .... या दरवाज्यातूनच राजाराम महाराज शत्रूला चुकवून वेढयातून निसटून गेले असा इतिहास दाखला देतो. त्या आठवणीनी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. 1818 साली रायगडाचा कर्दनकाळ ठरलेला दक्षिणेचा पोटल्याचा डोंगर दाट धुक्यात गुरफटलेला असतो. अंधुक अस्पष्ट दर्शनाने त्याचे फक्त अस्तित्व जाणवत असते. रायगडचा हाच तो डोंगर. वाटेत आडव्या येणाऱ्या एखाद्या पावसाळी ओढयावर आपली शिदोरी सोडायची. घटकाभर विश्रांती घ्यायची आणि ‘पुन: च हरि ओम’ म्हणून सुटायच ... पुढची वाटचाल पुन्हा एकवार आपली परिक्षा बघणारी असते. काटेरी झाडोरी आणि जाळयांमधून खाली वाकून आणि दमादमाने चालाव लागत. काटेरी जाळयांमधली ही सुमारे पाऊण तासांची फरफट एका मोकळया जागेवर येऊन मगच थांबते. काळकाईची खिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिठयावर एक अनामिक वीरगळ आहे. मराठे - सिद्दी संघर्षात धारातीर्थी पडलेल्या या पराक्रमी वीराच्या स्मारकाची ‘नाही चिरा नाही पणती’ अशी स्थिती पाहून मनाला रुखरुख लागून राहते.

खडतर वाटचालीने आपली गात्र थकलेली असतात परंतु रायगडाच एक नव रुप डोळेभरी पाहल्याचे समाधान असत. आता आपण प्रदक्षिणेच्या अंतीम टप्प्याकडे म्हणजे हिरकणीवाडीच्या ‘रायगड रोपवे’ स्थानकाकडे झेपावत असतो. चित्त दरवाज्यापासून सुरु झालेली आपली यात्रा आता अंतिम चरणापाशी आलेली असते. एखाद्या मोठया भावाप्रमाणे रायगडाने संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर आपल्या स्फूर्तीदायी अस्तित्त्वाने आपली पाठराखण केलेली असते. ज्या मार्गाने शिवरायांनी रायगडाची परिक्रमा केली त्याच मार्गाने यशस्वी पायपीट केल्याच्या कल्पनेने आपण रोमांचित झालेलो असतो. भारावलेल्या अवस्थेतच मग शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी गडाच्या पायऱ्यांकडे आपला मोहरा वळतो. रायगड परिक्रमेचा हा अनुभव स्फूर्तीदायक आणि आपले अनुभव विश्व समृध्द करणारा ठरतो. खऱ्या अर्थाने ही सहल ऐतिहासिक, भौगोलिक व वैज्ञानिक ... आणि हो पावसाळीसुध्दा ठरते.

छत्रपती शिवारायांची समाधी हे रायगडावरील सर्वात पवित्र स्थान आहे. श्री शिवरायांची पवित्र अस्थी ह्या समाधीमध्ये आहेत.



||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Thursday 17 May 2012

छत्रपती राजे संभाजी महाराजांना मानाचा मुजरा ... !!!


!! शिवपुत्र छावा ... धर्मवीर छत्रपती संभाजी राजे !!

छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद

त्र : त्रस्त झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं

प... : पचवीले विष तु धर्मासाठी

ती : तीर्थस्वरुप दैवत मराठ्याचें

रा : राखीला धर्म तु आमच्यासाठी

जे : जेव्हां कोपला सैतान तुटला स्वराज्यावर

सं : संभाळली दौलत मराठी तळहातावर

भा : भागवीली तहान शत्रुच्या रक्तावर

जी : जीवाशि खेळनाऱ्या शिवबाचा तु पुत्र

म : मशाल तुच क्रांतीची बलीदानाचे सुत्र

हा : हार न मननारा

रा : राजाच राजेपन जाणनारा

जा : जातीचा वाघ तु मर्द मराठा

ना : नाही जन्मला असा तुच एकटा

मा : माघार नाही मंजुर तुला

ना : नाही सैतानापुढे तु झुकला

चा : चारही दिशा तुझाच धाक

मु : मुगलाचां तु एकमेव बाप

ज :जय जय जयकार तुझा

रा : राजा एकटा शंभु माझा


मृत्यूला घाबरणारे अनेक पाहिले , मृत्यूला न घाबरणारे हि पाहिले , पण मृत्यूला घाबरविणारा मी येकच पाहिला.... !! मृत्युंजय छत्रपती शंभूराजा !! 


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


फक्त एकच राजे.... !! छत्रपति शिवराय !!


!! महाराष्ट्राचे आराध्य दैवत -छत्रपती शिवाजी महाराज !!


छत्रपति शिवराय म्हणजे.......

छत्रपति शिवराय म्हणजे जिजाउच्यां गळ्यातली मोत्याची माळ.........
छत्रपति शिवराय म्हणजे सईबाईचं कुकंवान भरलेल कपाळ......
छत्रपति शिवराय म्हणजे बलीदानी पुत्र ज्याचा शभुंबाळ......
छत्रपति शिवराय म्हणजे भगव्या स्वराज्याचा सुवर्णकाळ......
छत्रपति शिवराय म्हणजे गनिमासाठी तुफाणी जजांळ........
छत्रपति शिवराय म्हणजे ज्याच्यापुढ शीजली नाही मुगलाचीं डाळ......
छत्रपति शिवराय म्हणजे औरगंजेबाला स्वप्नात् भासलेला महाकाळ.....
छत्रपति शिवराय म्हणजे परक्रमाच्या काळजातला जाळ.......
छत्रपति शिवराय म्हणजे अन्यायाचा कर्दनकाळ.....
छत्रपति शिवराय म्हणजे कतृत्वच्या सरीने हिरवा झालेला रानमाळ.....
छत्रपति शिवराय म्हणजे कायम अठवणीतले आभाळ.....
छत्रपति शिवराय म्हणजे येणा-या प्रत्येक पीढीचा भविष्यकाळ...... 
छत्रपति शिवराय म्हणजे महाराष्ट्राचे, तमाम मराठ्यांचे आणि सकळ जणाचे आराध्य दैवत ..... !!!!


बोला छत्रपती शिवाजी महाराज की.............
 
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||

॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥





Tuesday 15 May 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले रतनगड ।।


रतनगड किल्ला

 किल्ल्याचा प्रकार : ............
डोंगररांगः कळसूबाई डोंगररांगा
जिल्हा : अहमदनगर
श्रेणी : 
मध्येम

सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यावी लागेल. अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले तालुका आहे. अहमदनगरच्या पश्चिम अंगाला हा अकोले तालुका डोंगरदर्‍यांनी अतिशय समृद्ध आहे. या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड हा किल्ला आहे.
भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या परिसरामधे येत असतात. पण आडवाटेवर दुर्गम ठिकाणी असलेल्या रतनगडावर मात्र काही मोजकेच पर्यटक जातात. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करीत नाही. इच्छा, शारिरीक क्षमता आणि वेळेचे नियोजना व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच आहे.

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांग आहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. रतनगडाजवळ प्रवरानदी उगम पावते. या प्रवरानदीवर भंडारदरा धरण आहे. पुर्वी हे विल्सन डॅम म्हणून परिचित होते. या धरणाच्या पाण्याचा फुगवटा दोन बाजूंना पसरला आहे. एक फाटा समुद्रकडे जातो जर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो.

