|| पुण्यशील राजमाता जिजाऊ ||


जन्म - १२ जानेवारी १५९८, सिंदखेडराजा.
मृत्यू - १७ जून १६७४, पाचाड.
समाधी स्थान - पाचाड, ता. महाड, जि. रायगड.

हिंदवी स्वराज्य चे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांची जन्मदाती आई ही जिजाऊआऊ साहेबांची एव्हढीच ओळख नाही. आपल्या सर्व आयुष्य़ामध्ये त्या शिवाजी महाराजांच्या गुरु, प्रेरणास्थान व मार्गदर्शक राहिल्या. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिवाजी महाराजांना घडवले आणि  सुर्याप्रमाणे दैदिप्यमन्य हिंदवी स्वराज्याचे उभारण्यात मोलाची साथ आणि मार्गदर्शन केले. क्षत्रिय कुलामधील सार्वभौम सिंहासनाधिष्ठ हिंदू जनताराज्याच्या रुपात आणि अखंड हिंदवी स्वराज्य चे वैभव पाहण्याचे भाग्य त्यांना त्यांच्या आयुष्यातच लाभले. जिजाऊ साहेबांचे शरीर स्त्रीचे पण डोके (मुत्सद्दीपणा,बुद्धिमत्ता, नितीमत्ता ) मात्र पुरुषाचे होते.   

 जिजाऊआऊसाहेबांचा जन्म :
  देवगिरीचे सम्राट यादवराव हे भगवान श्रीकृष्णाचे वंशज.या यादवरावांच्या घराण्यामधील पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी खानदानी घराण्यात सन १५९८ मध्येआऊसाहेबांचा जन्म सिंदखेडराजा येथे झाला. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होतेलखुजीराजे जाधवराव हे त्याकाळी निजामशाह दरबारामधील एक कर्तृत्ववान,मातब्बर सरदार घरी गजांतलक्ष्मी नांदत होती. 

जिजाऊआऊसाहेबांचा विवाह : लखुजी जाधव यांच्या  ऐश्वर्यसंपन्न घराण्यात जन्मलेल्या जिजाबाईसाहेबांचे लग्न इ.स. १६१०-११ मध्ये  शहाजीराजांशी  तितक्याच तोलामोलाच्या भोसले घराण्यामधील शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर देवगिरी (दौलताबाद) येथे विवाह झाला. जिजाऊ शहाजीराज्यांच्या पहिल्या पत्नी तर तुकाबाईं दुसऱ्या पत्नी होत्या.

स्वराज्य संक्लपक छत्रपती शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना या शिवभक्त मावळ्याचा मानाचा मुजरा..!!!!!!

शहाजीराजे हे मातब्बर,कर्तबगार,पराक्रमी सरदार निजामशहीच्याच पदरी चाकरी करीत होते. एकाऐश्वर्यसंपन्न खानदानी घराण्यातील मुलीने लग्नानंतर दुस~या ऐश्वर्यसंपन्न घराण्यातील खानदानी घराण्यात प्रवेश केला. शहाजीराजांबरोबर लग्न म्हणजे एका कर्तबगार,शुर,धाडसी आणि
प्रसंगी धोका पत्करण्याची तयारी असलेल्या महत्वाकांशी वीर पुरुषाला जीवनभर साथ देण्याचे व्रत, पौर्णिमेसारखे सुख, आनंद उपभोगणे व अमावस्येसारखे दुखःही भोगणे .नखशिखांत सौभाग्यलेणी ल्यालेल्या,वज्रचुडे घातलेल्या जिजाऊसाहेबांचे सौभाग्य सदैव पणाला लागलेले.

भोसले व जाधव वैर :
भोसले व जाधवांचे वैर पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता,हत्तीस पकडण्यास २ पथकेतयार केली पहिले जाधवांचेत्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला . या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले . हत्ती प्रकरणात जिजाऊंचे एक बंधू आणि एक दिर ठार झाले. मराठ्यांमधील आपापसातील वैमनस्य कुठल्या थराला पोहोचते याचा अनुभव जिजाउंना या प्रकरणाने आला.
पराक्रमी शहाजीराजे कधी आदिलशाहीत, कधी मोगलांकडे, तर कधी निजामशाहीत होणाऱ्या नोकरीने मराठ्यांना सुलतानी सत्तेत स्थिरता आणि मान नाही हे जिजाऊ यांच्या ध्यानी आले. शहाजीराजांचा स्वतंत्रतेचा प्रयत्न व प्रतिशाही स्थापून तीन वर्षे दिलेला लढा, त्यांनी केलेली धडपड वाया गेलेली जिजाउंनी पहिली.वडील,भाऊ यांचे निजामशहाने भर दरबारामध्ये दगाबाजीने केलेले खून,पुण्यावर गाढवाचा नांगर फिरविणे,सख्ख्या जाऊबाईंना मोंगल सुभेदाराने पळवून नेणे,शहाजीराजांचे अपमान हे सर्व त्यांनी भोगले.शहाजीराजांना निजामशाहीच्या नांवाखाली स्वतंत्र राज्य स्थापण्याला यश आले नाही व अदिलशाहाने त्यांना नवीन,मोठी जहागिरी देउन बंगरुळला पाठविले.भरपूर दागिने लेऊन,भरजारी रेशमी वस्त्रे घालुन,चांगले गोडधोड खाउन शहाजीराजांसोबत बंगरुळात ऐश्वर्यात जिवन जगणे त्यांना सहज शक्य होते.पण त्यांचा पिंडच वेगळा होता.

