Friday 2 August 2013

प्रवास एका शिवभक्ताचा :- || किल्ले राजधेर ||

राजधेर  किल्ला

 किल्ल्याची ऊंची : ३५५५ मी.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग.
 डोंगररांग : अजंठा सातमाळ.
 श्रेणी : मध्यम.
जिल्हा : नाशिक .

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्‍या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात राजधेर,कोळधेर,इंद्राई आणि चांदवड हे ४ किल्ले येतात.

गडावरील पहाण्याची ठिकाणे :
राजधेर किल्ल्यावर प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात. एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी. आपण उजवीकडची वाट पकडायची , थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो. आजही वाडा चांगल्या स्थितीत उभा आहे. या वाड्या शिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते. या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते. तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणार्‍या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलावआहे. गडमाथ्यावरुन मांगीतुंगी, न्हावीगड ,कोळधेर ,इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास २ तास लागतात. उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे.
 
गडावर पोहोचण्याच्या वाटा :
राजधेरवाडी मार्गे :-
राजधेरवर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. नाशिक किंवा मनमाड मार्गे चांदवड गाठावे. नाशिक पासून चांदवड ६४ किमी वर आहे, तर मनमाड पासून चांदवड २४ किमी वर आहे. चांदवड मधून एसटी ने राजधेरवाडी गाठावी. राजधेरवाडी हे पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडीतून गडावर जाण्यास ठळक वाट आहे. गावातून किल्ल्यावर जातांना आपण एका कातळकड्यापाशी पोहोचतो. येथून वर जाण्याच्या पायर्‍या तुटलेल्या आहेत. पण सध्या तिथे एक शिडी लावली असल्यामुळे आपण गडाच्या प्रवेशद्वारात पोहोचू शकतो. अन्यथा प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. राजधेरवाडीतून इथपर्यंत पोहोचण्यास दीड तास लागतो.

गडावर राहाण्याची सोय : किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहे. यात १० लोकांची राहण्याची सोय होते.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय :किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहेत.

गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ : राजधेरवाडी गावातून दीड तास लागतो.


 नोट : वरील सर्व माहिती "  शिवकालीन महाराष्ट्र' "  या facebook  वरील पेज मधील एका पोस्ट चा संधर्भ घेऊन लेहीण्यात आली आहे. यात काही चूक असेल तर मला कळवावी, मी ती ताबडतोब सुधारेल वा आपल्या कडे काही माहिती असेल तर ती मला पाठवावी या पोस्ट मध्य अड्ड करेल . 



No comments:

Post a Comment