इतिहास:
इंग्रजांचे राज्य येण्यापुर्वी रतनगडास फार महत्व होते.अलंग,कुलंग,मलंग हे किल्ले आणि राजुर,सोकलीचा प्रदेश रतनगडाच्या अधिपत्याखाली येत होता.इ.स. १७६३ मध्ये जावजी या कोळी सरदाराच्या ताब्यात हा गड होता.कॅप्टन गोडार्डने या किल्ल्यावर १८२० मध्ये प्रत्यक्ष ताबा मिळवुन गडावरच आपला तळ ठोकला.पण त्याचा मुक्काम हलताच पूर्वीचा किल्लेदार गोविंदराव याने रामजी भंग्रियाच्या साथिने परत उठाव करुन रतनगड ताब्यात घेतला.
 
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:
 साधारण दीड दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दरीतील बाणच्या मुळका आपले लक्षवेधून घेतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत. 

कुलंग, मदन, अलंगडाबरोबर महाराष्ट्राचे उत्तुंग शिखर कळसूबाईचे दर्शन घेवून आपण रतनगडाच्या नेढय़ाकडे चालू लागतो. नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना नेढे आहे. गडाच्या पश्चिमकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे भान हरपून टाकतात. त्याच्या उजवीकडे आजोबाचा विशाल पर्वत आणि त्याची लिंगी लक्षवेधी आहे. येथून जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. इथे एक नंदी आणि शिवलींग पहायला मिळते.इथून जवळच गणेश दरवाजा आहे. गणेश दरवाजाच्या थोडे पुढे हनुमान दरवाजा आहे. जवळच कडय़ात कोरलेल्या गुहेत गडाची देवता रत्नादेवी तांदळा आहे. कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. 

गडावर जाण्याच्या वाटा:
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसूबाईची डोंगररांगआहे. या डोंगररांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे.  
 आपल्याला आधी अहमदनगर ला जावे लागते . तेथून बस ने अकोले या गावी जावे लागते.  अहमदनगरच्या पश्चिम अंगाला अकोले हा तालुका आहे.
 
गडावर राहण्याची सोय : गडावरती राहण्यासाठी नाही .

जेवणाची सोय : येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतःच घेऊन
जावे लागते .

गडावर पाण्याची सोय :
गडावर जवळच एक सुटा टेहाळणी बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. इथे जवळच पिण्यायोग्य पाण्याचे टाके आहे. तेथे  बारामाही पाणी असते .
 
जाण्यासाठी लागणारा वेळ : संपूर्ण गडफेरी करण्यासाठी आपल्याला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
 
नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्र पर्यटन (Maharashtra Tourism)" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Saturday 12 May 2012

|| मुरुड जंजिरा वरील आक्रमण ||


|| सळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला ||

ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी रामसेतू बांधला, त्याप्रमाणे उसळत्या सागरामध्ये ८०० मीटरचा सेतू संभाजी महाराजांनी बांधला. जंजिरा ९०% नेस्तानाबूत केला होता.

जंजिरा किल्ला हबशी सिद्धी बंधूंच्या ताब्यात होता. या वेळी जंजीर्यावर सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान होते. हे आफ्रिकेतून आलेले हबशी होते. हे हबशी जंजीऱ्यातून बाहेर यायचे, तटावरची माणसे पकडायचे, त्यांचे कान नाक कापायचे. कोकणातील बायका पाळावयाचे. या जाचाने त्रासलेले लोक शंभूराज्याकडे आले, आपले संकट त्यांनी राजांना सांगितले. हे सगळे भयानक प्रकार ऐकून संभाजी राजे खूप क्रोधीत झाले.

त्यांनी जंजिरेकर सिद्धांच्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. पण त्यांना माहित होते कि जंजिरा सरळ लढाईत जिंकणे अवघड होते, कारण खवळलेला समुद्र त्या जंजिर्याच्या मदतीला होता. त्यामुळे राजांनी ठरवले कि या जंजिराच्या पोटात घुसून त्याचा कोथळा बाहेर काढला पाहिजे.

