Wednesday 12 June 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले पारोळा।।

पारोळा किल्ला

किल्ल्याची उंची : ४०००  मी.
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले.
डोंगररांगः डोंगररांग नाही.
 श्रेणी : सोपी.
जिल्हा :  जळगाव.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. या भुईकोटला बाहेरच्या बाजूने जरी अतिक्रमणाचा विळखा पडला असला, तरी पुरातत्व खात्याने केलेल्या डागडूजीमुळे किल्ला सुस्थीतीत आहे. मुख्य किल्ला व बालेकिल्ला अशा दोन भागात असणार्‍या या किल्ल्यात भूईकोटची सर्व वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

इतिहास :
१५७.५ मीटर लांब व १३०.५ मीटर रुंद असलेला हा किल्ला जहागिरदार हरी सदाशिव दामोदर याने इ.स १७२७ मध्ये बांधला. इ.स १८१८ मध्ये इंग्रजांनी या भागावर सत्ता प्रस्थापित केली, पण किल्ला जहागिरदारांच्या ताब्यात ठेवला. इ.स १८२१ मध्ये पारोळ्यात इंग्रजाविरुध्द बंड झाले, त्यावेळी कॅप्टन ब्रिग्र याला ठार मारण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला होता. याचा ठपका लालभाऊ झाशीकर र्‍यांच्यावर ठेवून पारोळा किल्ला झाशीकर र्‍यांच्याकडून इंग्रजांनी हस्तगत केला. इ.स १८५७ च्या उठावात झाशीच्या राणीला मदत केलेच्या आरोपावरुन इंग्रजांनी जहागिरदारांची सर्व संपत्ती जप्त केली.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
गडाच्या उत्तराभिमुख प्रवेशद्वाराने आपण गडात प्रवेश करतो. आत आल्यावर दोन्हीबाजूंना पहारेकर्‍र्‍यांसाठी देवड्या दिसतात; तर समोर १५ फूट उंच तटबंदी दिसते. इथून काटकोनात वळल्यावर गडाचे दुसरे प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच बालेकिल्ल्याचा भक्कम चौकोनी बुरुज त्यात असलेल्या खिडक्या, झरोके, जंग्या आपल्याला दिसतात. या बुरुजाखाली गणपतीचे मंदिर व विहीर आहे.
प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहाण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताला एकामागोमाग उभ्या असलेल्या पण पडझड झालेल्या कमानी दिसतात. एकेकाळी त्र्‍यांच्यावर फांजी बांधलेली असावी. या कमानीं जवळच एक चौकोनी विहीर आहे. कमानीकडून पुढे आल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी जिना आहे. या पूर्वेकडील तटबंदीच्या बाजूस तलाव आहे.(पारोळाकरांनी या तलावाच्या सर्व बाजूंनी अतिक्रमण केल्यामुळे व तलावात केरकचरा टाकल्यामुळे त्याची शोभा गेली आहे) या तलावात उतरण्यासाठी तटबंदीखाली दोन ठिकाणी चोर दरवाजे आहेत. तसेच दरवाजे तलावाच्या विरुध्द बाजूस पारोळा गावात आहेत. पूर्वेच्या तटबंदी समोर महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिराजवळ भूयार असून ते ८ कि मी वरील नागेश्वर मंदीरात उघडते असा स्थानिकांचा दावा आहे. मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या दुमजली वाड्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या मागे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला एक विहीर आहे.
बालेकिल्ल्याला चार बाजूला चार गोलाकार २५ फूटी भव्य बुरुज आहेत. या बुरुजांच्या मध्ये चार चौकानी बुरुज आहेत बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पश्चिमेला असलेल्या चोर दरवाजाने बालेकिल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. बालेकिल्ल्यावर दक्षिणेकडील तटबंदीला लागुन ३ घरांचे अवशेष दिसतात. त्या किल्ल्यावरील कचेर्‍या असाव्यात. बालेकिल्ल्यात असलेल्या दोन विहीरीतील पाणी हौदात ओतून ते या कचेर्‍र्‍यांपर्यंत खेळवण्यात आले होते, ते चर आजही पाहायला मिळतात. या कचेर्‍र्‍यांच्या समोर सुशोभित केलेला हौद व कारंजे होते, त्र्‍यांचे अवशेष पहायला मिळतात. कचेर्‍र्‍यांच्या भिंतीत जंग्र्‍यांची रचना केलेली आहे. कचेर्‍र्‍यांच्या बाजूला असलेल्या पूर्वेकडील बुरुजात दारुकोठार आहे. या कोठारालाही सर्व बाजूंनी जंग्या आहेत.
गडाच्या तटबंदीला फिरण्यासाठी फांजी आहे व तटबंदीत जागोजागी जंग्र्‍यांची रचना केलेली आहे. तटबंदी भोवती दगडांनी बांधलेला १० फूट * १० फूट खंदक आहे. पूर्वेकडील बुरुजावर ध्वजस्तंभ आहे. पूर्वीच्याकाळी प्रवेशद्वारासमोर उचलता येणारा लाकडी पूल होता.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
पारोळा हे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर रस्त्याने देशाशी जोडलेल आहे. पारोळा जरी जळगाव जिल्ह्यात असले तरी ते धुळे शहरापासून जवळ आहे. धुळे - जळगाव रस्त्यावर धुळ्यापासून पारोळा ३५ किमीवर आहे. अंमळनेर पासून पारोळा २२ किमीवर आहे. पारोळा गावातील बाजारात दुकानांच्या रांगेमध्ये किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे.

राहाण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही, पण पारोळा गावात होऊ शकते.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही,
आपण स्वतः करावी .