जिजाऊआऊसाहेबांची अपत्ये  :
 जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाबाईंना पहिले आपत्य झाले नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावा प्रमाणे संभाजी ठेवले. यानंतर त्यांना ४ मुले झाली ४रीही दगावली, ७ वर्षाचा काळ निघुन गेला. पुढे आऊसाहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले.


छत्रपति शिवराय यांचा जन्म :


शहाजीराजांची हि धडपड चालू असतानाच, १९ फेब्रुवरी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊं नी एका पुत्रालाजन्म दिला .

सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला.
जिजाऊच्या पोटी सिँह जन्मला,
शिवनेरीत पाळणा बांधला नाव ठेवले "शिवाजी".
पुढे हाच सिँह रयतेचा वाली झाला,
ज्याच्या हातून रयतेचे  हिँदवी स्वराज्य निर्माण झाले .
मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवबाला,
ज्याने मातीत भगवा फडकवला.

राजांचे संगोपन :

 शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती तर त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला.


   जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यातसुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं.  शास्त्र-अस्त्र च्या  प्रशिक्षणावर स्वत: त्या बारकाईनं लक्ष ठेवलं.  राजांच्या शिक्षणाची व  संगोपना ची जबाबदारी पेलली आणि त्यांच्यावर संस्कार घडवले.
मुत्सद्दी,धडाडी,कणखरपणा,धैर्य या गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अंधा~या आकाशात ठळकपणे तळपण्या~या धृव ता~या प्रमाणे मार्गदर्शक होते. त्यांचे निपक्षपाती न्यायदान,कर्तव्यकठोर स्वभाव,प्रजेबद्दलचे ममत्व,हिंदू धर्मावरील गाढ श्रद्धा,स्त्रियांच्या बेअब्रुची चिड यासर्वांचा परिणाम बाल शिवाजी राजांच्या जडणघडणीवर फार मोठा झाला .
राजमाता जिजाऊ यांनी रयतेस दिलासा देऊन त्यांची शिवराय यांच्या बद्दलची आत्मियता वाढीस लावली. दादोजींच्या मृत्युनंतर शिवराय जहागिरीचा कारभार स्वतंत्रपणे पाहू लागले.
अफझलखानाला भेटीला जाण्याचा वेळी आऊसाहेबांचा सल्ला होता …” शिवबा बुद्धीने काम करणे, अफझलखानास मारून  संभाजीचे ऊसने घेणे” महाराजांनी कधीही आईसाहेबांचा आज्ञाभंग केला नाही. 
 कर्तव्यकठोर,न्यायनिष्ठूर,प्रजावात्सल्य,शूर,प्रशासनकुशल अन मुत्सद्दी राजा घडविण्यासाठी जे जे आवश्यक आहे,ते ते त्यांनी केले. आपल्या पराक्रमी पुत्राच्या प्रत्येक धाडसाला पाठिंबा देणाऱ्या आणि संकटात सर्वतोपरी मदत करून धीर देणाऱ्या राजमाता जिजाऊ हे शिवरायांचे प्रेरणास्थान झाल्या. म्हणुनच शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना त्यामधून जिजाऊसाहेबांना वगळताच येणार नाही.
 
राजमाता जिजाऊआऊसाहेब ::

 एक पत्नी, एक आई, एक गुरु, एक मार्गदर्शक, एक प्रेरणास्थान, एक कुशल शासक : 