याच बेतासाठी त्यांनी बोलावणे धाडले कोंडाजी फर्जद याला. कोण होता हा कोंडोजी फर्जद ? हा होता हिरोजी फर्जदांचा मुलगा. आग्रा भेटीत शिवाजी महाराजांचे सोंग घेवून झोपलेले हिरोजी. संभाजी राजांनी कोंडोजी च्या कानात आपला बेत सांगितला. आणि मग निघाला कोंडाजी. आपल्या सोबतीला ४० / ५० मावळे घेवून निघाला. आणि थेट जंजिऱ्याच्या सिद्धी समोर आला, आणि त्याने सिद्धी ला त्याची चाकरी स्वीकारण्याची इच्छा सांगितली. सिद्धी ला आश्चर्याचा धक्का बसला. तो आनंदून गेला. कारण शंभू राजांचा एक शूर मावळ त्यांना येवून मिळाला होता. सिद्धी ने त्याला आपली चाकरी दिली. आणि मग काय, कोंडाजी सिद्धी ची सेवा करू लागला. पण त्या कोंडाजी च्या काळजात वेगळाच डाव होता, त्याच्या शंभू राजांचा. कोंडाजी चे मन मात्र शंभू राज्यांकडे होते.

संभाजी महाराजांनी कोंडाजी ला सांगितलेला डाव असा होता कि जंजीऱ्याचा सगळा दारू गोळा उडवून द्यायचा. आणि याच धाडसी डावासाठी त्यांनी कोंडाजी आणि काही निवडक मावळ्यांना जंजीऱ्यात पाठवले होते.

दिवस ठरला, सुरुंग पेरले गेले, कोंडोजी फर्जदांचे साथीदार दर्यात गलबते घेवून उभे होते. कोंडोजीची बायको सुद्धा बरोबर निघाली, पण तिचा एक आग्रह होता, तिची एक दासी होती, त्या दासीला बरोबर घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. कोन्डोजीकडे वेळ नव्हता, त्याने बायकोची मागणी मान्य केली,मग ती दासी पण बरोबर निघाली. मात्र ती दासी म्हणाली कि मी माझे कपडे व काही समान बरोबर घेवून येते. ती दासी कपडे आणायला म्हणून गेली आणि ती थेट सिद्धी च्या दरबारा कडे गेली. सिद्धी ला तिने मराठ्यांचा डाव सांगितला. मग मात्र कोंडाजी सापडले आणि मारले गेले, जंजीऱ्या वरचे सगळे मराठे कापले गेले.

पण त्यातला एक मराठा सरदार कसाबसा वाचला होता. त्याने जंजीऱ्या वरून खवळलेल्या समृद्रात उडी मारली आणि आपला जीव मुठीत घरून किनार्याच्या दिशेने पोहू लागला. कशासाठी ? जीव वाचवण्यासाठी नाही. तो पोहोत होता संभाजी राजांना घडलेल्या दुखःद घटनेची माहिती देण्यासाठी. कारण संभाजी महाराज वाट बघत होते कोंडोजी चा डाव यशस्वी होण्याची. अखेरीस तो मावळा किनाऱ्यावर पोहोचला. त्याने घडलेली हकीकत शंभू राजांना सांगितली. तसा शंभू राजांना फार मोठा धक्का बसला. कोंडोजी फर्जद हा एक शूर आणि थोर सरदार तर होताच पण त्यांना खूप जवळचा होता. राजांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पण राजाला भावनाविवश होवून चालत नाही. शंभू राजांनी ठरवले कि कोंडोजी चे बलिदान सार्थकी लावायचे. त्यांनी वीस हजाराची सेना आणि तीनशे गलबते घेवून राजांनी जंजीऱ्यावर आक्रमण केले. आणि मग कडाडले संभाजी राजे, “डागा तोफा किल्ल्यावर.”

मग मात्र किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरु झाल्या. मराठ्याच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. सिद्धीचा शिशमहाल चकणाचुर झाला होता. पण ऐन वेळी समुद्र जंजिऱ्याच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सरू लागले. पण शंभू राजे थांबले नाही. त्यांनी ठरवले कि समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरु झाले, सेतू आकार घेवू लागला. मराठ्यांच्या तोफांचा सुरु होताच.

पण मग मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकले कि जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राज्याची सत्ता येईल. औरंग्याने हसन आली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगझेबाचा सरदार ४० हजाराची फौज घेवून कल्याण-भिवंडी च्या मार्गे रायगड च्या दिशेने येवू लागला होता.

त्यामुळे नाईलाजास्तव ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरावे लागले
.



||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल. आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Wednesday 9 May 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले सिंधुदुर्ग ।।


|| सिंधुदुर्ग किल्ला ||
|| हेली काप्तर मधून घेतलेले सिंधुदुर्ग किल्ल्याचे छायाचित्र ||


किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग (अरबी समुद्रा)
क्षेत्र : कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे
डोंगररांगः उत्तर कोकण
जिल्हा : सिंधुदुर्ग
श्रेणी :  सोपी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे.
किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे.
बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.
या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील राजाराममंदीर आहे. याची स्थापना ‍ महाराजांनी केली होती. 

इतिहास:
छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे,हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केले. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनार्या ची पाहणी झाली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळे कभिन्न खडक किल्ल्यांसाठी आणले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्यकृती आणि दुसरीकडे चंद्रकृती कोरुन त्या जागी महाराजांनी पूजा केली. असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार मच्छिमार लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतकेउभा आहे, तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. या खडकावर समुद्र मार्गानी व्यापलेले क्षेत्र सुमारे ४८ एकर आहे. त्यांचा तट २ मैल इतका आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर २२ बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस ८० हजार होन खर्ची पडले. 
शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीत याबाबत पुढील मजकूर नमूदकेला आहे :
“'चौर्याऐंशी बंदरात हा जंजीरा,अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका,अजिंक्य जागा निर्माण केला । सिंधुदुर्ग जंजीरा,जगी अस्मान तारा । जैसे मंदिराचे मंडन,श्रीतुलसी वृंदावन,राज्याचा भूषण अलंकार ।चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न,महाराजांस प्राप्त जाहले ।”

पहाण्यासारखी ठिकाणे : सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही.पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचे द्वार लागते. हे द्वार भक्कम असे उंबराच्या फळ्यांपासून केले आहे. उंबराच्या लाकडाचा उपयोग दीर्घकाळटिकण्यासाठी होतो. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारोतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरिमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात.ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.हे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे.
श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात बैठी महाराजांची प्रतिमा फक्त येथे दिसते. शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. 


|| सिंधुदुर्ग किल्ल्यावरील हेच ते श्री शिवराजेश्वरांचे देवालय ||

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य :  म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो.
मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत.



|| सिंधुदुर्ग किल्ल्यावरील  हाच तो मराठ्यांचा भगवा ध्वज ||

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदूका टांगण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय.
 कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
१९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटदुरुस्ती केली.

पाण्याची सोय : मुख्य म्हणजे किल्ला परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण किल्ला दोन ते तीन तासात बघून बोटीने किनार्‍यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही.
 
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
 
जाण्यासाठी लागणारा वेळ : सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. ४८ एकर क्षेत्रात हा किल्ला आहे.


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट"  "महाराष्ट्रातील किल्ले" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

|| किल्ले रामशेज ||

|||| ६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला ||||

नाशिक जवळ पिंडोरी पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.

 इतिहास:
१ . शहाबुद्दीन खान 
ह्याच किल्ल्यावर चांदसितारा फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक दिवसात किल्ला घेतो म्हणून.
किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.
मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात) तोही इतका उंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीन च्या हाती यश येत नव्हते.

      २ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.

२. फतेह खान 

मग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.
फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते दृश्य पाहून फतेह खान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानां जादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.
अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कि युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदारा कडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हु” मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.
मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.
फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा” वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.
एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानाने रात्रीचा मारा सुरु केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरून मोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.
वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”

 ३. कासम खान

औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खान ला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते. हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.
तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रहि सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.
कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही.

  हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥


नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .
 

Monday 7 May 2012

|| गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजी महाराजांची लढाई ||


|| गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध छत्रपती संभाजी महाराजांची लढाई ||

गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले.

पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर “काउंटी दि अल्वोरे” याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच... संभाजी महाराजांना माहित होते कि गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळेच या गव्हर्नर ला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे अखात होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.

ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली कि “गोव्या जवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे, त्याच बरोबर बराचसा दारुगोळा हि जमा करून ठेवला आहे.” या वेळी संभाजी महाराज रायगड किल्ल्यावर होते. गव्हर्नर ला हि बातमी माहित होती. गव्हर्नर ला माहित होते कि फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाहीये. आणि किल्ल्यावर जास्त सैन्य सुद्धा नाहीये. त्याने विचार केला कि फोंडा किल्ल्यावर थोडेच मावळे आहेत, आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाहीये. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी राजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्या बरोबर ५ हजाराचे पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.

गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेवून किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले कि सकाळ पर्यंत वाट बघायची नाही, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्याने रात्रीच किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडी वरूनच ते मराठ्याच्या फोंडा किल्ल्यावर तोफ तोळे डागत होते. त्याच बरोबर पोर्तुगीजी सैनिक गोळ्या सुद्धा चालवत होते.

दुसऱ्या दिवशी पर्यंत हा मारा सुरु होता, त्या मार्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरुंज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खुश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकुम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीजी सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता. पण गव्हर्नर च्या रेट्यापुढे त्याचे काही चालेना. मग काही पोर्तुगीज पुढे झाले आणि किल्ल्याजवळ आले. किल्ल्यावरून दगडांचा मारा झाला. मग मात्र पोर्तुगीज मागे हटले.

पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. खरी परिस्थिती अशी होती कि अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हातात जाणार होता. पोर्तुगिजांचा गव्हर्नर तर याच खुशीत वेडा झाला होता. त्याला तर फोंडा किल्ल्यावर पोर्तुगिजांचा झेंडा दिसू लागला होता. किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.

आणि इतक्यात…. दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले, ललकाऱ्या ऐकू येवू लागल्या, “हर हर महादेव, शिवाजी महाराज कि जय, संभाजी महाराज कि जय”

फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तत्बाडीवर आणि बुरुंजावर उभे राहून तिकडे पाहू लागले… क्षणा क्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभू राजे येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावारूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला, किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, “संभाजी महाराज कि जय ||”

संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाखवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले, मग मात्र त्यांचे धाबे दणाणले, भीतीने त्यांची गाळण उडाली. आत्ता पर्यंत गव्हर्नर ने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते, आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पूरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते, आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले. किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले.

गोव्याचा गव्हर्नर Count De Alwore याला मराठ्यांनी जेरीस आणून सोडले होते.

मराठ्यांचे गोव्यावरील आक्रमण इतके जबरदस्त होते कि, गोव्याच्या गव्हर्नर ला त्याची राजधानी पणजी पासून खाली मार्मा गोव्याला हलवावी लागली.

संभाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोवेकर पोर्तुगीजांची केलेली वाताहत पाहून गोव्यातील मराठी लोक खूप आनंदित झाले. गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षानंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. मागील काही वर्षात पोर्तुगीजांनी गोव्यातील कित्येक देवळे उध्वस्त केली होती, याचाच सूड घेण्यासाठी गोव्यातील काही हिंदू लोक एकत्र आले आणि त्यांनी गोव्यातील ख्रिश्चनांच्या एका चर्चवर हल्ला केला, त्या चर्च ची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. हि बातमी शंभू राजांच्या कानावर आली, परंतु स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान आणि परधर्माबद्दल आदर असलेले संभाजी राजे यांना हि बातमी आवडली नाही. ते म्हणाले, “आमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेले हे स्वराज्य कोणाच्या धर्माच्या द्वेषावर उभे राहिलेले नाहीये.” छत्रपती संभाजी महाराज यांनी हुकुम दिला कि, “ताबडतोब चर्च ची जाळपोळ थांबवा”. शंभू राजांच्या आज्ञेचे पालन केले गेले. संभाजी महाराज यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या काही हिंदु लोकांना धर्मात परत घेतले.

गव्हर्नर आधीच पणजी सोडून गेला होता, त्याला खात्री होती कि संभाजी महाराजांना पराभूत करणे अश्यक्य आहे. त्याला भीती होती कि शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले कि संभाजी महाराज यांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजे याच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली. आणि ते रायगड ला परत आले.


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

|| जय महाराष्ट्र ||

नोट : वरील सर्व माहिती "महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती" व "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल.वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Saturday 5 May 2012

|| छत्रपति शिवरायांची खानांस ठार मारलेली वाघनखे ||

वाघनखे

पूर्वीच्या काळी वाघनखांचा वापर गुप्त हत्यार म्हणून केला जाई,अत्यंत छोटे परंतू घातक असे हे हत्यार आहे.
स्वराज्यावर चालून आलेला अफजलखाना सारखा मातब्बर व बलाढ्य शत्रू ,छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाने मारल्यामुळे “वाघनखं” हे हत्यार इतिहासात अमर झाले.
 
वाघनखं हे प्रामुख्याने भारतात विकसित झालेले, सहज वाहून नेण्याजोगे व स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारे शस्त्र आहे.
वाघनखासारखी वेगळी व शत्रूला चकीत करणारी हत्यारे बनविताना त्या-त्या प्राण्यांच्या पंजाचा, वार करण्याच्या पध्दतीचा अभ्यास केला जात असे. वाघनखांप्रमाणेच अस्वली कट्यार, सिंहाचा पंजा अशी हत्यारे मध्ययुगात अस्तित्वात होती, पण त्यांना वाघनखांप्रमाणे प्रसिध्दीचे वलय लाभले नाही.
वाघनखं हे लोखंडापासून बनविलेले शस्त्र असून धातूच्या पट्टीवर चार धारदार, टोकदार, अर्धवर्तुळाकार (आतल्या बाजूस वळलेली) धातूची नखे असतात. ही नखं ज्या धातूच्या पट्टीवर बसवलेली असतात, त्या पट्टीच्या दोन टोकांना अंगठीसारख्या कड्या असतात. या कड्या पहिल्या बोटात व करंगळीत अडकवून मूठ बंद केल्यास वाघनखं हातात बेमालूमपणे लपून जात.

 

 ही वाघनखे देखिल अनेकांनी हाताळली असतील अगदी ज्याने बनविली त्या पासून आत्ता पर्यंत .. पण त्यात वाघाचे जिगर ओतले ते शिवरायांनी ... ही वाघनाखे साक्ष आहे ज्वलंत इतिहासाची .. धर्माचा अधर्मावर झालेल्या विजयाची ... सत्याला प्रिय असणार्या आणि जनतेची जाण असणार्या राजाची ... आसमानी संकटासमोर उभ्या राहिलेल्या साम्राज्याची ... अश्या गोष्टीच आठवण करून देता आपल्या मातीची खरी अमुल्यता ...!!!!



होय हीच ती वाघनखे जेव्हा अफजलखानाबरोबर  छत्रपति शिवरायांची प्रतापगडाच्या पायथ्याला भेट झाली, त्यावेळी जेव्हा खानाने छत्रपति शिवरायांना मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा छत्रपति शिवरायांनी ह्या वाघनखांचा वापरकरून  खानांस ठार मारले. अशा या एकाच नाही तर हरेक शस्त्राची ज्या शस्त्राला शिवरायांनी नावाजले त्या शस्त्राला प्रत्येक मावळ्याने पूजले पाहिजे..

नोट : वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. 


||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