छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण आज्ञापत्रात स्पष्ट दिसते.‘ज्याचे आरमार त्याचा समुद्र’ हे त्यांनी पुरेपूर ओळखले होते.आरमाराला साथ देण्याकरीता त्यांनी जलदुर्गांची एक शृंखलाच कोकण किनारपट्टीवर उभी केली.
![]() |
छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराविषयीचे धोरण " ज्याचे आरमार त्याचा समुद्र " |
शिवकालीन नौका :
१. संदेश वाहक होडी- हा होडीचा सर्वात लहान प्रकार असून तो केवळ वल्हवता येत असे.यावर डोलकाठी नसत क्वचितच एखादे शिड असे. होड्या केवळ संदेश आणि पिण्याचे पाणी ने आण करण्याकरिता वापरल्या जात.
२. मचवा – मचवा हे एक छोटे जहाज असून ते वल्हवता येत असे.त्यावर सुमार २५-४० सैनिक असत.हे जहाज त्वरेने हालचाल करत असे.ह्यावर शक्यतो तोफा नसत व केवळ छर्रे व ठासणीची बंदुके असणारी शिपायांची तुकडी असे. असलीच तर लहान पल्ल्याची व छोटे गोळे फेकणारी एक तोफ मचव्यावर असत व तोफ असताना सैनिकांची संख्या कमी असे.
३. शिबाड – शिबाड हा मालवाहू जहाजाचा प्रकार आहे त्यावर तोफा बसवून ते युद्धासाठीही वापरता येत असे.यावर एक डोलकाठी व शिड असून हे जहाज वल्हवता येत नसे. ते केवळ वारयाच्या आधारे एकाच दिशेने चालत असे.
४ .गुराब – हे जहाज शिबाडापेक्षा मोठे असून त्यावर किमान २ व क्वचित ३ डोलकाठ्या असत व प्रत्येक डोलकाठीवर २ चौकोनी शिड असत व बऱ्याचदा एक लहान त्रिकोणी शिडही असे.ह्यामुळे ते विविध दिशांच्या वाऱ्याच उपयोग करून विविध दिशांना चालवता येत असे.गुराबेवर जहाजाच्या लाम्बीशी काटकोनात प्रत्येक बाजूने ५-७ तसेच नाळेवर समोरून व पिछाडीस एक तोफ असे.या तोफा माध्यम पल्ल्याच्या असून त्या ५-६ पौंड वजनाचे गोळे फेकू शकत. ह्यावर सुमार १००-१५० सैनिक असत .
![]() |
||छत्रपतीँची निष्ठा हीच आमची प्रतिष्ठा|| |
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभूराजे॥
॥जयोस्तू मराठा॥
No comments:
Post a Comment