आदिलशाहीत स्थिर होऊन शहाजी राजे बेंगलोर येथे वास्तव्य करू लागले.  शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी आपल्या वडिलोपार्जित जहागिरीच्या देखरेखीसाठी सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. व इतर कुशल अधिकार्यां समवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले.
 निजामशाही , आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. आदिलशाही सरदारांनी पुणे व आजूबाजजूचा शहाजीराजांच्या जहागिरीचा प्रदेश बेचिराख केला होता. महाराष्ट्रामध्ये मुसलमान बादशहांनी हिंदूंवर चालविलेले जुलूम,स्त्रियांवरील अत्याचार यामुळे त्या अस्वस्थ,बेचैन होत्या. रंजल्या गांजल्या सामान्य माणसाला या त्रासामधून सोडविण्यासाठी आपले राज्य हे हिंदवी स्वराज्य होहावे, या विचाराने भारलेल्या जिजाऊसाहेबांनी सुखाने आनंदाने बंगरुळला शहाजीराजांसोबत रहायचे सोडून पुण्याच्या फक्त ३६ खेड्यांच्या जगागिरीमधून “स्वराज्य” निर्माण करण्याचे वेडे व्रत स्वीकारले. अशा उध्वस्त,उजाड जहागिरीमधून हिंदवी स्वराज्य उभे करण्याचा त्यांनी निश्चय केला.
पतीच्या स्वराज्याच्या ध्यासाचे त्यांना सदैव भान होते. पुण्याच्या ३६ खेड्यांच्या उजाड जहागिरीच्या कोर्या  कागदावर त्यांनी स्वराज्य मंदिर रेखाटण्यास सुरुवात केली. पुण्याचा जमीनीवर शेती करणे लोक अशुभ मानत होते,कारण होतं सतत पडणारा दुष्काळ आणि आदिलशाहीचे दुषशासण,पण धर्म पंडीताणी ती जागाच अशुभ ठरवली.त्यामुळे सामण्य शेतकरी पुण्याचा बाहेर पडु लागला,अशा परीस्थीतीत माँसाहेब जिजाऊंणी पुण्याचा भुमीत सोन्याचा नांगर फिरवला आणि शेतकऱ्‍याणसाठी पहीली सहकारी संस्था बँक काढली,शेतकऱ्‍याणा दुष्काळात कर्जमाफी व कर्जवाटप केले,शेतकऱ्‍याणचा शेतीला आदीलशाहीच्या सैनीकांपासुण आणि चोराणपासुण संरक्षण दिले.  जिजाऊ यांच्या देखरेखीखाली ओसाड पुणे पुन्हा बहरले.
त्याकेवळ बाल शिवाजीराजांच्याच आऊसाहेब नव्हत्या , त्यातर अवघ्या मावळातल्या स्वराज्यातल्या सर्व गोरगरीब सामान्य रयतेच्याच माऊली अन सावली झाल्या. रंजल्या-गांजल्या सर्वसामन्य रयतेच्या,साध्या सैनिक-शिलेदारांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी आऊसाहेबांचा आधाराचा हात सदैव सर्वांच्या पाठीवर असायचा.


माँसाहेब जिजाऊंणी पुण्याचा भुमीत सोन्याचा नांगर फिरवला.

शहाजी राजांची कैद व सुटका, अफझल स्वारी, शिवरायांची आग्रा कैद आणि सुटका अशा स्वराज्यावरील महान संकाटात राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांची पाठराखण केली.  शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना राजमाता जिजाऊ ह्या खुद्द स्वराज्याचा कारभार पहात असत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत. शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

जिजाऊआईसाहेबांचे निधन : मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन निर्माण करून जून ६, १६७४ रोजी शिवरायांनी आपला राज्याभिषेक करून घेतला. आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपति, स्वराज्याचे धनी झाले. राजमाता जिजाऊ यांनी हा सुवर्णक्षण आपल्या डोळ्यांनी अनुभवला.


 राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसानंतर जेष्ठ वद्य नवमी शके १५९६, १७ जून १६७४ वर बुधवार रोजी मध्यरात्री पाचाड येथे जिजाऊसाहेबांचे निधन झाले. महाराजांचा राज्याभिषेक पहाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पंचप्राण आपल्या वृद्ध,थकलेल्या शरिरामध्ये एकवटले होते अन आपल्या मुलाचा हिंदू नृपति म्हणून सिंहासनाधिष्ठित झालेला पाहून कृतार्थतेने त्यांनी शांतपणे,समाधानाने कैलासाची वाट धरली. जिजाऊमाँसाहेब म्हणजे महाराजांचे सर्वस्व त्यांच्या मृत्यूने महाराज अतीव शोकाकुल जहाले.
त्यांचा मृत्यू नवज्वराने झाला असे शिवदिग्विजय बखरीमध्ये स्पष्ट लिहिले आहे.

पुण्यशील,योगिनी जिजाऊ आईसाहेबांना माझा लाख लाख प्रणाम आणि मनाचा मुजरा ...!!!


## जिजाऊ वंदना ##

जिजाऊ माउली घे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ||

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साउली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव स्वामी ||
जिजाऊ माउली घे तुला वंदितो मी...१

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या विचारांचे धडे सोबतीला,
तयांच्या सर्व गाजवू शोर्य आम्ही ||
जिजाऊ माउली घे तुला वंदितो मी...

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुख कोणास काही नसू दे;
नसे दे अनारोग्य अंधार यमी ||
जिजाऊ माउली घे तुला वंदितो मी...

तुझ्या प्रेरणेने घडो लोकसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ व्हावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ||
जिजाऊ माउली घे तुला वंदितो मी...

एक आवाज... एकच पर्याय... बोला.......
|| जय जिजाऊ जय शिवराय ||


स्त्रोत आणि संकलन
: विरोप, मला आल्याले इमैल्स, facebook वरील राज्यावरील ग्रौप मधील पोस्ट.


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment