Thursday 29 March 2012

प्रवास एका शिवभक्ताचा :- किल्ले तोरणागड

 
तोरणा किल्ला

किल्ल्याची उंची :- १४०० मीटर
किल्ल्याचा प्रकार :- गिरीदुर्ग
डोंगररांग :- पुणे
जिल्हा :- पुणे
श्रेणी :- मध्यम

शिवाजी महराजांनी सुरवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा . गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा . महाराजांनी गडाची पाहणी करताना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे "प्रचंडगड " असे नाव ठेवले . पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सहयाद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेले आहेत. यापैकी पहिल्या पदरावर तोरणा व राजगड वसलेले आहेत तर दुसर्या पदराला भुलेश्वर रांग म्हणतात. पुण्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतराजी मध्ये उत्तर अक्षांश व पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे . याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी व उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पशिमेला कानद खिंड , पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत .

इतिहास :- हा किल्ला कधी आणि कुणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही .येथील लेण्याच्या अन मंदिराच्या अवशेषावरून हा शैवपंथाचा आश्रम असावा इसवी सन १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला . पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले . गडावर काही इमारती बांधल्या . राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडाचा जीर्णोद्धार केला . त्यात ५००० होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजाचा वाद झाल्यावर हा किल्ला मोगलाकडे गेला.शंकराजी नारायण सचिवानी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले . पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा हा महाराजाकडेच राहिला . विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय.



गडावरील पाहण्यासारखे ठिकाण :- .

गडावर जाण्याच्या वाटा :- कठीण -राजगड - तोरणा मार्गे

राहण्याची सोय :-गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जनाची राहण्याची सोय होते .

जेवणाची सोय :- आपण स्वताच करावी .

पाण्याची सोय :- .मेंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच बारमाही पाण्याचे टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ :-अडीच तास वेल्हेमार्गे , ६ तास राजगड-तोरणा मार्गे .



नोट :
वरील सर्व माहिती "गडवाट" या facebook  वरील ग्रौप मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .








No comments:

Post a Comment