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही, 
आपण स्वतः करावी .
नोट : वरील सर्व माहिती "" फक़्त राजे "' या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

Saturday 8 June 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले बितनगड।।


किल्ल्याची उंची : ४०००  मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
डोंगररांगः कळसूबाई.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा :  नाशिक.

बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याचा माथा लहान आहे. ह्या किल्ल्याचा उपयोग टेहाळणीसाठी केला जात असावा. किल्ल्यावर एक गुहा आणि एक पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. काही उध्वस्त वास्तु आहेत. किल्ल्यावरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर, डोंगररांगा मनाला भुरळ घालतात.

गडावर पोहोचण्याच्या वाटा :
घोटी - भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. या गावातून एकदरा फाटा अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. एकदरा फाट्यापासून बितनगडाच्या पायथ्याचे बितनवाडी गाव ६ किमीवर आहे.
गडाच्या पायथ्याशी बितंगवाडी हे गाव आहे. या गावातून किल्ल्याकडे जाता येत. शेतातून वाट काढत आपण किल्ला चढायला सुरुवात करतो. किल्ला चढायला कठीण नाही, पण खडकात खोदलेल्या पायर्‍या चढताना नीट चढून जाण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दोरी (रोप) असू द्यावी. पावसाळ्यात शेवाळ्यामुळे पायर्‍या निसरड्या होऊ शकतात. नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.

गडावर राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. बितंगवाडीत राहता येतं. टाकेद (बितंगवाडी पासून सुमारे १५ किलोमीटर) या गावातील जटायूच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.

पाण्याची सोय : गडावर पाण्याची सोय नाही.

जाण्यासाठी लागणारा वेळ : बितंगवाडीतून १ तास लागतो.

जाण्यासाठी उत्तम कालावधी :
नोव्हंबर ते फेब्रुवारी ही किल्ल्यावर जाण्याची उत्तम वेळ आहे.


|| राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन ||

 नोट : वरील सर्व माहिती "" फक़्त राजे "' या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

महाराष्ट्रातील सात अद्भुत आश्चर्य ( सात वंडर्स )


|| सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र ||

जगतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर 'एबीपी माझा'ने महाराष्ट्रातूनही “सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात नयनरम्य स्थळ निवडली गेली आहेत.

१. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी शिवतीर्थ रायगड किल्ला, रायगड.

२. मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबाद किल्ला, दौलताबाद.

३. पश्चिम घाटातील कास पठार, सातारा.

४. मध्य रेल्वेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी स्टेशन), मुंबई.

५. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबई.

६. लोणार सरोवर, बुलडाणा.

७. अंजिठा लेणी, औरंगाबाद.

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥

Tuesday 4 June 2013

॥ शिवराज्यभिषेक सोहळा शिवतीर्थक्षेत्र किल्ले रायगड ६ जून ॥


मोगलाईचा अस्त  होऊन हिंदवी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितिजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी ५ जूनला मध्यरात्रीपासून राजाभिषेक प्रक्रिया सुरु करून "" ६ जून इ.स. १६७४ "" रोजी किल्ले रायगडावर राजांचा राज्याभिषेक सकाळी ७ वाजता झाला…. हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपति आणि राजे म्हणून पहिला दरबार भरवला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.
स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपति झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवराय बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.


शिवरायांनी राजाभिषेकासाठी ६ जून हीच तारीख का निवडली ,

मुहूर्ताची वगेरे वाट नव्हे तर आपल्या कर्तुत्वाची जाणीव दाही दिशांना आणि आलम दुनियेला व्हावी त्याचवेळी मोघलांना ह्या देशात स्वतंत्र स्वाभिमानी राज्याची स्वराज्याची स्थापना झाली हे जगजाहीर करण्यासाठीच महाराजांनी ६ जून हि तारीख जाणीवपूर्वक निवडून मोगलांना आपल्या ढासळत्या डोलाराची जाणीव करू दिली .त्यांचा तिळपापड केला.
जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता कारण दक्षिणायन उत्तरायण भानगड. परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रूंच्या वेगळ्या भानगडीवर लक्ष देणे आवश्यक होते .लोक दक्षिणायन वर्ज्र मानतात. परंतु महाराज दक्षिणायन आवर्जून दक्षिणायन म्हणजे जून महिना निवडतात कारण शत्रूला चकमा देणे .राज्य राहिले तर राजाभिषेक होईल ना, म्हणून राज्य रयत ह्यांची काळजी अगोदर. मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राजाभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले.
आणखी एक मोठा राष्ट्रीय उद्देश होता. औरंगजेबाचा सिंहासनरोह्नाचा खास कार्यक्रम ५ जून १६५९ या दिवशी झाला होता. आता तुमच्या मोगलाईचा अस्त  होऊन हिंदवी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितिजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी  ५ जूनला मध्यरात्रीपासून राजाभिषेक प्रक्रिया सुरु करून  ६ जून इ.स. १६७४ रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक केला.  मोगलाईचा अस्त  होऊन हिंदवी स्वराज्याचा स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितिजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी  ५ जूनला मध्यरात्रीपासून राजाभिषेक प्रक्रिया सुरु करून  ६ जून इ.स. १६७४ रोजी किल्ले रायगडावर राज्याभिषेक केला.

महाराजांच्या राजाभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला………… " या खुदा ! अब तो हद हो गई ,तू भी उस शिवा के साथ हो गया ! शिवा "" छत्रपती "" हो गया ".
 

चला तीर्थक्षेत्र किल्ले रायगडावर जाऊ , छत्रपती शिवरायांना वंदन करू...ll

  ||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा||
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