Friday 1 March 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- ।। किल्ले चौल्हेर ।।

चौल्हेर किल्ला

किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. साल्हेर महाराष्ट्रातील सर्वात उंच गड आहे. चौरगड चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे.

इतिहास :
येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते..गडावर मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्यार्‍या टाके, खेकड्या टाके आहे या गावाला आधी मोठा कोट होता येथे गवळी राजा राज्य करीत असे त्याच काळातील एक घोडपागा वाडीचौल्हेर मध्ये आजही पहावयास मिळते या राजाच्या हाताखाली काही हजारी (उदा पंचहजारी इ) काही मन्सबदार होते यातील एक मन्सबदार पुढे देखील या परिसराची देखभाल करत असे

गडावरील
पहाण्याची ठिकाणे :
गडावर शिरतांनाच एक भुयारी दरवाजांची रांगची रांग लागते. गडावर शिरण्यासाठी ३ दरवाज्यातून आत जावे लागते. हे दरवाजे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुनाच होय. गडावर शिरल्यावर समोरच बालेकिल्ला आहे. तर डावीकडे गडाची छोटीशी माची आहे. गडाच्या माचीवर पाण्याचे एक मोठे तळे आहे. तर शेवटच्या टोकाला तटबंदीचे काही अवशेष आहेत. माचीवर फेरफटका मारुन बालेकिल्याची वाट धरावी.
बालेकिल्ल्याला जाण्यासाठी दोन्ही बाजुंनी वाटा आहेत. उजवीकडच्या वाटेने १० मिनिटात पायर्‍यांच्या साह्याने गडावर पोहचता येते. वाटेत मोतीटाके, आणि अनेक पाण्याची कातळात खोदलेली टाकी आढळतात. मोती टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. बालेकिल्यावर सुध्दा पाण्याची ४ जोड टाकी आढळतात. याशिवाय पडक्या वाड्यांचे काही अवशेष आहेत. बालेकिल्यावरुन संपूर्ण गडाचा घेरा लक्षात येतो. गडावरुन सातमाळ रांग व सेलबारी - डोलबारी रांगेचे मोहक दर्शन होते. बालेकिल्याकडे जाणार्‍या डावीकडच्या वाटेवर चौरंगनाथाची व हनुमाना्ची मुर्ती आहे. त्यावर सध्या गावकर्‍यांनी एक पत्र्याची शेड उभारली आहे. येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते..पुढे गेल्यावर कातळात खोदलेली पाण्याची मोती टाके, शेवाळ्या टाके, हत्यार्‍या टाके, खेकड्या टाकी लागतात. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.
वाडी चौल्हेर या गावाला आधी मोठा कोट होता. येथे गवळी राजा राज्य करीत असे. त्याच काळातील एक घोडपागा वाडीचौल्हेर मध्ये आजही पहावयास मिळते.

गडावर जाण्याची वाट: 
नाशिक मार्गे ९५ किमी वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरुन तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवण पासून २० मिनिटांवर असणार्‍या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्यावरुन उतरणारी एक डोंगरसोंड आहे. याच डोंगरसोंडेवरुन चालत दीड तासात गडमाथा गाटत यतो.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नाही. 
पाण्याची व जेवणाची व्यवस्था : गडावर पाण्याची व जेवणाची व्यवस्था नाही, आपण स्वत: करावी. 


नोट : वरील सर्व माहिती काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल .

No comments:

Post a Comment